SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष २ | अंक २४६ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
अनुप गाडगे । अमरावती
जगातील सर्वांत उंच शिखर असलेला
‘माउंट एव्हरेस्ट’ सर करावा, अशी
प्रत्येक गिर्यारोहकाची आंतरिक
इच्छा असते. ही संधी केंद्र शासन व
भारतीय गिर्यारोहक संस्थेने देशातील
पाच नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना
उपलब्ध करून िदली आहे. मूळचे
पंजाबचे व सध्या अमरावती
परिक्षेत्रातील बुलडाणा जिल्ह्यातील
मेहकर येथे एएसपी म्हणून कार्यरत
असलेले सुहैल शर्मा यांचा समावेश
यामध्ये आहे.  उर्वरित. पान १२
मेहकर एएसपींची एव्हरेस्ट मोहीम
दिव्यमराठीविशेष पाच अधिकाऱ्यांची चमू करणार चढाई, पंतप्रधान हिरवी झेंडी दाखवणार
पाच अधिकाऱ्यांची चमू
नाव 	 तुकडी 	 वर्ष  केडर राज्य
सुहैल शर्मा 	 आयपीएस 	 २०१२ 	 महाराष्ट्र
विक्रम जिंदाल	 आएएस 	 २०१२ 	राजस्थान
एस. प्रभाकरन 	 आयएफएस 	२०११ 	 कर्नाटक
रवींद्र कुमार 	 आयएएस 	 २०११ 	सिक्किम
सरोज कुमारी	 आयपीएस	 २०११ 	 गुजरात
मेमध्ये पोहोचणार
‘माउंट एव्हरेस्ट’वर
समुद्र सपाटीपासून ८,८४८ मीटर
उंच असलेल्या या शिखराच्या
चढाईसाठी २६ मार्चला काठमांडू
बेसकॅम्पपासून सुरुवात केल्यानंतर
संपूर्ण प्रवास ७० दिवसांचा
राहण्याचा अंदाज आहे. वातावरण,
येणाऱ्या समस्या यशस्वीपणे पार
केल्यानंतर हे गिर्यारोहक ‘माउंट
एव्हरेस्ट’वर पोहोचतील, त्या वेळी
मे महिना उजाडलेला असेल.
पहिलीच वेळ : एकाच वेळी नागरी सेवेतील पाच
अधिकारी ‘एव्हरेस्ट’ सर करण्यासाठी जाण्याची ही
पहिलीच वेळ आहे. अशा धाडसी मोहिमेसाठी पुढे
आलेल्या या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.सुहैल शर्मा
प्रतिनिधी । कारंजा लाड
मूर्तिजापूर येथून कारंजामार्गे
यवतमाळकडे धावणाऱ्या शकुंतला
रेल्वेच्या बोगीवर आॅटो जाऊन
आदळल्याने ८ जण जखमी झाले.
ही घटना सोमवार (दि.२३) रोजी
सकाळी १० वाजताच्या सुमारास
खेर्डा (कारंजा) रस्त्यावरील रेल्वे
क्रासिंगजवळ घडली.
याबाबत मिळालेल्या
माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील
वाढोणा रामनाथ येथील (एमएच२२
यू-२४१४) क्रमांकाचा आॅटो ७ प्रवासी
घेऊन कारंजाकडे येत होता. याच
दरम्यान शकुंतला रेल्वे कारंजामार्गे
यवतमाळकडे जात असताना
खेर्डा (कारंजा)जवळील रेल्वे
क्राॅसिंगजवळ आॅटो सरळ धावत्या
रेल्वेच्या मागील बोगीवर जाऊन
आदळला. त्यामुळे आॅटो फेकल्या
जाऊन नजीकच्या खड्ड्यामध्ये पलटी
झाला. या अपघातात हृषीकेश महेंद्र
माटोडे (वय १२),  उर्वरित. पान १२
‘शकुंतले’वर आॅटो
आदळला, ८ जखमी
खेर्डा कारंजा रेल्वे क्राॅसिंगजवळ घडली घटना
अपघातानंतर खड्ड्यात पडलेला आॅटो.
प्रतिनिधी | पुणे
राज्यात अवकाळी पावसाचे
वातावरण निवळले असून पारा चढू
लागल्याने उन्हाळ्याची तीव्रता जाणवू
लागली अाहे. यापुढे पारा चढण्याची
शक्यता असल्याचा अंदाज हवामान
खात्याने वर्तवला अाहे. साेमवारी
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
भिरा (जि. रायगड) येथे ४१ अंश तर
सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव
येथे १८ अंश सेल्सियस इतकी झाली.
