SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक ०३ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
गुडन्यूज
सोलापूर शुक्रवार, ३ एिप्रल २०१५
एकूण पाने १२+४+८+४=२८। किंमत ‌~३.००
सुविचार
पैसे कमावण्यासाठी व्यवसाय
करू नका. आणखी चांगल्या
पद्धतीने सेवा देता यावी यासाठी
पैसा मिळवा.
मार्क झुकेरबर्ग
आमची
माती
आमची
माणसं
जाहिरात
पुरवणी
दिव्यमराठीविशेष महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर दीपिका पदुकोनच्या विरुद्ध उभी राहिली सोनाक्षी सिन्हा
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
महिला सबलीकरणावर बनलेल्या
"माय चाॅइस' व्हिडिओ कॅम्पेनने
भारतीय सोशल मीडिया दोन
गटात दुभंगला. पहिला गट दीपिका
पदुकोनच्या ‘माय चाॅइस’शी
जोडला गेला. यात बहुतेक
सेलिब्रिटी आणि महिलावादी
आहेत. अमिताभ बच्चनपासून
फरहान अख्तर आणि शबाना
आझमीपासून आलिया भट्टसारख्या
कलाकारांनी त्याचे कौतुक केले,
तर दुसऱ्या गटाचे म्हणणे असे की,
महिला सबलीकरणाच्या नावाखाली
हे निव्वळ मार्केटिंग आहे. यामध्ये
सामान्य ट्विटर यूजर्सशिवाय
लेखिका शोभा डे आणि अभिनेत्री
सोनाक्षी सिन्हा सहभागी आहेत.
सोनाक्षीने म्हटले की, महिला
सबलीकरणाचा अर्थ प्रत्येक वेळी
तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे
परिधान करता; कुणाशी संबंध जोडू
करू इच्छिता, असा होत नाही.
सबलीकरणाचा अर्थ महिलांना
रोजगार आणि सक्षम बनवणे हा
आहे. ज्यांना गरज आहे अशा
महिलांचे सबलीकरण व्हायला हवे.
‘माय चाॅइस’वर दुभंगला सोशल मीडिया!
मते
46
लाखांवर
पसंत
28
हजारांवर
नापसंत
12
हजारांवर
मते
7लाखां
जवळ
पसंत
7
हजारांवर
नापसंत
262
दीपिका म्हणते : मी माझ्या पद्धतीने जीवन
जगू इच्छिते. हवे ते कपडे घालणे, कोणावर
प्रेम करायचे व कोणासोबत रहायचे हे मीच
ठरवणार. यामुळे महिलांकडे पाहण्याचा
दृष्टिकोन बदलेल हा दावा होता.
काय आहे माय चॉइस?
२ मिनिटे ३४ सेकंदांच्या या व्हिडिओत
दीपिकासह ९९ महिलांच्या सर्व पैलूंवर प्रकाश
टाकला आहे. पुरुषांनी संकुचित विचारसरणी
बदलावी, असे दीपिकाचे आवाहन आहे. व्होग या
नियतकालिकाच्या या मोहिमेत महिलांचा मर्जीने
जगण्याचा अधिकार दर्शवण्यात आला आहे.
पुरुष अावृत्ती
महिला अावृत्ती पुरुषांसाठीची आवृत्ती
पुरुषांसाठीची माय चॉइसची आवृत्ती
मंगळवारी आली. ती ब्रेट हाऊस
फिल्मच्या अंकुर पोद्दारने तयार
केली. त्यातून पुरुषी विचार आला.
‘घरी यायला उशीर झाला म्हणजे मी
धोका देत आहे’ असा अर्थ होत नाही,
असे त्यातील संवाद आहेत.
न्यूजइनबॉक्स
७ हजार कोटी रुपयांनी
संपूर्ण देशभरात वायफाय
नवी दिल्ली | येत्या दोन-तीन वर्षांत
संपूर्ण देशात बीएसएनएलकडून
थ्रीजी, फोरजी नेटवर्क असलेले
वायफाय हॉटस्पॉट बसवले
