SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
अनुप गाडगे । अमरावती
अमरावती ते चिखली व्हाया अकोला
या १९० किलोमीटर महामार्गाचे लवकरच
चौपदरीकरण होणार आहे. वर्षभरापूर्वी
एका कंपनीने घेतलेले काम सुरू
करण्यापूर्वीच सोडून दिले होते. त्यामुळे
आता नव्याने निविदा काढल्या असून,
निविदांची प्राथमिक फेरी पूर्ण झाली अाहे,
लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार
अाहे,अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग
प्राधिकरणाच्या सूत्रांनी िदली आहे.
अमरावती ते अकोला महामार्गाच्या
चौपदरीकरणाचे काम एनएचए (नॅशनल
हायवे ऑथर्टी ऑफ इंडिया) करणार
आहे. यापूर्वी एनएचएने अमरावती ते
नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण मागील
वर्षी पूर्ण  उर्वरित पान. १२
अमरावती-अकोला-चिखली
महामार्गाचे चौपदरीकरण लवकरच
काम करण्यास चौदा कंपन्या उत्सुक
मागील वर्षी एका कंपनीने अमरावती ते अकोला महामार्ग चौपदरीकरणाच्या
कामाचे कंत्राट काम सुरू करण्यापूर्वीच सोडले. त्यामुळे एनएचएने नव्याने
निविदा काढल्या. आता १४ कंपनींनी तयारी दर्शवली आहे. लवकरच यांपैकी एका
कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार
असल्याचे एनएचएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गुजरात सीमेपर्यंत काम
गुजरातच्या सीमेपर्यंत असलेल्या या
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तीन
टप्पे होणार आहे. यापैकी अमरावती ते
चिखली या १९० किलोमीटरचे काम
अमरावती एनएचए यंत्रणा करणार आहे.
दुसरा टप्पा चिखली ते जळगाव १५०
किलोमीटर व तिसरा टप्पा जळगाव ते
गुजरात राज्याची सीमा असा राहील.
अकोला सोमवार, २३ फेब्रुवारी २०१५
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
एकूण पाने १२+४=१६ | किंमत ‌~३.००*
गृहनिर्माण धाेरणात ५ वर्षे
कुठलाही बदल हाेणार नाही
प्रतिनिधी | नागपूर
राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण येत्या मे
महिन्यात जाहीर केले जाईल, अशी
घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी राज्य शासनाच्या वतीने सर्वांसाठी
घर या संकल्पनेअंतर्गत रविवारी
नागपुरात केली.
सर्वसामान्यांना
परवडणारी घरे
विकासकांना
पुरवता यावीत,
यासाठी शासनाने
तोडगा काढला
आहे. गृहनिर्माण प्रकल्पांच्या विविध
परवानग्या मिळवताना अनेक वर्षे
जातात. विकासकांवर व्याजाचा बोजा
निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणून
विविध स्तरांवरील परवानग्यांना विलंब
न लावता त्या वेगाने देण्याचे राज्य
शासनाचे प्रयत्न राहतील. त्यातून
प्रकल्पांची किंमत कमी राखता येईल,
असे मुख्यमंत्री म्हणाले.
गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी
विकास प्राधिकरण, म्हाडा च्या संयुक्त
सहकार्याने झालेल्या चर्चासत्राच्या
समारोपात मुख्यमंत्री बोलत होते. ते
म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
२०२२ पर्यंत प्रत्येकाला घर अशी घोषणा
केली आहे. त्या दृष्टीने राज्य शासनही
कामाला लागले असून, त्यासाठी
प्रथम गृहनिर्माण धोरण आणले
जाणार आहे. अतिशय वेगाने नव्या
गृहनिर्माण धोरणाचा मसुदा तयार केला
जाणार असून, मे महिन्याच्या पहिल्या
आठवड्यात ते जाहीर केले जाईल.
धोरणात सातत्य राखले जाईल. किमान
५ वर्षे तरी त्यात कुठलाही बदल होणार
नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
गृहनिर्माण खात्याचे मंत्री प्रकाश
मेहता, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय,
गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य
सचिव गौतम, चॅटर्जी, एसआरएचे
मुख्य कार्यकारी अधिकारी असीम
गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष एस.एस. भेंडे
यांच्यासह मुंबई आणि राज्यभरातून
मोठ्या संख्येने विकासक या दोन
दिवसीय चर्चासत्रात सहभागी
झाले होते.
सामान्यांना परवडणारी
घरे, मेपर्यंत नवे धोरण
विकासकांना तत्काळ परवानग्या; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुख्य सचिवांची टीका
राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापायी
२००७च्या गृहनिर्माण धोरणासंदर्भात
राज्यात कुठलेही काम होऊ शकले
नाही. मात्र, आता परिस्थिती बदलली
आहे, अशी टीका राज्याचे मुख्य सचिव
स्वाधीन क्षत्रिय यांनी या वेळी केली. जुने
धोरण अतिशय क्लिष्ट होते. आता तरी
धोरणाचे स्वरूप थोडक्यात व सर्वांना
समजेल असे असावे, असेही ते म्हणाले.
मंदीमुळे प्रोत्साहन पॅकेज
सध्या अनेक गृहनिर्माण प्रकल्प
मंदीचा सामना करत आहेत. त्यांना या
अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने
प्रोत्साहनपर पॅकेज द्यावे, अशी अपेक्षा
महाराष्ट्र चॅप्टर ऑफ हाउसिंग इंडस्ट्रीज
मुंबईचे उपाध्यक्ष मयूर शहा यांनी व्यक्त
केली. विकासकांना परवानग्यांसाठी
शासनाने एक खिडकी यंत्रणा सुरू
करावी, असेही ते म्हणाले.
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
पाच वर्षांत तीन लाख
नव्या नोकऱ्या देणार
नवी दिल्ली | नव्या कंपन्या
(स्टार्ट-अप) पुढील ५ वर्षांत
३ लाख नोकऱ्या देतील. नव्या