राज्यभरात हवामान कोरडे असल्याने
उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे.
अनेक शहरांत पाऱ्याने चाळिशी
ओलांडली असून, मध्य महाराष्ट्र
व मराठवाड्याच्या बहुतेक भागांत
कमाल तापमानात लक्षणीय वाढ
नोंदवण्यात आली आहे.
राज्यात उन्हाचा
पारा चढू लागला
अकोल्यात ३९ अंं.से.तापमान
राज्यातील तापमान
{ औरंगाबाद :	 ३७.४ 	 २२.२
{ जळगाव :	 ३८.८ 	 १८
{ परभणी :	 ३९.४ 	 २२.८
{ अकोला :	 ३९ 	 २१.३
{ अमरावती :	 ३७.६ 	 २३.४
{ चंद्रपूर :	 ३८ 	 २१
{ वर्धा :	 ३९ 	 २१.४
{ यवतमाळ :	 ३५.४ 	 २३
{ पुणे :	 ३८ 	 १९.३
प्रतिनिधी । शिर्डी
शिर्डी येथे साईसमाधी दर्शनासाठी
व्हीअायपी पेड दर्शनाची सुविधा
१ एप्रिलपासून सुरू होणार अाहे.
ितरुपती बालाजी संस्थानप्रमाणे
सामान्य साईभक्तांनाही पैसे भरून
व्हीअायपींप्रमाणे दर्शन घेता येईल.
या निर्णयामुळे दर्शनरांगेतून साईदर्शन
घेणाऱ्या साईभक्तांचा त्रास काहीसा
कमी हाेणार अाहे.
शिर्डीत १ एप्रिलपासून व्हीअायपी
दर्शनासाठी शिफारशींची गरज
संपुष्टात येणार अाहे. यापूर्वी
व्हीअायपींना पास दिले जात हाेते.
त्यामुळे सर्वमान्यांना त्रास सहन
करावा लागत हाेता.
असे असतील पेड दर्शन दर
{ दर्शन - प्रति १०० रुपये
{ नियमित अारती- ३०० रुपये
{ काकड अारती- ५०० रुपये
१ एप्रिलपासून
शिर्डीत पेड दर्शन
सामान्यही व्हीआयपी
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
यूजीसीचे पोर्टल सोडवणार
विद्यार्थ्यांच्या समस्या
नवी दिल्ली | विद्यापीठ अनुदान
आयोगाचे (यूजीसी) पोर्टल
विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण
करेल. www. Ugc.ac.in/gv1/
हेपोर्टललाँचझाले.त्यावरविद्यार्थी
तक्रार करू शकतील. कारवाई,
सद्य:स्थितीही पाहू शकतील.
स्वस्त विमान प्रवासाची
एअर आशियाची ऑफर
नवी दिल्ली | एअर आशियाने
देशात स्वस्त विमान प्रवासाची
ऑफर दिली आहे. बंगळुरू-
चेन्नईचे तिकीट ५५० रुपयांत
मिळेल. बंगळुरू-कोचीचे तिकीट
७५० रुपयांत तर बंगळुरू-गोव्याचे
तिकीट ९५० रुपयांत मिळेल.
मुंबई | निवडणुकीत दिलेल्या
आश्वासनाप्रमाणे भाजपने धनगर
समाजाला अनुसूचित जमाती (एसटी)
प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी
सोमवारी मुंबईच्या आझाद मैदानावर
भव्य मोर्चा काढण्यात आला. त्याचे
पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात
उमटले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी
सरकारला चांगलेच धारेवर धरले.
{भाजपचे सरकार सत्तेत आले
तर महिनाभरात धनगर समाजाचा
एसटीमध्ये समावेश करू, असे
आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी
बारामतीत आंदोलकांना दिले होते.
धनगर आरक्षण
आधी मोर्चा, मग
वादळी चर्चा...
बातमी. पान ४
अकोला मंगळवार, २४ मार्च २०१५
एकूण पाने १२+४=१६ । किंमत ‌~३.००
सेन्सेक्स	 28192.02
मागील	 28261.08
सोने	 26,770.00
मागील	 26,740.00
चांदी	 39,500.00
मागील	 37,000.00
डॉलर	 62.27
मागील	 62.46
युरो	 67.82
मागील	 66.79
सुविचार
आपण सर्वांना मदत करू
शकत नाही, पण प्रत्येक
जण कोणाला ना कोणाला
निश्चितच मदत करू शकतो.