जातील. यात सात हजार कोटी
रुपये खर्च होतील. वाराणसीत
वायफाय सेवा सुरू झाली आहे.
हार्वर्ड विद्यापीठाचे मुंबईत
आंतरराष्ट्रीय कार्यालय
न्यूयॉर्क | हार्वर्ड विद्यापीठ
लवकरच मुंबईत आपले
आंतरराष्ट्रीय कार्यालय सुरू
करणार आहे. यासोबतच कंपनी
चीन व दक्षिण आफ्रिकेतही
कार्यालय सुरू करेल. ही संस्था
विद्यापीठे, महाविद्यालयांना
संशोधन कार्यात मदत करेल.
जाट आरक्षण : केंद्राची
सुप्रीम कोर्टात याचिका
नवी दिल्ली | जाट समाजाला
आरक्षण देण्यासाठी त्यांचा
ओबीसीत समावेश करण्यासंबंधी
याचिका केंद्र सरकारने सर्वोच्च
न्यायालयात दाखल केली.
न्यायालयाने १७ मार्च रोजी जाटांना
आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा
निर्णय रद्द केला होता.
एक दिवसात १३.४५ लाख
ई -रेल्वे तिकिटे विकली
नवी दिल्ली | नवीन नियम लागू
झाल्याच्या पहिल्याच दिवशी
बुधवारी १३.४५ लाख रेल्वे
तिकिटे ऑनलाइन बुक झाली. हा
एक विक्रम आहे. १ एप्रिलपासून
अॅडव्हान्स तिकीट बुकिंगचा
अवधी ६० दिवसांवरून १२०
दिवस करण्यात आला आहे.
काशी हनुमान मंदिरात
गुलाम अली गाणार गझल
वाराणसी | येथे ८ एप्रिलपासून सुरू
होतअसलेल्यासंकटमोचनसंगीत
महोत्सवात
यंदा
पाकिस्तानी
गझल गायक
गुलाम अली
गझलगायन
करणार आहेत. या महोत्सवात
भाग घेण्याची गुलाम अली यांची
ही पहिलीच वेळ आहे.
मॉडेल कार
बंगळुरूत गुुरुवारी फ्रीस्केल कप
२०१५ रोबोटिक्स स्पर्धेत आपल्या
मॉडेल कारशी खटपट करणारा एक
विद्यार्थी. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी
व राष्ट्रीय विज्ञान संस्थेकडून ही
स्पर्धा भरवली जाते.
प्रमोद चुंचूवार | मुंबई
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी
सरकारने आणलेल्या भूसंपादन
विधेयकाला संसदेची मान्यता
मिळायची असतानाच राज्य सरकारने
मात्र या कायद्यातील आक्षेपार्ह
तरतुदी जशास तशा लागू केल्या
आहेत. यामुळे सरकारी व खासगी
प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी जमीन
मालकांच्या संमतीची गरज भासणार
नाही. केंद्राच्या अध्यादेशाला कडवा
विरोध करणाऱ्या शिवसेनेने मात्र
त्यास मूक संमती देत आपल्या दुटप्पी
भूमिकेचे दर्शन घडवले आहे. राज्यात
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
असतानाच विरोधकांना अंधारात
ठेवून १३ मार्च रोजीच हा निर्णय
घेण्यात आला आहे.
तत्कालीन यूपीए सरकारच्या
भूसंपादन विधेयकात बदल करत
मोदी सरकारने ३१ डिसेंबर २०१४
रोजी नव्या कायद्याचा अध्यादेश
काढला. यात ८० टक्के मालकांच्या
संमतीची अट काढून टाकण्यात आली
अाहे. तसेच खासगी प्रकल्पांसाठी
भूसंपादन कायदा लागू झाला आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय
अधिवेशन ९ मार्चपासून सुरू झाले.
१३ मार्चला महसूल विभागाने एक
अधिसूचना काढली. उपसचिव