कंपन्यांनी गेल्या वर्षीच ५० ते ६०
कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे.
८० टक्के लोक नव्या कंपन्यांना
प्राधान्य देत आहेत.
शिवरायांच्या पुतळ्याला
मिळेल झेड प्लस सुरक्षा
मुंबई | अरबी समुद्रात उभारण्यात
येणाऱ्या छत्रपती शिवाजी
महाराजांच्या १९० फूट उंचीच्या
पुतळ्याला झेड प्लस सुरक्षा
देण्यात येईल. हा पुतळा २०१९
पर्यंत पूर्ण होईल. त्यावर जवळपास
१९०० कोटी रुपये खर्च होतील.
ऑस्कर आज, बर्डमॅन आणि
बॉयहूड यांच्यात स्पर्धा
लॉस एंजलिस | सोमवारी
८७ वा ऑस्कर पुरस्कार
समारंभ होत आहे. त्यात
अलेजांद्रो जी इनारितूचा
‘बर्डमॅन’ आणि रिचर्ड
लिंकलेटरचा ‘बॉयहूड’ यांच्यात
काट्याची स्पर्धा असेल.
भारताचा ‘लायर्स डायस’
सर्वोत्कृष्ट श्रेणींत आपली छाप
उमटवण्यात अपयशी ठरला.
वर्ल्डकप नाण्याची
मागणी वाढली
कोलकाता | रॉयल आॅस्ट्रेलियन
मिंट आणि न्यूझीलंड पोस्ट यांनी
तयार केलेल्या विश्वचषक नाण्याची
मागणी वाढली आहे. नाणे मर्यादित
संख्येत काढले आहेत. ते भारतातही
उपलब्ध आहे. त्याची किंमत १३०००
रुपयांपेक्षा जास्त आहे.
नितीशकुमार चौथ्यांदा
बिहारचे मुख्यमंत्री
पाटणा | नितीशकुमार चौथ्यांदा
बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत.
ते राज्याचे २४
वे मुख्यमंत्री
आहेत. त्यांनी
रविवारी
राजभवनात
शपथ घेतली.
त्यांच्यासोबत २२ मंत्र्यांचाही
शपथविधी झाला
उपमिता वाजपेयी | कोट्टयम (केरळ)
कोट्टयमचे जॉबी मॅथ्यू. शेतकरी कुटुंबात जन्म. वय ३८
वर्षे. शरीराचा ४० टक्के भाग ‘अशक्त’ आहे. जन्मापासून
पायाची हाडे आणि गुडघा अविकसित आहे. वैद्यकीय भाषेत
या आजाराला प्रॉक्सिमल फेमोरल फोकल डिफिशियन्सी
म्हणतात. एक लाख मुलांमध्ये दोघांना तो होण्याची शक्यता
असते. सध्या तरी त्यावर कुठलाही इलाज नाही.
दुर्दम्य विश्वासाने परिपूर्ण जॉबींची ओळख वेगळीच
आहे. ते आर्म रेसलिंगचे जगज्जेते आहेत. बॅडमिंटन,
थाळीफेक, जलतरण, टेबल टेनिसवर प्रभुत्व आहे.
संपूर्ण घर करंडक, पदकांनी भरले आहे. त्यांना देशाचा
पहिला ‘मल्टिपर्सन स्पोर्ट‌्स‌मन’ म्हणतात. आशियाई आर्म
रेसलिंगमध्ये भाग घेण्यासाठी जॉबी एप्रिलमध्ये पाकिस्तानला
जात आहेत. ‘मी जिंकण्यासाठीच जात आहे. सप्टेंबरमध्ये
मलेशियातील जागतिक आर्म रेसलिंगची तयारीही होईल,’
असे ते आत्मविश्वासाने सांगतात. जॉबी म्हणाले, ‘शाळेत
मुले खेळत तेव्हा मी गॅलरीत उभा राहून पाहत असे.
खेळायची इच्छा असायची, पण ते मला हसायचे. तेव्हाच
एक दिवस चॅम्पियन होईन, असा निर्धार मी केला. दहावीत
जिम जॉइन केली. पाय अशक्त असले तरी शरीराचा वरचा
भाग मजबूत करण्यासाठी तासभर जिममध्ये घाम गाळतो.
सकाळी पाचला उठून पेरियार नदीत पोहतो. नंतर पुशअप्स.
१६ व्या वर्षी पहिल्यांदा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.
मित्र, इंटरनेटद्वारेच मी खेळांशी परिचित झालो. मित्रांनी
प्रोत्साहन दिले, तयारी करून घेतली. मी स्वत:ला कमजोर
समजत नाही. सकाळी ९.३० वा. ऑफिसला कारने जातो.
(कारचीशारीरिकठेवणीनुसाररचना)भारतपेट्रोलियममध्ये
सहायक व्यवस्थापक आहे. पत्नी मेघा शास्त्रीय नृत्यांगना
आहे. ५ वर्षांचा मुलगाही आहे.’
आयुष्यात विजयी व्हायचे असेल
तर यांना एकदा अवश्य भेटा...
दिव्यमराठी ला माहिती : मी
एप्रिलमध्ये पाकिस्तानला जात आहे.
आशियाई रेसलिंग विजेतेपदासाठी,
सप्टेंबरमध्ये जागतिक स्पर्धेवर नजर
लहानपणीदोन्ही
पाय कमजोर, हातांच्या
साह्याने पायऱ्या उतरत
जॉबी मॅथ्यूंची उंची ३ फूट
५ इंच. लहानपणी हातांच्या
साह्याने घराच्या पायऱ्या
चढायचे-उतरायचे. शाळेत
कोणीही सोबत खेळत नसे.
....आता हातांना
सक्षम बनवले. जगात
१८ स्पर्धा जिंकल्या
एका हातावर शरीराचे
वजन पेलतात. वर्ल्ड आर्म
रेसलिंगसह १८ आंतरराष्ट्रीय
स्पर्धांत विजय. तेदेखील
प्रशिक्षक, प्रशिक्षणाशिवाय.
2014 पोलंडमध्ये वर्ल्ड आर्म रेसलिंगमध्ये २ कांस्य.
2013 अमेरिकेत ड्वार्फ ऑलिम्पिकमध्ये ५ सुवर्ण.
2012 स्पेनमध्ये वर्ल्डआर्म रेसलिंगमध्ये १ सुवर्ण, २ रौप्य.
2010 इस्रायलमध्ये पॅरालिंपिक बॅडमिंटनमध्ये १ रौप्य.
2005 जपानमध्ये आर्म रेसलिंगमध्ये पहिल्यांदा रौप्य.
हे आहेत जॉबी मॅथ्यू
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष २ | अंक २१८ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
प्रतिनिधी | कोल्हापूर
काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या
मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५
लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल,
अशी घोषणा जिल्हा पोलिस प्रमुख
डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केली.
पानसरे व त्यांच्या पत्नी
उमा यांच्यावर १६ रोजी हल्ला
झाला होता. मुंबईत उपचार सुरू
असताना २१ रोजी रात्री पानसरे
यांचे निधन झाले. उमा यांच्यावर
कोल्हापुरातील अॅस्टर आधार
हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
आहेत. पोलिसांची २० पथके तसेच
मुंबई पोलिस शाखा स्वतंत्रपणे
तपास करत अाहेत. कोल्हापुरात
दुभाजकावर आदळलेली बेवारस
पल्सर दुचाकी पोलिसांनी ताब्यात
घेतली आहे. गोवा व कर्नाटकातही
तपास सुरू अाहे. हल्लेखोरांची
माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस
देण्यात येणार असून ९७६४००२२७४
या क्रमांकावर माहिती देण्याचे
पोलिसांचे आवाहन आहे. माहिती
देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
मारेकऱ्यांची माहिती द्या,
५ लाख बक्षीस मिळवा
काॅ. पानसरे
हत्याकांड
बंद' संमिश्र
पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या
संघटनांनी पुकारलेल्या बंदला रविवारी
राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
कोल्हापुरात मात्र कडकडीत बंद
होता. मुंबईत रिपाइंने अध्यक्ष रामदास
आठवलेंच्या नेतृत्वात निदर्शने केली.
हा पराभव कसा
विसरेल आफ्रिका
मेलबर्न | सामन्याआधी चर्चा होती भारत वर्ल्डकपमध्ये
द. अाफ्रिकेविरुद्ध कधीच जिंकलेला नाही याची. मात्र,
टीम इंडियाने पहिल्याच चेंडूपासून आफ्रिकन्सची भंबेरी
उडवली. भारताने आफ्रिकेचा इतिहासातील सर्वात
मोठा पराभव केला. कधीही न विसरता येणारा...
या पराभवाने संघ
खचला आहे. ही
जखम भरण्यासाठी
बराच काळ लागेल.
- एबी डिव्हिलियर्स
दोन मॅच जिंकल्या,
िवजयापेक्षाही मोठे
आजचे यश आहे. हा
कंप्लिट परफाॅर्मन्स आहे.
- महेंद्रसिंग धोनी
भारत : 307/7 (50)
द. अाफ्रिका : 177 (40.2)
130धावांनीभारतविजयी,उपांत्यपूर्वफेरीपक्की
कारण की...
{इतिहासातील सर्वात मोठा पराभव
{वर्ल्डकप : भारताने प्रथमच नमवले
{प्रथमच 200 च्या आत सर्वबाद झाले
{6 फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद
वर्ल्डकपमध्ये सर्व 15 संघांना
हरवणारी चौथी टीम ठरली इंडिया...
धवन मॅन ऑफ द मॅच
अाफ्रिकेविरुद्ध शतक
ठोकणारा दुसराच भारतीय
हा विजयाचा
टर्निंग पॉइंट
22व्या षटकात मोहित शर्माने
बाउंड्रीहून थ्रो केला व धोनीने
डिव्हिलियर्सला धावबाद केेले.
ही अाफ्रिकेची तिसरी विकेट
होती. यानंतर अख्खा संघ 69
रन करून सर्वबाद झाला.
धवनला वर्ल्डकपमधून बाहेर केले जाणार
होते, पण जिद्दीच्या जोरावर रचले 2 विक्रम
137 धावा. वर्ल्डकपमध्ये
द. अाफ्रिकेविरुद्ध सर्वात मोठी
खेळी. 2003 मध्ये फ्लेमिंगने
(न्यूझीलंड) 134 धावा केल्या.
दुसराभारतीय दक्षिण
आफ्रिकेविरुद्ध वर्ल्डकपमध्ये
शतक करणारा. 2011 मध्ये
सचिनची 111 धावांची खेळी.
धवनचे सासुरवाडीत शतक;
शिखरची पत्नी आयेशा मेलबर्नची आहे. या
मैदानावर धवनचे हे पहिलेच शतक आहे.
फलंदाजी :दोन्ही सामन्यांत 300 वर धावा. आफ्रिकेविरुद्ध
127 धावांची सर्वात मोठी भागीदारी. धवन-कोहलीने दोन्ही
सामन्यांत शतकी भागीदारी केली. असे करणारी पहिलीच जोडी.
जगाला चकित करणारी कामगिरी
गोलंदाजी प्लेसिस सोडून
प्रत्येकाला तीस धावांत रोखले.
दोन्ही सामन्यांत प्रतिस्पर्ध्याला
225 धावांच्या आत गारद केले.
फील्डिंग 5 गडी झेलबाद.
एकही झेल सोडला नाही. 2
धावबाद केले. पाकचे सर्व
फलंदाज झेलबाद केले होते.
2 विक्रम अबाधित
{धवनने वनडेत 7 वेळा शतक
केले, दरवेळी भारत विजयी {10
वेळा मेलबर्नमध्ये 300 चा स्कोअर
कुणालाही ओलांडता आला नाही.
भारताचा पुढील सामना
शनिवार, 28 फेब्रुवारीला
यूएईविरुद्ध. (दुपारी 12
वाजेपासून स्टार स्पोर्ट्सवर)
गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवर
‘मौका-मौका’ ही जाहिरात सुरू
आहे. भारताच्या विजयानंतर
टि्वटरवर ती अशा प्रकारे व्हायरल
होऊन टॉप ट्रेंडमध्ये राहिली.
मौका मौका' साेशल
मीडियावर व्हायरल
वर्ल्डकपमधील भारताचा सर्वांत कठीण सामना
(आफ्रिकेविरुद्ध) पाहण्यासाठी आम्ही मेलबर्नला
पोहोचलो. दोन तास आधीच फेटे बांधून आम्ही
स्टेडियमवर दाखल होतो. हळूहळू गर्दी वाढली.
इकडे धोनीने टाॅस जिंकला आणि तिकडे पाहता
पाहता अख्खे स्टेडियम टीम इंडियाच्या निळ्या
जर्सीने फुलून गेले. माझ्या शेजारी बसलेला एक
आफ्रिकन चाहता म्हणाला, हे स्टेडियम नव्हे तर
ब्ल्यू ओशन' झाले आहे. बघावे तिकडे भारतीय
चाहते दिसत होते. आम्ही ऑस्ट्रेलियात सामना
बघत आहोत, असे वाटतच नव्हते. भारतातच
ईडन गार्डन किंवा वानखेडेवर आहोत, असे वाटत
होते. इंडिया'... इंडिया'च्या नारेबाजीने आसमंत
दणाणूनगेला.मोठ्यास्क्रीनवरआकडाझळकला.
सामन्याला किती प्रेक्षक आहेत हे सांगणारा.
८६ हजार
८७६ एवढा
आकडा बघून
विश्वासच
बसला नाही.
गर्दीत किमान
७० हजार
तरी भारतीय
असतील हे मी ठामपणे सांगू शकतो. त्यात दोन
औरंगाबादकरही होते. एक मी आणि दुसरा
माझा मित्र ऋषी भाटिया. आम्ही थांबलो होतो
त्या हॉटेलमध्ये बरेच भारतीय उतरले होते.
स्टेडियमपर्यंत ज्या कॅबने आलो तिचा ड्रायव्हरही
भारतीयच होता. किती हा योगायोग! शेजारी
बसलेला आफ्रिकन आपल्याच धुंदीत होता.
थोड्यावेळानेतोमाझ्याशीपुन्हाबोलला.म्हणाला,
यावेळीतुमच्याकडेसचिननाही.आजचासामना
आम्हीच जिंकू. आफ्रिका विश्वविजेता होणार,
याची खात्री असल्याने मी मुद्दाम आलो आहे.' मी
काहीच उत्तर दिले  उर्वरित. पान ९
मेलबर्न नव्हे
ब्ल्यू ओशन'
औरंगाबादचे अमित कुलकर्णी रविवारचा द.
आफ्रिकेविरुद्धचा सामना पाहण्यासाठी खास
मेलबर्नला गेले होते. क्षणाक्षणाला रोमहर्षक
होत गेलेल्या या सामन्याचे त्यांनी पाठवलेले
वर्णन खास दिव्य मराठी'च्या वाचकांसाठी...
मेलबर्नमध्ये औरंगाबादकर...
ऋषी भाटिया व अमित कुलकर्णी (पिवळा फेटा)