- रोनाल्ड रीगन
गुरुदत्त तिवारी | भोपाळ
वाहन विम्यासाठी दरवर्षी तारीख
लक्षात ठे‌वण्याची गरज राहणार
नाही. आता एकाच वेळी ३ वर्षांची
विमा पॉलिसी घेता येईल. ही पॉलिसी
झीरो डिप्रिसिएशनची असेल. म्हणजे
पहिल्या आणि तिसऱ्या वर्षी वाहनावर
एकसारखा क्लेम मिळेल. न्यू इंडिया
अॅशुअरन्सची ही पॉलिसी २० ते २५
टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळेल. सध्या
सरकारी व खासगी क्षेत्रातील विमा
कंपन्या स्कूटर, मोटारसायकलसाठी
पहिल्या वर्षासाठी विमा म्हणून २०००
रुपये घेतात. त्यानंतर थर्ड पार्टी
अॅडमिनिस्टर्ड (टीपीए) पॉलिसीचा
हप्ता वाढत जातो. त्या हिशेबाने तीन
वर्षांच्या कव्हरवर ७ ते ८ हजार रुपये
खर्च येतो. तीन वर्षांच्या कव्हरवर हा
खर्च ५,५०० ते ६,००० रुपये असेल.
दुचाकीचा वाहन विमा त्रैवार्षिक
विशेष प्रतिनिधी । मुंबई
कृषी िवद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्त
रोजंदारी कुशल आणि अर्धकुशल
कर्मचाऱ्यांना युती सरकारने मदतीचा
हात िदला आहे. कृषी िवद्यापीठ
उभारणीत जमिनी गमावून भूमिहीन
झालेल्या १ हजार १५९ शेतकरी
रोजंदारी करणाऱ्यांना सेवेत कायम
करण्याचा महत्त्वपूर्ण िनर्णय
कृषिमंत्री एकनाथ खडसेंनी घेतला.
यात अकोल्याच्या पंजाबराव कृषी
िवद्यापीठातील २८४ कर्मचाऱ्यांचा
समावेश आहे. िवधानसभेत सोमवारी
या िनर्णयाची घोषणा झाली.
कृषी िवद्यापीठ स्थापनेकरिता
सरकारने जमिनी संपादन केल्यामुळे
भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना
राज्यातील कृषी िवद्यापीठांतर्गत
िवविध कार्यालयात मंजूर असलेल्या
पदांव्यतिरिक्त प्रक्षेत्रावरील
हंगामी कामे पूर्ण करण्यासाठी
आवश्यकतेनुसार रोजंदारीवरील
कर्मचारी घेण्यात आले होते. या
रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये १० वी, १२
वी, पदवीधर, टंकलेखक, माळी,
वाहनचालक, कृषी पदविकाधारक,
तांित्रक प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक
इत्यादी अशा शैक्षणिक अर्हता
धारण करणाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक
पात्रतेनुसार कुशल व अर्धकुशल
वर्गवारी ठरवून कामे देण्यात आली
होती. िकमान वेतनावर अनेक वर्षे
कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना
सेवेत कायम करण्यासाठी त्यांच्या
संघटकांकडून अनेक वेळा निदर्शने,
आंदोलने, धरणे व उपाेषण झाली.
तथापि गेल्या १५ वर्षांत काँग्रेस व
राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष
केले होते. मात्र, युती सरकारने त्यांना
न्याय िदला आहे, असे खडसेंनी
िनवेदनात सांिगतले.
पीकेव्हीतील २८४ रोजंदारी कर्मचारी कायम
Áकृषी िवद्यापीठांतील
१,१५९ कर्मचारी कायम
Á कृषिमंत्री एकनाथ
खडसेंची घोषणा
विशेष प्रतिनिधी | मुंबई
गुटखाविक्रीतसहभागीअसलेल्यांवर
अजामीनपात्र गुन्ह्याच्या कलमांतर्गत
कारवाई व १० वर्षांची शिक्षा ठोठावली
जाईल, अशी माहिती राज्य सरकारने
सोमवारी दिली. राज्यात गुटखा
निर्मिती व विक्रीवर पूर्णतः बंदी आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री
गिरीश बापट विधानसभेत म्हणाले,
आजवर ७२,८८७ दुकानांची तपासणी
झाली. ३,४१८ ठिकाणी ३८ कोटींंचा
गुटखा सापडला. परराज्यातून येणारा
गुटखा रोखण्यासाठी शासनाची
स्वतंत्र यंत्रणा आहे का, या काँग्रेस
आमदार नसीम खान यांच्या तारांकित
प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली.