एस. के. गावडे यांच्या स्वाक्षरीने
निघालेल्या या अधिसूचनेने राज्यात
 उर्वरित. पान १२
भूसंपादन कायदा राज्यातही,
सेना गप्प, विरोधक अंधारात
गुपचूप अंमल | संमतीची अट रद्द, अधिसूचना १३ मार्चलाच निघाली
विशेषवृत्त या प्रकल्पांना
सूट मिळेल
1 जमिनीची मालकी
शासनाकडे
निहित असेल तेथे
सार्वजनिक-खासगी
भागीदारीने अंतर्गत
शाळा, रुग्णालये,
वीज प्रकल्प यांसह
पायाभूत सुविधा
2 विद्युतीकरण,
सिंचन, रस्ते,
पाणीपुरवठा व
जलसंधारण यांसह
ग्रामीण भागातील
पायाभूत सुविधा
3 परवडण्याजोगी घरे
व गरिबांसाठी घरे
4 औद्योगिक कॉरिडार्स
5 संरक्षण सिद्धता
किंवा संरक्षण
उत्पादन यांसह
राष्ट्रीय सुरक्षा व
संरक्षणदृष्ट्या
महत्वाचे प्रकल्प.
नंतर बदल होऊ शकतात
भूसंपादन अध्यादेश लागू करण्याचा धाेरणात्मक
निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. हा अंतिम निर्णय
नाही. संसदेत हा कायदा झाल्यानंतर बदल हाेऊ
शकतात.
एकनाथ खडसे, महसूल मंत्री
अधिसूचना काढणे गैर नाही
केंद्राने अध्यादेश काढल्यानंतर किंवा
राज्याच्या एखाद्या कायद्याच्या नियमात
अधिसूचनेद्वारे बदल करण्याचा अधिकार राज्याला
अाहे.अधिवेशन सुरू असताना ती काढणे गैर नाही.
- अॅड. उदय वारुंजीकर, ज्येष्ठ विधिज्ञ, घटनातज्ज्ञ
काय आहेत प्रकरण दोन आणि तीन
1. प्रकरण : दोन
खासगी कंपन्यांसाठी भूसंपादनात
जिल्हाधिकारी मालकांच्या संमतीची
प्रक्रिया सुरू करतील. पुनर्वसन व
पुनर्स्थापनेसाठी वाटाघाटीतून सहमती
झालेल्या अटी व शर्ती, भूसंपादन
करणाऱ्या संस्थेने अभिवचन
दिलेली नुकसान भरपाई वाचून
दाखवली जाईल. अनुसूचित क्षेत्रात
ग्रामसभेचीही संमती घ्यावी लागेल.
2. प्रकरण : तीन
प्रारंभिक अधिसूचनेनंतर दोन
महिन्यांत जिल्हाधिकारी पुढील
कामे करतील. मृत व्यक्तींच्या
नोंदी वगळून कायदेशीर वारसांची
नोंद, गहाण व कर्जे,वन कायदा,
जमिनीवरील झाडे व विहिरी यांची
नोंद घेणे, उभ्या किंवा पेरणी
केलेल्या पिंकांच्या क्षेत्रासंबंधात नोंद
याचा त्यात समावेश आहे.
परिणाम असा : {खासगी कंपन्यांसाठी संमती न घेता भूसंपादन
होईल. आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेता येतील. {विहिरी, पिके
यांची नोंद घ्यावी लागणार नसल्याने नुकसान भरपाई कमी.
सही केली नाही
विधेयकातील आक्षेपार्ह
तरतुदींसह अधिसूचनेसाठी
फाइल मंजुरीकरिता आली होती.
मात्र, आमची भूमिका याविरुद्ध
असल्याने मी सही केली नाही.
कॅबिनेटमध्ये काय चर्चा झाली ते
मला माहिती नाही.
संजय राठोड, महसूल राज्यमंत्री
आधी अभ्यास करतो
केंद्राच्या भूसंपादन
वटहुकुमाच्या
अंमलबजावणी करण्यासाठी
अधिसूचना निघाल्याची मला
कल्पना नाही. त्या अधिसूचनेची
आधी प्रत मिळवतो आणि त्याचा
अभ्यास करून सांगतो.
राधाकृष्ण विखे पाटील,