More Related Content

What's hot (16)

Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news marathi
Jalgaon news marathi		Jalgaon news marathi
Jalgaon news marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Latest jalgaon News In Marathi
Latest jalgaon News In Marathi		Latest jalgaon News In Marathi
Latest jalgaon News In Marathi
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Latest Amravati News In Marathi
Latest Amravati News In Marathi		Latest Amravati News In Marathi
Latest Amravati News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Latest Nashik news in Marathi.
Latest  Nashik news in Marathi.		Latest  Nashik news in Marathi.
Latest Nashik news in Marathi.
 

Viewers also liked

Convocatoria ministerio de hacienda
Convocatoria ministerio de haciendaConvocatoria ministerio de hacienda
Convocatoria ministerio de haciendaHector_Morales_ESA
 
Webquest tsatsa team
Webquest tsatsa teamWebquest tsatsa team
Webquest tsatsa teamtsatsa1993
 
Dinámica de las competencias
Dinámica de las competenciasDinámica de las competencias
Dinámica de las competenciasjoelyucra
 
Strategic Comm Media Relations Results Orientated Resume Anthony Lopez
Strategic Comm Media Relations Results Orientated Resume Anthony LopezStrategic Comm Media Relations Results Orientated Resume Anthony Lopez
Strategic Comm Media Relations Results Orientated Resume Anthony LopezAnthony Lopez
 
Erastotene tommaso
Erastotene tommaso Erastotene tommaso
Erastotene tommaso ritafaz
 