गुटखा विक्री करणाऱ्या दुकानाचा
परवाना रद्द करावा, अशी मागणी
अनेक आमदारांनी केली. शासनाने
गुटख्याबरोबर सुगंधी सुपारी, सुगंधी
पान मसाला व सुगंधी तंबाखूवर बंदी
घातली आहे. तरीही परराज्यातून
गुटखा आणून विक्री होण्याच्या अनेक
बाबी उघडकीस आल्या. त्यातील
दोषींवरकारवाईकरण्यासाठीसंबंधित
कायद्यांमध्ये सुधारणा करण्याबाबत
न्याय व विधी विभागाचा सल्ला
घेतला जाईल, असे बापट म्हणाले.
कठोर उपाय | १० वर्षांसाठी तुरुंगात धाडण्याची तरतुद करण्यासाठी घेणार सल्ला
गुटखा विक्री अजामीनपात्रअन्न व औषध प्रशासन
मंत्री बापट यांची घोषणा
िवद्यापीठनिहाय कायम रोजंदारी कर्मचारी
२८४ ५५० ३२५
डाॅ. पंजाबराव
देशमुख कृषी
िवद्यापीठ,
अकोला
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी
िवद्यापीठ,
परभणी
डाॅ. बाळासाहेब
सावंत कोकण
कृषी िवद्यापीठ,
दापाेली३२८ अंतर्गत गुन्हा
गुटखा िवक्रीचा आरोप असलेल्यांवर
भादंविच्या ३२८ (विष व इतर बाबींच्या
माध्यमातून जिवे मारण्याचा प्रयत्न)
कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश
दिल्याचे गिरीष बापट यांनी सांगितले.
शशी कपूर यांना
फाळके पुरस्कार
७७ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते ठरले ४६ वे मानकरी
प्रतिनिधी | मुंबई/ नवी दिल्ली
‘जब जब फूल खिले’, कभी कभी,
दीवार आदी चित्रपटांतून चार दशके
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर
यांना २०१४ वर्षाचा चित्रपटसृष्टीतील
सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार
जाहीर झाला आहे.
नुकतेच ७७व्या वर्षात पदार्पण
केलेले शशी कपूर पुरस्काराचे ४६वे
मानकरी ठरले. सुवर्णकमळ, १०
लाख रुपये व शाल असे पुरस्काराचे
स्वरूप आहे. व्यावसायिक व समांतर
चित्रपट व रंगभूमी गाजवणाऱ्या कपूर
यांच्या नावावर पुरस्कार समितीच्या
शिफारशीनंतर शिक्कामोर्तब झाले.
‘कपूर घराण्याचा हा तिसरा फाळके
पुरस्कार अाहे,’ असे ट्विट त्यांचे
पुतणे व अभिनेते ऋषी कपूर यांनी
केले. याअाधी पृथ्वीराज अाणि राज
कपूर यांना हा सन्मान मिळाला हाेता.
{ जयप्रकाश चौकसे
शशी कपूर यांना फाळके पुरस्काराने गौरवले जाईल. कपूर
घराण्यातील हा तिसरा फाळके पुरस्कार आहे. सर्वात आधी
पृथ्वीराज कपूर यांना पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र,
प्रदान होण्याआधीच त्यांचे निधन झाले. राज कपूर यांनी
पित्याचा पुरस्कार स्वीकारला. २ मे १९८८ ला राज कपूर
पुरस्कार घेण्यासाठी गेले आणि त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते उठून उभे
राहिले. मात्र, त्यांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल
मोडून ते स्वत: चालत राज यांच्याजवळ गेले अन‌् त्यांच्या गळ्यात पुरस्काराचा
हार घातला. तोपर्यंत राज कपूर शुद्धीत होते. नंतर मात्र  उर्वरित. पान १२
१६०चित्रपटांतभूमिका
तीन वेळचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शशी
कपूर यांनी १६० चित्रपटांमध्ये भूमिका
व अनेक चित्रपटांची निर्मिती केली.
२०११मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मान
मिळाला. सन १९३८ मध्ये जन्मलेल्या
शशी कपूर यांनी ‘अाग’ अाणि ‘अावारा’
या चित्रपटात बालकलाकार म्हणून
कारकीर्दीस सुरुवात केली. १९६१
मधील ‘धर्मपुत्र’ चित्रपटात त्यांनी
प्रथमच मुख्य नायक साकारला.
कपूर घराण्यात तिसरा फाळके पुरस्कार
पहिला सेमीफायनल आज
सकाळी ६.३० पासून
{ न्यूझीलंड ६ वेळा सेमीमध्ये, पण
एकही विजय नाही.