विरोधी पक्षनेते, विधानसभा
साेलापूर । महापालिका करापोटी
रेल्वे विभागाकडे सुमारे सात ते आठ
कोटी रुपये थकबाकी असून, त्याच्या
वसुलीसाठी महापालिकेने रेल्वे
विभागाचा पाणीपुरवठा आणि ड्रेनेज
लाइन बंद करण्याची मोहीम मागील
दोन दिवसांपासून हाती घेतली आहे.
१२ ठिकाणची ड्रेनेज लाइन बंद केली,
तर एका ठिकाणच्या सहा इंचीसह
सहा ठिकाणचा  उर्वरित पान १२
रेल्वेचा सहा ठिकाणचा
पाणीपुरवठा केला बंद
महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी कारवाई
कारवाई सुरूच राहणार
^रेल्वे विभागास अनेक ठिकाणांहून
पाणीपुरवठा मनपाकडून करण्यात
येत आहे. ३० ते ३२ ठिकाणांहून ड्रेनेज
लाइन जोडली आहे. ती तोडण्यात येत
आहे. रेल्वेकडून रक्कम न आल्यास
यापुढे कारवाई सुरूच ठेवणार आहे.
अमिता दगडे-पाटील, साहाय्यक आयुक्त,
मनपा
सोलापूर. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त येथील जैन
महिला मंडळाच्या वतीने महावीरांच्या जन्मावर आधारित
नाटिका सादर करण्यात आली. महावीरांच्या जन्मापूर्वीची
सामाजिक परिस्थिती, महावीरांच्या मातेची सोळा स्वप्ने, ओटी
भरण, जन्म यासह विविध प्रसंग नाटिकेतून मांडण्यात आले.
भगवान महावीरांची जन्मगाथा...
कलाकार - मानसी शहा, सुरेखा शहा,
नीता शहा, मीना पटवा, आरती दोशी,
प्रतिमा गांधी, सोनिया चंकेश्वरा, श्रृती शहा.
भूमिका - सिध्दार्थ राजा - शर्मिला शहा,
त्रिशला राणी - डॉ. नेहा गांधी
यांनी घेतले परिश्रम - मंडळाच्या
अध्यक्ष संगीता शहा, उपाध्यक्ष डॉ.
सरिता कोठाडिया, सचिव प्रीती
मेहता, पल्लवी मेहता, निशा गांधी,
पूजा शहा.
सोलापूर । युनायटेड फोरम ऑफ बँक
एम्प्लॉइज युनियनचे निमंत्रक गजानन
हरी मेहेंदळे (वय ६३) यांचे गुरुवारी
पुणे येथील एका खासगी रुग्णालयात
िनधन झाले.
त्यांना कर्करोग
होता. उपचार सुरू
असतानाच दुपारी
साडेतीनच्या
सुमारास
त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी
पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत
अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्यामागे पत्नी, मुलगा तेजस
आणि मुलगी डॉ. रसिका कुलकर्णी
(पंढरपूर) असा परिवार आहे. (कै.)
मेहेंदळे बँक ऑफ इंडियातून िनवृत्त
झाले. त्यानंतरही त्यांची संघटनेशी
असलेली नाळ तुटली नाही.
कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात ते
अग्रभागी असत.
कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी
ते गेली काही महिने लढत होते.
मार्चमध्ये झालेल्या या आंदोलनाची
दखल व्यवस्थापनाला घ्यावी लागली.
संघटनेशी वाटाघाटी झाल्या. या
प्रक्रियेत श्री. मेहेंदळे यांचा मोठा
वाटा होता. त्यांच्या िनधनाने बँक
कर्मचाऱ्यांचा मोठा आधारवड
कोसळल्याची भावना कर्मचाऱ्यांनी
व्यक्त केली.
गजानन मेहेंदळे यांचे िनधन