Hoja de presentacion
Hoja de presentacionHoja de presentacion
Hoja de presentacionjesyca14
 
бүлгээрээ буюу хэсгээрээ оролцох тоглоомууд
бүлгээрээ буюу хэсгээрээ оролцох тоглоомуудбүлгээрээ буюу хэсгээрээ оролцох тоглоомууд
бүлгээрээ буюу хэсгээрээ оролцох тоглоомуудurangua123
 
Los ambientes de aprendizaje
Los ambientes de aprendizajeLos ambientes de aprendizaje
Los ambientes de aprendizajeGïsse Gisse
 
La comunicacion II
La comunicacion IILa comunicacion II
La comunicacion IIchulojarza
 
η αθήνα γίνεται ισχυρή πόλη
η αθήνα γίνεται ισχυρή πόληη αθήνα γίνεται ισχυρή πόλη
η αθήνα γίνεται ισχυρή πόληAnastazzzia
 

Viewers also liked (20)

Doc2
Doc2Doc2
Doc2
 
Convocatoria ministerio de hacienda
Convocatoria ministerio de haciendaConvocatoria ministerio de hacienda
Convocatoria ministerio de hacienda
 
Le marche
Le marcheLe marche
Le marche
 
Webquest tsatsa team
Webquest tsatsa teamWebquest tsatsa team
Webquest tsatsa team
 
Question 3
Question 3Question 3
Question 3
 
Dinámica de las competencias
Dinámica de las competenciasDinámica de las competencias
Dinámica de las competencias
 
Strategic Comm Media Relations Results Orientated Resume Anthony Lopez
Strategic Comm Media Relations Results Orientated Resume Anthony LopezStrategic Comm Media Relations Results Orientated Resume Anthony Lopez
Strategic Comm Media Relations Results Orientated Resume Anthony Lopez
 
Erastotene tommaso
Erastotene tommaso Erastotene tommaso
Erastotene tommaso
 
Tarea4 08 sol+antena (1)
Tarea4 08 sol+antena (1)Tarea4 08 sol+antena (1)
Tarea4 08 sol+antena (1)
 
Hoja de presentacion
Hoja de presentacionHoja de presentacion
Hoja de presentacion
 
бүлгээрээ буюу хэсгээрээ оролцох тоглоомууд
бүлгээрээ буюу хэсгээрээ оролцох тоглоомуудбүлгээрээ буюу хэсгээрээ оролцох тоглоомууд
бүлгээрээ буюу хэсгээрээ оролцох тоглоомууд
 
Actividad 9
Actividad 9Actividad 9
Actividad 9
 
Los ambientes de aprendizaje
Los ambientes de aprendizajeLos ambientes de aprendizaje
Los ambientes de aprendizaje
 
Programacion 2013 2014
Programacion 2013 2014Programacion 2013 2014
Programacion 2013 2014
 
September 2 english 8
September 2 english 8September 2 english 8
September 2 english 8
 
La comunicacion II
La comunicacion IILa comunicacion II
La comunicacion II
 
Derek Parra
Derek ParraDerek Parra
Derek Parra
 
η αθήνα γίνεται ισχυρή πόλη
η αθήνα γίνεται ισχυρή πόληη αθήνα γίνεται ισχυρή πόλη
η αθήνα γίνεται ισχυρή πόλη
 
Curso pro trader
Curso pro traderCurso pro trader
Curso pro trader
 
PR Jobs UK Interview Tips 2
PR Jobs UK Interview Tips 2PR Jobs UK Interview Tips 2
PR Jobs UK Interview Tips 2
 

Similar to Akola News In Marathi

Similar to Akola News In Marathi (6)

Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
Hindi present assembly .......pptx
Hindi present assembly .......pptxHindi present assembly .......pptx
Hindi present assembly .......pptx
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
28 ahmednagar city pg1-0
28 ahmednagar city pg1-028 ahmednagar city pg1-0
28 ahmednagar city pg1-0
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 

More from divyamarathibhaskarnews

More from divyamarathibhaskarnews (6)

Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Akola News In Marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र अनुप गाडगे । अमरावती अमरावती ते चिखली व्हाया अकोला या १९० किलोमीटर महामार्गाचे लवकरच चौपदरीकरण होणार आहे. वर्षभरापूर्वी एका कंपनीने घेतलेले काम सुरू करण्यापूर्वीच सोडून दिले होते. त्यामुळे आता नव्याने निविदा काढल्या असून, निविदांची प्राथमिक फेरी पूर्ण झाली अाहे, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार अाहे,अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी िदली आहे. अमरावती ते अकोला महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एनएचए (नॅशनल हायवे ऑथर्टी ऑफ इंडिया) करणार आहे. यापूर्वी एनएचएने अमरावती ते नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण मागील वर्षी पूर्ण उर्वरित पान. १२ अमरावती-अकोला-चिखली महामार्गाचे चौपदरीकरण लवकरच काम करण्यास चौदा कंपन्या उत्सुक मागील वर्षी एका कंपनीने अमरावती ते अकोला महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट काम सुरू करण्यापूर्वीच सोडले. त्यामुळे एनएचएने नव्याने निविदा काढल्या. आता १४ कंपनींनी तयारी दर्शवली आहे. लवकरच यांपैकी एका कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचे एनएचएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गुजरात सीमेपर्यंत काम गुजरातच्या सीमेपर्यंत असलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तीन टप्पे होणार आहे. यापैकी अमरावती ते चिखली या १९० किलोमीटरचे काम अमरावती एनएचए यंत्रणा करणार आहे. दुसरा टप्पा चिखली ते जळगाव १५० किलोमीटर व तिसरा टप्पा जळगाव ते गुजरात राज्याची सीमा असा राहील. अकोला सोमवार, २३ फेब्रुवारी २०१५ दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र एकूण पाने १२+४=१६ | किंमत ‌~३.००* गृहनिर्माण धाेरणात ५ वर्षे कुठलाही बदल हाेणार नाही प्रतिनिधी | नागपूर राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण येत्या मे महिन्यात जाहीर केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने सर्वांसाठी घर या संकल्पनेअंतर्गत रविवारी नागपुरात केली. सर्वसामान्यांना परवडणारी घरे विकासकांना पुरवता यावीत, यासाठी शासनाने तोडगा काढला आहे. गृहनिर्माण प्रकल्पांच्या विविध परवानग्या मिळवताना अनेक वर्षे जातात. विकासकांवर व्याजाचा बोजा निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणून विविध स्तरांवरील परवानग्यांना विलंब न लावता त्या वेगाने देण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न राहतील. त्यातून प्रकल्पांची किंमत कमी राखता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी विकास प्राधिकरण, म्हाडा च्या संयुक्त सहकार्याने झालेल्या चर्चासत्राच्या समारोपात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर अशी घोषणा केली आहे. त्या दृष्टीने राज्य शासनही कामाला लागले असून, त्यासाठी प्रथम गृहनिर्माण धोरण आणले जाणार आहे. अतिशय वेगाने नव्या गृहनिर्माण धोरणाचा मसुदा तयार केला जाणार असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते जाहीर केले जाईल. धोरणात सातत्य राखले जाईल. किमान ५ वर्षे तरी त्यात कुठलाही बदल होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. गृहनिर्माण खात्याचे मंत्री प्रकाश मेहता, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम, चॅटर्जी, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष एस.एस. भेंडे यांच्यासह मुंबई आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने विकासक या दोन दिवसीय चर्चासत्रात सहभागी झाले होते. सामान्यांना परवडणारी घरे, मेपर्यंत नवे धोरण विकासकांना तत्काळ परवानग्या; मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुख्य सचिवांची टीका राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापायी २००७च्या गृहनिर्माण धोरणासंदर्भात राज्यात कुठलेही काम होऊ शकले नाही. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, अशी टीका राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी या वेळी केली. जुने धोरण अतिशय क्लिष्ट होते. आता तरी धोरणाचे स्वरूप थोडक्यात व सर्वांना समजेल असे असावे, असेही ते म्हणाले. मंदीमुळे प्रोत्साहन पॅकेज सध्या अनेक गृहनिर्माण प्रकल्प मंदीचा सामना करत आहेत. त्यांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर पॅकेज द्यावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र चॅप्टर ऑफ हाउसिंग इंडस्ट्रीज मुंबईचे उपाध्यक्ष मयूर शहा यांनी व्यक्त केली. विकासकांना परवानग्यांसाठी शासनाने एक खिडकी यंत्रणा सुरू करावी, असेही ते म्हणाले. न्यूजइनबॉक्स गुडन्यूज पाच वर्षांत तीन लाख नव्या नोकऱ्या देणार नवी दिल्ली | नव्या कंपन्या (स्टार्ट-अप) पुढील ५ वर्षांत ३ लाख नोकऱ्या देतील. नव्या कंपन्यांनी गेल्या