{द. आफ्रिका ३ वेळा अंतिम ४
मध्ये दाखल होऊन बाहेर पडला.
न्यूझीलंड-द. आफ्रिका दोघांना
फायनलची पहिली संधी
वनडे : दोघांत ६१ लढती. न्यूझीलंड
२०, ३० आफ्रिका विजयी
वर्ल्ड कप : दोघांत ६ सामने, ४
न्यूझीलंडने, २ आफ्रिकेने जिंकले.
.कृपया, मंगळवारी
आपल्या स्टाफला सुटी द्या.
भलेही तुमचा स्टाफ कार्यालयात
नसेल, पण सुटीत द. आफ्रिकेवर
विजय मिळवण्यासाठी ते आम्हाला
पाठिंबाच देत असतील याची खात्री
बाळगा. या आणि आम्हाला पाठिंबा
द्या. आम्ही स्टेडियममध्ये आपल्या
नावे एक सीट व झेंडाही ठेवला
आहे. झेंडा आपोआप फडकत नाही.
आपला मॅक्कुलम, ब्लॅक कॅप्स कॅप्टन
स्टाफला सुटी द्या,
त्यांचा पाठिंबा हवा
मॅक्कुलमचे बाॅसना खुले पत्र

More Related Content

What's hot (12)

aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi		Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Latest Nashik news in Marathi.
Latest  Nashik news in Marathi.		Latest  Nashik news in Marathi.
Latest Nashik news in Marathi.
 
28 ahmednagar city pg1-0
28 ahmednagar city pg1-028 ahmednagar city pg1-0
28 ahmednagar city pg1-0
 
Latest jalgaon News In Marathi
Latest jalgaon News In Marathi		Latest jalgaon News In Marathi
Latest jalgaon News In Marathi
 

More from divyamarathibhaskarnews (14)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Akola news in marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष २ | अंक २४६ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन अनुप गाडगे । अमरावती जगातील सर्वांत उंच शिखर असलेला ‘माउंट एव्हरेस्ट’ सर करावा, अशी प्रत्येक गिर्यारोहकाची आंतरिक इच्छा असते. ही संधी केंद्र शासन व भारतीय गिर्यारोहक संस्थेने देशातील पाच नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना उपलब्ध करून िदली आहे. मूळचे पंजाबचे व सध्या अमरावती परिक्षेत्रातील बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एएसपी म्हणून कार्यरत असलेले सुहैल शर्मा यांचा समावेश यामध्ये आहे. उर्वरित. पान १२ मेहकर एएसपींची एव्हरेस्ट मोहीम दिव्यमराठीविशेष पाच अधिकाऱ्यांची चमू करणार चढाई, पंतप्रधान हिरवी झेंडी दाखवणार पाच अधिकाऱ्यांची चमू नाव तुकडी वर्ष केडर राज्य सुहैल शर्मा आयपीएस २०१२ महाराष्ट्र विक्रम जिंदाल आएएस २०१२ राजस्थान एस. प्रभाकरन आयएफएस २०११ कर्नाटक रवींद्र कुमार आयएएस २०११ सिक्किम सरोज कुमारी आयपीएस २०११ गुजरात मेमध्ये पोहोचणार ‘माउंट एव्हरेस्ट’वर समुद्र सपाटीपासून ८,८४८ मीटर उंच असलेल्या या शिखराच्या चढाईसाठी २६ मार्चला काठमांडू बेसकॅम्पपासून सुरुवात केल्यानंतर संपूर्ण प्रवास ७० दिवसांचा राहण्याचा अंदाज आहे. वातावरण, येणाऱ्या समस्या यशस्वीपणे पार केल्यानंतर हे गिर्यारोहक ‘माउंट एव्हरेस्ट’वर पोहोचतील, त्या वेळी मे महिना उजाडलेला असेल. पहिलीच वेळ : एकाच वेळी नागरी सेवेतील पाच अधिकारी ‘एव्हरेस्ट’ सर करण्यासाठी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा धाडसी मोहिमेसाठी पुढे आलेल्या या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.सुहैल शर्मा प्रतिनिधी । कारंजा लाड मूर्तिजापूर येथून कारंजामार्गे यवतमाळकडे धावणाऱ्या शकुंतला रेल्वेच्या बोगीवर आॅटो जाऊन आदळल्याने ८ जण जखमी झाले. ही घटना सोमवार (दि.