{महागाई, भ्रष्टाचार मुद्द्यांवर
असमाधान, परराष्ट्र प्रतिमा
सुधारल्याचे मात्र मान्य.
{धार्मिक ध्रुवीकरण नाही. संघाचा
अजेंडा चालवत नाहीत.
{महागाई मुद्दा प्राधान्याने
घ्यावा. मग
भ्रष्टाचार, राम
मंदिर शेवटी.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने
१० महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या
निमित्ताने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात
मोदींची लोकप्रियता ६५ वरून ३७
टक्क्यांपर्यंत घसरल्याचे स्पष्ट झाले आहे.
असे असले तरी सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून
३० टक्क्यांसह मोदींवरच शिक्कामोर्तब
झाले. त्यांच्या खालोखाल दिल्लीचे
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या
पदासाठी पसंती मिळाली आहे. इंडिया टुडे
ग्रुप आणि सिसेरोने मूड आॅफ नेशन' या
नावाने हे सर्वेक्षण केले आहे.
लोकप्रियता घटली; परंतु
मोदी अजूनही बेस्ट पीएम!
1.अरविंद केजरीवाल, दिल्ली
2.अखिलेश यादव, उ. प्र.
3.चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेश
4.ममता बॅनर्जी, प. बंगाल
5.नवीन पटनायक, ओडिशा
२०%
मते पक्षात तेच
पंतप्रधानपदाचे
दावेदार
इंडिया टुडे-सिसेरो
सर्वेक्षण निष्कर्ष
सरकारचे १० महिने; जनमत काय?
69%
25%
समाधानकारक
अपेक्षेपेक्षा कमी
कामगिरी
काँग्रेसबाबत काय वाटते
आज लोकसभा निवडणुका
झाल्यास भाजपच्या मतांचा टक्का
वाढेल, पण जागा मात्र घटतील.
राहुल गांधी
पक्षाचा
कायापालट
करतील
४६%
लोकांना
वाटते.
टॉप फाइव्ह सीएम
अतुल पेठकर | घुमान (पंजाब)
भाषा भगिनींचा संगम असलेल्या
पंजाबातील घुमानमध्ये शुक्रवारपासून
८८ व्या अ. भा. मराठी साहित्य
संमेलनाला प्रारंभ होत आहे. दुपारी
४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या हस्ते व पंजाबचे मुख्यमंत्री
प्रकाशसिंग बादल यांच्या उपस्थितीत
संमेलनाचे उद‌्घाटन होईल.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी
लेखक गुरुदयालसिंह, शरद पवार,
सुशीलकुमार शिंदे, िशवसेना
पक्षप्रमुखउद्धवठाकरेयांचीउपस्थिती
राहील. नियोजित संमेलनाध्यक्ष
सदानंद मोरे, िवद्यमान संमेलनाध्यक्ष
फ. मुं. शिंदे यांचे गुरुवारीच आगमन
झाले. महामंडळाच्या अध्यक्षा माधवी
वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण, नंतर
नांदेडच्या नानक साई फाउंडेशनची
भक्त नामदेव ग्रंथदिंडी निघणार आहे.
सारस्वत मेळ्यासाठी घुमान
सजले; आजपासून संमेलन
साहित्य संमेलनासाठी पंजाबातील घुमाननगरी सज्ज झाली आहे. संत नामदेव दरबाराच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानी.
आज उद‌्घाटन : ज्ञानपीठ पुरस्कार िवजेते गुरुदयालसिंग यांची उपस्थिती
संमेलननगरीत रिमझिम पाऊस, पण मंडप वाॅटरप्रूफ