वर्षीच ५० ते ६० कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. ८० टक्के लोक नव्या कंपन्यांना प्राधान्य देत आहेत. शिवरायांच्या पुतळ्याला मिळेल झेड प्लस सुरक्षा मुंबई | अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १९० फूट उंचीच्या पुतळ्याला झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. हा पुतळा २०१९ पर्यंत पूर्ण होईल. त्यावर जवळपास १९०० कोटी रुपये खर्च होतील. ऑस्कर आज, बर्डमॅन आणि बॉयहूड यांच्यात स्पर्धा लॉस एंजलिस | सोमवारी ८७ वा ऑस्कर पुरस्कार समारंभ होत आहे. त्यात अलेजांद्रो जी इनारितूचा ‘बर्डमॅन’ आणि रिचर्ड लिंकलेटरचा ‘बॉयहूड’ यांच्यात काट्याची स्पर्धा असेल. भारताचा ‘लायर्स डायस’ सर्वोत्कृष्ट श्रेणींत आपली छाप उमटवण्यात अपयशी ठरला. वर्ल्डकप नाण्याची मागणी वाढली कोलकाता | रॉयल आॅस्ट्रेलियन मिंट आणि न्यूझीलंड पोस्ट यांनी तयार केलेल्या विश्वचषक नाण्याची मागणी वाढली आहे. नाणे मर्यादित संख्येत काढले आहेत. ते भारतातही उपलब्ध आहे. त्याची किंमत १३००० रुपयांपेक्षा जास्त आहे. नितीशकुमार चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री पाटणा | नितीशकुमार चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. ते राज्याचे २४ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी रविवारी राजभवनात शपथ घेतली. त्यांच्यासोबत २२ मंत्र्यांचाही शपथविधी झाला उपमिता वाजपेयी | कोट्टयम (केरळ) कोट्टयमचे जॉबी मॅथ्यू. शेतकरी कुटुंबात जन्म. वय ३८ वर्षे. शरीराचा ४० टक्के भाग ‘अशक्त’ आहे. जन्मापासून पायाची हाडे आणि गुडघा अविकसित आहे. वैद्यकीय भाषेत या आजाराला प्रॉक्सिमल फेमोरल फोकल डिफिशियन्सी म्हणतात. एक लाख मुलांमध्ये दोघांना तो होण्याची शक्यता असते. सध्या तरी त्यावर कुठलाही इलाज नाही. दुर्दम्य विश्वासाने परिपूर्ण जॉबींची ओळख वेगळीच आहे. ते आर्म रेसलिंगचे जगज्जेते आहेत. बॅडमिंटन, थाळीफेक, जलतरण, टेबल टेनिसवर प्रभुत्व आहे. संपूर्ण घर करंडक, पदकांनी भरले आहे. त्यांना देशाचा पहिला ‘मल्टिपर्सन स्पोर्ट‌्स‌मन’ म्हणतात. आशियाई आर्म रेसलिंगमध्ये भाग घेण्यासाठी जॉबी एप्रिलमध्ये पाकिस्तानला जात आहेत. ‘मी जिंकण्यासाठीच जात आहे. सप्टेंबरमध्ये मलेशियातील जागतिक आर्म रेसलिंगची तयारीही होईल,’ असे ते आत्मविश्वासाने सांगतात. जॉबी म्हणाले, ‘शाळेत मुले खेळत तेव्हा मी गॅलरीत उभा राहून पाहत असे. खेळायची इच्छा असायची, पण ते मला हसायचे. तेव्हाच एक दिवस चॅम्पियन होईन, असा निर्धार मी केला. दहावीत जिम जॉइन केली. पाय अशक्त असले तरी शरीराचा वरचा भाग मजबूत करण्यासाठी तासभर जिममध्ये घाम गाळतो. सकाळी पाचला उठून पेरियार नदीत पोहतो. नंतर पुशअप्स. १६ व्या वर्षी पहिल्यांदा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. मित्र, इंटरनेटद्वारेच मी खेळांशी परिचित झालो. मित्रांनी प्रोत्साहन दिले, तयारी करून घेतली. मी स्वत:ला कमजोर समजत नाही. सकाळी ९.३० वा. ऑफिसला कारने जातो. (कारचीशारीरिकठेवणीनुसाररचना)भारतपेट्रोलियममध्ये सहायक व्यवस्थापक आहे. पत्नी मेघा शास्त्रीय नृत्यांगना आहे. ५ वर्षांचा मुलगाही आहे.’ आयुष्यात विजयी व्हायचे असेल तर यांना एकदा अवश्य भेटा... दिव्यमराठी ला माहिती : मी एप्रिलमध्ये पाकिस्तानला जात आहे. आशियाई रेसलिंग विजेतेपदासाठी, सप्टेंबरमध्ये जागतिक स्पर्धेवर नजर लहानपणीदोन्ही पाय कमजोर, हातांच्या साह्याने पायऱ्या उतरत जॉबी मॅथ्यूंची उंची ३ फूट ५ इंच. लहानपणी हातांच्या साह्याने घराच्या पायऱ्या चढायचे-उतरायचे. शाळेत कोणीही सोबत खेळत नसे. ....आता हातांना सक्षम बनवले. जगात १८ स्पर्धा जिंकल्या एका हातावर शरीराचे वजन पेलतात. वर्ल्ड आर्म रेसलिंगसह १८ आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विजय. तेदेखील प्रशिक्षक, प्रशिक्षणाशिवाय. 2014 पोलंडमध्ये वर्ल्ड आर्म रेसलिंगमध्ये २ कांस्य. 2013 अमेरिकेत ड्वार्फ ऑलिम्पिकमध्ये ५ सुवर्ण. 2012 स्पेनमध्ये वर्ल्डआर्म रेसलिंगमध्ये १ सुवर्ण, २ रौप्य. 2010 इस्रायलमध्ये पॅरालिंपिक बॅडमिंटनमध्ये १ रौप्य. 2005 जपानमध्ये आर्म रेसलिंगमध्ये पहिल्यांदा रौप्य. हे आहेत जॉबी मॅथ्यू ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष २ | अंक २१८ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन प्रतिनिधी | कोल्हापूर काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केली. पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ रोजी हल्ला झाला होता. मुंबईत उपचार सुरू असताना २१ रोजी रात्री पानसरे यांचे निधन झाले. उमा यांच्यावर कोल्हापुरातील अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांची २० पथके तसेच मुंबई पोलिस शाखा स्वतंत्रपणे तपास करत अाहेत. कोल्हापुरात दुभाजकावर आदळलेली बेवारस पल्सर दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गोवा व कर्नाटकातही तपास सुरू अाहे. हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार असून ९७६४००२२७४ या क्रमांकावर माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. मारेकऱ्यांची माहिती द्या, ५ लाख बक्षीस मिळवा काॅ. पानसरे हत्याकांड बंद' संमिश्र पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या संघटनांनी पुकारलेल्या बंदला रविवारी राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोल्हापुरात मात्र कडकडीत बंद होता. मुंबईत रिपाइंने अध्यक्ष रामदास आठवलेंच्या नेतृत्वात निदर्शने केली. हा पराभव कसा विसरेल आफ्रिका मेलबर्न | सामन्याआधी चर्चा होती भारत वर्ल्डकपमध्ये द. अाफ्रिकेविरुद्ध कधीच जिंकलेला नाही याची. मात्र, टीम इंडियाने पहिल्याच चेंडूपासून आफ्रिकन्सची भंबेरी उडवली. भारताने आफ्रिकेचा इतिहासातील सर्वात मोठा पराभव केला. कधीही न विसरता येणारा... या पराभवाने संघ खचला आहे. ही जखम भरण्यासाठी बराच काळ लागेल. - एबी डिव्हिलियर्स दोन मॅच जिंकल्या, िवजयापेक्षाही मोठे आजचे यश आहे. हा कंप्लिट परफाॅर्मन्स आहे. - महेंद्रसिंग धोनी भारत : 307/7 (50) द. अाफ्रिका : 177 (40.2) 130धावांनीभारतविजयी,उपांत्यपूर्वफेरीपक्की कारण की... {इतिहासातील सर्वात मोठा पराभव {वर्ल्डकप : भारताने प्रथमच नमवले {प्रथमच 200 च्या आत सर्वबाद झाले {6 फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद वर्ल्डकपमध्ये सर्व 15 संघांना हरवणारी चौथी टीम ठरली इंडिया... धवन मॅन ऑफ द मॅच अाफ्रिकेविरुद्ध शतक ठोकणारा दुसराच भारतीय हा विजयाचा टर्निंग पॉइंट 22व्या षटकात मोहित शर्माने बाउंड्रीहून थ्रो केला व धोनीने डिव्हिलियर्सला धावबाद केेले. ही अाफ्रिकेची तिसरी विकेट होती. यानंतर अख्खा संघ 69 रन करून सर्वबाद झाला. धवनला वर्ल्डकपमधून बाहेर केले जाणार होते, पण जिद्दीच्या जोरावर रचले 2 विक्रम 137 धावा. वर्ल्डकपमध्ये द. अाफ्रिकेविरुद्ध सर्वात मोठी खेळी. 2003 मध्ये फ्लेमिंगने (न्यूझीलंड) 134 धावा केल्या. दुसराभारतीय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्डकपमध्ये शतक करणारा. 2011 मध्ये सचिनची 111 धावांची खेळी. धवनचे सासुरवाडीत शतक; शिखरची पत्नी आयेशा मेलबर्नची आहे. या मैदानावर धवनचे हे पहिलेच शतक आहे. फलंदाजी :दोन्ही सामन्यांत 300 वर धावा. आफ्रिकेविरुद्ध 127 धावांची सर्वात मोठी भागीदारी. धवन-कोहलीने दोन्ही सामन्यांत शतकी भागीदारी केली. असे करणारी पहिलीच जोडी. जगाला चकित करणारी कामगिरी गोलंदाजी प्लेसिस सोडून प्रत्येकाला तीस धावांत रोखले. दोन्ही सामन्यांत प्रतिस्पर्ध्याला 225 धावांच्या आत गारद केले. फील्डिंग 5 गडी झेलबाद. एकही झेल सोडला नाही. 2 धावबाद केले. पाकचे सर्व फलंदाज झेलबाद केले होते. 2 विक्रम अबाधित {धवनने वनडेत 7 वेळा शतक केले, दरवेळी भारत विजयी {10 वेळा मेलबर्नमध्ये 300 चा स्कोअर कुणालाही ओलांडता आला नाही. भारताचा पुढील सामना शनिवार, 28 फेब्रुवारीला यूएईविरुद्ध. (दुपारी 12 वाजेपासून स्टार स्पोर्ट्सवर) गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवर ‘मौका-मौका’ ही जाहिरात सुरू आहे. भारताच्या विजयानंतर टि्वटरवर ती अशा प्रकारे व्हायरल होऊन टॉप ट्रेंडमध्ये राहिली. मौका मौका' साेशल मीडियावर व्हायरल वर्ल्डकपमधील भारताचा सर्वांत कठीण सामना (आफ्रिकेविरुद्ध) पाहण्यासाठी आम्ही मेलबर्नला पोहोचलो. दोन तास आधीच फेटे बांधून आम्ही स्टेडियमवर दाखल होतो. हळूहळू गर्दी वाढली. इकडे धोनीने टाॅस जिंकला आणि तिकडे पाहता पाहता अख्खे स्टेडियम टीम इंडियाच्या निळ्या जर्सीने फुलून गेले. माझ्या शेजारी बसलेला एक आफ्रिकन चाहता म्हणाला, हे स्टेडियम नव्हे तर ब्ल्यू ओशन' झाले आहे. बघावे तिकडे भारतीय चाहते दिसत होते. आम्ही ऑस्ट्रेलियात सामना बघत आहोत, असे वाटतच नव्हते. भारतातच ईडन गार्डन किंवा वानखेडेवर आहोत, असे वाटत होते. इंडिया'... इंडिया'च्या नारेबाजीने आसमंत दणाणूनगेला.मोठ्यास्क्रीनवरआकडाझळकला. सामन्याला किती प्रेक्षक आहेत हे सांगणारा. ८६ हजार ८७६ एवढा आकडा बघून विश्वासच बसला नाही. गर्दीत किमान ७० हजार तरी भारतीय असतील हे मी ठामपणे सांगू शकतो. त्यात दोन औरंगाबादकरही होते. एक मी आणि दुसरा माझा मित्र ऋषी भाटिया. आम्ही थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये बरेच भारतीय उतरले होते. स्टेडियमपर्यंत ज्या कॅबने आलो तिचा ड्रायव्हरही भारतीयच होता. किती हा योगायोग! शेजारी बसलेला आफ्रिकन आपल्याच धुंदीत होता. थोड्यावेळानेतोमाझ्याशीपुन्हाबोलला.म्हणाला, यावेळीतुमच्याकडेसचिननाही.आजचासामना आम्हीच जिंकू. आफ्रिका विश्वविजेता होणार, याची खात्री असल्याने मी मुद्दाम आलो आहे.' मी काहीच उत्तर दिले उर्वरित. पान ९ मेलबर्न नव्हे ब्ल्यू ओशन' औरंगाबादचे अमित कुलकर्णी रविवारचा द. आफ्रिकेविरुद्धचा सामना पाहण्यासाठी खास मेलबर्नला गेले होते. क्षणाक्षणाला रोमहर्षक होत गेलेल्या या सामन्याचे त्यांनी पाठवलेले वर्णन खास दिव्य मराठी'च्या वाचकांसाठी... मेलबर्नमध्ये औरंगाबादकर... ऋषी भाटिया व अमित कुलकर्णी (पिवळा फेटा)