२३) रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास खेर्डा (कारंजा) रस्त्यावरील रेल्वे क्रासिंगजवळ घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वाढोणा रामनाथ येथील (एमएच२२ यू-२४१४) क्रमांकाचा आॅटो ७ प्रवासी घेऊन कारंजाकडे येत होता. याच दरम्यान शकुंतला रेल्वे कारंजामार्गे यवतमाळकडे जात असताना खेर्डा (कारंजा)जवळील रेल्वे क्राॅसिंगजवळ आॅटो सरळ धावत्या रेल्वेच्या मागील बोगीवर जाऊन आदळला. त्यामुळे आॅटो फेकल्या जाऊन नजीकच्या खड्ड्यामध्ये पलटी झाला. या अपघातात हृषीकेश महेंद्र माटोडे (वय १२), उर्वरित. पान १२ ‘शकुंतले’वर आॅटो आदळला, ८ जखमी खेर्डा कारंजा रेल्वे क्राॅसिंगजवळ घडली घटना अपघातानंतर खड्ड्यात पडलेला आॅटो. प्रतिनिधी | पुणे राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण निवळले असून पारा चढू लागल्याने उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली अाहे. यापुढे पारा चढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला अाहे. साेमवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद भिरा (जि. रायगड) येथे ४१ अंश तर सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव येथे १८ अंश सेल्सियस इतकी झाली. राज्यभरात हवामान कोरडे असल्याने उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. अनेक शहरांत पाऱ्याने चाळिशी ओलांडली असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतेक भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यात उन्हाचा पारा चढू लागला अकोल्यात ३९ अंं.से.तापमान राज्यातील तापमान { औरंगाबाद : ३७.४ २२.२ { जळगाव : ३८.८ १८ { परभणी : ३९.४ २२.८ { अकोला : ३९ २१.३ { अमरावती : ३७.६ २३.४ { चंद्रपूर : ३८ २१ { वर्धा : ३९ २१.४ { यवतमाळ : ३५.४ २३ { पुणे : ३८ १९.३ प्रतिनिधी । शिर्डी शिर्डी येथे साईसमाधी दर्शनासाठी व्हीअायपी पेड दर्शनाची सुविधा १ एप्रिलपासून सुरू होणार अाहे. ितरुपती बालाजी संस्थानप्रमाणे सामान्य साईभक्तांनाही पैसे भरून व्हीअायपींप्रमाणे दर्शन घेता येईल. या निर्णयामुळे दर्शनरांगेतून साईदर्शन घेणाऱ्या साईभक्तांचा त्रास काहीसा कमी हाेणार अाहे. शिर्डीत १ एप्रिलपासून व्हीअायपी दर्शनासाठी शिफारशींची गरज संपुष्टात येणार अाहे. यापूर्वी व्हीअायपींना पास दिले जात हाेते. त्यामुळे सर्वमान्यांना त्रास सहन करावा लागत हाेता. असे असतील पेड दर्शन दर { दर्शन - प्रति १०० रुपये { नियमित अारती- ३०० रुपये { काकड अारती- ५०० रुपये १ एप्रिलपासून शिर्डीत पेड दर्शन सामान्यही व्हीआयपी न्यूजइनबॉक्स गुडन्यूज यूजीसीचे पोर्टल सोडवणार विद्यार्थ्यांच्या समस्या नवी दिल्ली | विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) पोर्टल विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करेल. www. Ugc.ac.in/gv1/ हेपोर्टललाँचझाले.त्यावरविद्यार्थी तक्रार करू शकतील. कारवाई, सद्य:स्थितीही पाहू शकतील. स्वस्त विमान प्रवासाची एअर आशियाची ऑफर नवी दिल्ली | एअर आशियाने देशात स्वस्त विमान प्रवासाची ऑफर दिली आहे. बंगळुरू- चेन्नईचे तिकीट ५५० रुपयांत मिळेल. बंगळुरू-कोचीचे तिकीट ७५० रुपयांत तर बंगळुरू-गोव्याचे तिकीट ९५० रुपयांत मिळेल. मुंबई | निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भाजपने धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. {भाजपचे सरकार सत्तेत आले तर महिनाभरात धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत आंदोलकांना दिले होते. धनगर आरक्षण आधी मोर्चा, मग वादळी चर्चा... बातमी. पान ४ अकोला मंगळवार, २४ मार्च २०१५ एकूण पाने १२+४=१६ । किंमत ‌~३.०० सेन्सेक्स 28192.02 मागील 28261.08 सोने 26,770.00 मागील 26,740.00 चांदी 39,500.00 मागील 37,000.00 डॉलर 62.27 मागील 62.46 युरो 67.82 मागील 66.79 सुविचार आपण सर्वांना मदत करू शकत नाही, पण प्रत्येक जण कोणाला ना कोणाला निश्चितच मदत करू शकतो. - रोनाल्ड रीगन गुरुदत्त तिवारी | भोपाळ वाहन विम्यासाठी दरवर्षी तारीख लक्षात ठे‌वण्याची गरज राहणार नाही. आता एकाच वेळी ३ वर्षांची विमा पॉलिसी घेता येईल. ही पॉलिसी झीरो डिप्रिसिएशनची असेल. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या वर्षी वाहनावर एकसारखा क्लेम मिळेल. न्यू इंडिया अॅशुअरन्सची ही पॉलिसी २० ते २५ टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळेल. सध्या सरकारी व खासगी क्षेत्रातील विमा कंपन्या स्कूटर, मोटारसायकलसाठी पहिल्या वर्षासाठी विमा म्हणून २००० रुपये घेतात. त्यानंतर थर्ड पार्टी अॅडमिनिस्टर्ड (टीपीए) पॉलिसीचा हप्ता वाढत जातो. त्या हिशेबाने तीन वर्षांच्या कव्हरवर ७ ते ८ हजार रुपये खर्च येतो. तीन वर्षांच्या कव्हरवर हा खर्च ५,५०० ते ६,००० रुपये असेल. दुचाकीचा वाहन विमा त्रैवार्षिक विशेष प्रतिनिधी । मुंबई कृषी िवद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्त रोजंदारी कुशल आणि अर्धकुशल कर्मचाऱ्यांना युती सरकारने मदतीचा हात िदला आहे. कृषी िवद्यापीठ उभारणीत जमिनी गमावून भूमिहीन झालेल्या १ हजार १५९ शेतकरी रोजंदारी करणाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण िनर्णय कृषिमंत्री एकनाथ खडसेंनी घेतला. यात अकोल्याच्या पंजाबराव कृषी िवद्यापीठातील २८४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. िवधानसभेत सोमवारी या िनर्णयाची घोषणा झाली. कृषी िवद्यापीठ स्थापनेकरिता सरकारने जमिनी संपादन केल्यामुळे भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना राज्यातील कृषी िवद्यापीठांतर्गत िवविध कार्यालयात मंजूर असलेल्या पदांव्यतिरिक्त प्रक्षेत्रावरील हंगामी कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार रोजंदारीवरील कर्मचारी घेण्यात आले होते. या रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये १० वी, १२ वी, पदवीधर, टंकलेखक, माळी, वाहनचालक, कृषी पदविकाधारक, तांित्रक प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक इत्यादी अशा शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल व अर्धकुशल वर्गवारी ठरवून कामे देण्यात आली होती. िकमान वेतनावर अनेक वर्षे कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी त्यांच्या संघटकांकडून अनेक वेळा निदर्शने, आंदोलने, धरणे व उपाेषण झाली. तथापि गेल्या १५ वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, युती सरकारने त्यांना न्याय िदला आहे, असे खडसेंनी िनवेदनात सांिगतले. पीकेव्हीतील २८४ रोजंदारी कर्मचारी कायम Áकृषी िवद्यापीठांतील १,१५९ कर्मचारी कायम Á कृषिमंत्री एकनाथ खडसेंची घोषणा विशेष प्रतिनिधी | मुंबई गुटखाविक्रीतसहभागीअसलेल्यांवर अजामीनपात्र गुन्ह्याच्या कलमांतर्गत कारवाई व १० वर्षांची शिक्षा ठोठावली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी दिली. राज्यात गुटखा निर्मिती व विक्रीवर पूर्णतः बंदी आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट विधानसभेत म्हणाले, आजवर ७२,८८७ दुकानांची तपासणी झाली. ३,४१८ ठिकाणी ३८ कोटींंचा गुटखा सापडला. परराज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा आहे का, या काँग्रेस आमदार नसीम खान यांच्या तारांकित प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली. गुटखा विक्री करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी अनेक आमदारांनी केली. शासनाने गुटख्याबरोबर सुगंधी सुपारी, सुगंधी पान मसाला व सुगंधी तंबाखूवर बंदी घातली आहे. तरीही परराज्यातून गुटखा आणून विक्री होण्याच्या अनेक बाबी उघडकीस आल्या. त्यातील दोषींवरकारवाईकरण्यासाठीसंबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्याबाबत न्याय व विधी विभागाचा सल्ला घेतला जाईल, असे बापट म्हणाले. कठोर