संमेलननगरीत गुरुवारी सायंकाळी रिमझिम पाऊस झाला, परंतु संपूर्ण मंडप
वाॅटरप्रूफ असल्याने काहीही अडचण येणार नसल्याची ग्वाही संयोजकांनी दिली
आहे. १० हजारांहून अधिक रसिक हजेरी लावतील, असा विश्वास त्यांना आहे.
भाजपच्या नवनिर्वाचित
कार्यकारिणीची
दोन दिवसीय बैठक
शुक्रवारपासून
कर्नाटकातील
बंगळुरूत होत आहे.
नरेंद्र मोदी यांचे
गुरुवारी राज्यातील
नेते बी.एस. येदियुरप्पा
यांनी स्वागत केले.
भाजप जगात सर्वात
मोठा पक्ष ठरल्याचा
आनंद बैठकीत अाहे.
भूसंपादन विधेयकाला
होणाऱ्या विरोधावर
चर्चा शक्य.
अवकाळी पाऊस व
गारपिटीचा तडाखा
बसलेल्या मध्य
प्रदेशातील नीमच
जिल्ह्यात काँग्रेस
अध्यक्ष सोनिया गांधी
यांनी शेतकऱ्यांच्या
भेटी घेतल्या. कंजार्डा
येथे व्यासपीठावर न
जाता बसस्थानकावरच
महिलांची वास्तपुस्त
केली. पाया पडण्यासाठी
पुढे आलेल्या वयोवृद्ध
महिलेला उठवत
सोनियांनी साडीच्या
पदराने तिचे अश्रू पुसले.
व्यासपीठावर न जाता रस्त्यावरच अश्रू पुसले व्यासपीठावर हारतुरे, भूसंपादनावर चर्चा!
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
चेन स्मोकर्सना कर्करोग होत नाही,
याबाबत डॉक्टर कोणतेही स्पष्टीकरण
देऊन शकलेले नाहीत, असे सांगत
आणखी एक भाजप खासदार
शामचरम गुप्ता यांनी धुम्रपानाचे
समर्थन केले. एक वृत्तवाहिनीशी
बोलताना गुप्ता म्हणाले की, साखर
हानीकारक आहे. त्यामुळे मधुमेह
होतो म्हणून साखरेवर बंदी येत नाही.
हाताने बनवलेली बिडी-सिगारेटच्या
तुलनेत कमी हानीकारक असते.
मेक इन इंडिया आपला नारा आहे.
बिडी उद्योगावर एक कोटी लोकांचा
उदरनिर्वाह चालतो. त्यांना प्रभावित
करता येणार नाही. विशेष म्हणजे गुप्ता
हे मोठे बिडी उद्योगपती आहेत.
भाजप खासदाराकडून
धूम्रपानाचे समर्थन
वृत्तसंस्था | डेहराडून
आयएएस अधिकारी असल्याचे
भासवून मसुरीच्या प्रतिष्ठित लाल
बहादूर शास्त्री
अकादमीमध्ये
तब्बल सहा महिने
राहणाऱ्या रुबी
चौधरी या महिलेने
पाच लाख
रुपयांची लाच देऊन अकादमीचे
बनावट ओळखपत्र मिळवले होते.
चौधरी यांनीच हा गौप्यस्फोट केला.
या प्रकरणात आपली काहीही
चूक नाही. अकादमीच्याच एका
अधिकाऱ्याने बनावट ओळखपत्र
दिलेे. त्याने तीन हप्त्यांत ५ लाख
रुपये लाच घेतली. त्या अधिकाऱ्याने
अकादमीत ग्रंथपालाची नोकरी
देण्याचेही आश्वासन दिले होते.
त्यासाठी २० लाखांची लाच मागितली
होती.
आपण नातेवाईक व
मित्रांकडून पैशांची तजवीज करत
होतो, असे चौधरी म्हणाल्या. ही
महिला गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी
अकादमीत आली होती. अकादमीत
सहा महिने राहून २७ मार्च रोजी ती
अचानक गायब झाली होती. त्यामुळे
गोंधळ झाला होता.
पाच लाखांत दिले मसुरी
अकादमीचे बनावट अायकार्ड
‘तोतया आयएएस’ रुबीचा
खळबळजनक गौप्यस्फोट