उपाय | १० वर्षांसाठी तुरुंगात धाडण्याची तरतुद करण्यासाठी घेणार सल्ला गुटखा विक्री अजामीनपात्रअन्न व औषध प्रशासन मंत्री बापट यांची घोषणा िवद्यापीठनिहाय कायम रोजंदारी कर्मचारी २८४ ५५० ३२५ डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी िवद्यापीठ, अकोला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी िवद्यापीठ, परभणी डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी िवद्यापीठ, दापाेली३२८ अंतर्गत गुन्हा गुटखा िवक्रीचा आरोप असलेल्यांवर भादंविच्या ३२८ (विष व इतर बाबींच्या माध्यमातून जिवे मारण्याचा प्रयत्न) कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्याचे गिरीष बापट यांनी सांगितले. शशी कपूर यांना फाळके पुरस्कार ७७ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते ठरले ४६ वे मानकरी प्रतिनिधी | मुंबई/ नवी दिल्ली ‘जब जब फूल खिले’, कभी कभी, दीवार आदी चित्रपटांतून चार दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना २०१४ वर्षाचा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतेच ७७व्या वर्षात पदार्पण केलेले शशी कपूर पुरस्काराचे ४६वे मानकरी ठरले. सुवर्णकमळ, १० लाख रुपये व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यावसायिक व समांतर चित्रपट व रंगभूमी गाजवणाऱ्या कपूर यांच्या नावावर पुरस्कार समितीच्या शिफारशीनंतर शिक्कामोर्तब झाले. ‘कपूर घराण्याचा हा तिसरा फाळके पुरस्कार अाहे,’ असे ट्विट त्यांचे पुतणे व अभिनेते ऋषी कपूर यांनी केले. याअाधी पृथ्वीराज अाणि राज कपूर यांना हा सन्मान मिळाला हाेता. { जयप्रकाश चौकसे शशी कपूर यांना फाळके पुरस्काराने गौरवले जाईल. कपूर घराण्यातील हा तिसरा फाळके पुरस्कार आहे. सर्वात आधी पृथ्वीराज कपूर यांना पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, प्रदान होण्याआधीच त्यांचे निधन झाले. राज कपूर यांनी पित्याचा पुरस्कार स्वीकारला. २ मे १९८८ ला राज कपूर पुरस्कार घेण्यासाठी गेले आणि त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते उठून उभे राहिले. मात्र, त्यांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल मोडून ते स्वत: चालत राज यांच्याजवळ गेले अन‌् त्यांच्या गळ्यात पुरस्काराचा हार घातला. तोपर्यंत राज कपूर शुद्धीत होते. नंतर मात्र उर्वरित. पान १२ १६०चित्रपटांतभूमिका तीन वेळचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शशी कपूर यांनी १६० चित्रपटांमध्ये भूमिका व अनेक चित्रपटांची निर्मिती केली. २०११मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मान मिळाला. सन १९३८ मध्ये जन्मलेल्या शशी कपूर यांनी ‘अाग’ अाणि ‘अावारा’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली. १९६१ मधील ‘धर्मपुत्र’ चित्रपटात त्यांनी प्रथमच मुख्य नायक साकारला. कपूर घराण्यात तिसरा फाळके पुरस्कार पहिला सेमीफायनल आज सकाळी ६.३० पासून { न्यूझीलंड ६ वेळा सेमीमध्ये, पण एकही विजय नाही. {द. आफ्रिका ३ वेळा अंतिम ४ मध्ये दाखल होऊन बाहेर पडला. न्यूझीलंड-द. आफ्रिका दोघांना फायनलची पहिली संधी वनडे : दोघांत ६१ लढती. न्यूझीलंड २०, ३० आफ्रिका विजयी वर्ल्ड कप : दोघांत ६ सामने, ४ न्यूझीलंडने, २ आफ्रिकेने जिंकले. .कृपया, मंगळवारी आपल्या स्टाफला सुटी द्या. भलेही तुमचा स्टाफ कार्यालयात नसेल, पण सुटीत द. आफ्रिकेवर विजय मिळवण्यासाठी ते आम्हाला पाठिंबाच देत असतील याची खात्री बाळगा. या आणि आम्हाला पाठिंबा द्या. आम्ही स्टेडियममध्ये आपल्या नावे एक सीट व झेंडाही ठेवला आहे. झेंडा आपोआप फडकत नाही. आपला मॅक्कुलम, ब्लॅक कॅप्स कॅप्टन स्टाफला सुटी द्या, त्यांचा पाठिंबा हवा मॅक्कुलमचे बाॅसना खुले पत्र