More Related Content

Viewers also liked

Viewers also liked (9)

Ata 25 04-2012
Ata 25 04-2012Ata 25 04-2012
Ata 25 04-2012
 
TCM infosys - Journals Module Fact Sheet
TCM infosys - Journals Module Fact SheetTCM infosys - Journals Module Fact Sheet
TCM infosys - Journals Module Fact Sheet
 
certficate 17
certficate 17certficate 17
certficate 17
 
Icifinalprojectnov2015
Icifinalprojectnov2015Icifinalprojectnov2015
Icifinalprojectnov2015
 
bus card
bus cardbus card
bus card
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
ExtraHop for Virtualization Datasheet
ExtraHop for Virtualization DatasheetExtraHop for Virtualization Datasheet
ExtraHop for Virtualization Datasheet
 
Vibration FEA 1
Vibration FEA 1Vibration FEA 1
Vibration FEA 1
 
Thermal FEA 1
Thermal FEA 1Thermal FEA 1
Thermal FEA 1
 

Similar to Solapur news marathi live

Similar to Solapur news marathi live (10)

Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
540) redevelopment discussion 1
540) redevelopment discussion   1540) redevelopment discussion   1
540) redevelopment discussion 1
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi		Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 

More from divyamarathibhaskarnews (14)

Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Solapur news marathi live

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक ०३ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन गुडन्यूज सोलापूर शुक्रवार, ३ एिप्रल २०१५ एकूण पाने १२+४+८+४=२८। किंमत ‌~३.०० सुविचार पैसे कमावण्यासाठी व्यवसाय करू नका. आणखी चांगल्या पद्धतीने सेवा देता यावी यासाठी पैसा मिळवा. मार्क झुकेरबर्ग आमची माती आमची माणसं जाहिरात पुरवणी दिव्यमराठीविशेष महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर दीपिका पदुकोनच्या विरुद्ध उभी राहिली सोनाक्षी सिन्हा वृत्तसंस्था | नवी दिल्ली महिला सबलीकरणावर बनलेल्या "माय चाॅइस' व्हिडिओ कॅम्पेनने भारतीय सोशल मीडिया दोन गटात दुभंगला. पहिला गट दीपिका पदुकोनच्या ‘माय चाॅइस’शी जोडला गेला. यात बहुतेक सेलिब्रिटी आणि महिलावादी आहेत. अमिताभ बच्चनपासून फरहान अख्तर आणि शबाना आझमीपासून आलिया भट्टसारख्या कलाकारांनी त्याचे कौतुक केले, तर दुसऱ्या गटाचे म्हणणे असे की, महिला सबलीकरणाच्या नावाखाली हे निव्वळ मार्केटिंग आहे. यामध्ये सामान्य ट्विटर यूजर्सशिवाय लेखिका शोभा डे आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सहभागी आहेत. सोनाक्षीने म्हटले की, महिला सबलीकरणाचा अर्थ प्रत्येक वेळी तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे परिधान करता; कुणाशी संबंध जोडू करू इच्छिता, असा होत नाही. सबलीकरणाचा अर्थ महिलांना रोजगार आणि सक्षम बनवणे हा आहे. ज्यांना गरज आहे अशा महिलांचे सबलीकरण व्हायला हवे. ‘माय चाॅइस’वर दुभंगला सोशल मीडिया! मते 46 लाखांवर पसंत 28 हजारांवर नापसंत 12 हजारांवर मते 7लाखां जवळ पसंत 7 हजारांवर नापसंत 262 दीपिका म्हणते : मी माझ्या पद्धतीने जीवन जगू इच्छिते. हवे ते कपडे घालणे, कोणावर प्रेम करायचे व कोणासोबत रहायचे हे मीच ठरवणार. यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल हा दावा होता. काय आहे माय चॉइस? २ मिनिटे ३४ सेकंदांच्या या व्हिडिओत दीपिकासह ९९ महिलांच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकला आहे. पुरुषांनी संकुचित विचारसरणी बदलावी, असे दीपिकाचे आवाहन आहे. व्होग या नियतकालिकाच्या या मोहिमेत महिलांचा मर्जीने जगण्याचा अधिकार दर्शवण्यात आला आहे. पुरुष अावृत्ती महिला अावृत्ती पुरुषांसाठीची आवृत्ती पुरुषांसाठीची माय चॉइसची आवृत्ती मंगळवारी आली. ती ब्रेट हाऊस फिल्मच्या अंकुर पोद्दारने तयार केली. त्यातून पुरुषी विचार आला. ‘घरी यायला उशीर झाला म्हणजे मी धोका देत आहे’ असा अर्थ होत नाही, असे त्यातील संवाद आहेत. न्यूजइनबॉक्स ७ हजार कोटी रुपयांनी संपूर्ण देशभरात वायफाय नवी दिल्ली | येत्या दोन-तीन वर्षांत संपूर्ण देशात बीएसएनएलकडून थ्रीजी, फोरजी नेटवर्क असलेले वायफाय हॉटस्पॉट बसवले जातील. यात सात हजार कोटी रुपये खर्च होतील. वाराणसीत वायफाय सेवा सुरू झाली आहे. हार्वर्ड विद्यापीठाचे मुंबईत आंतरराष्ट्रीय कार्यालय न्यूयॉर्क | हार्वर्ड विद्यापीठ लवकरच मुंबईत आपले आंतरराष्ट्रीय कार्यालय सुरू करणार आहे. यासोबतच कंपनी चीन व दक्षिण आफ्रिकेतही कार्यालय सुरू करेल. ही संस्था विद्यापीठे, महाविद्यालयांना संशोधन कार्यात मदत करेल. जाट आरक्षण : केंद्राची सुप्रीम कोर्टात याचिका नवी दिल्ली | जाट समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांचा ओबीसीत समावेश करण्यासंबंधी याचिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. न्यायालयाने १७ मार्च रोजी जाटांना आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द केला होता. एक दिवसात १३.४५ लाख ई -रेल्वे तिकिटे विकली नवी दिल्ली | नवीन नियम लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी बुधवारी १३.४५ लाख रेल्वे तिकिटे ऑनलाइन बुक झाली. हा एक विक्रम आहे. १ एप्रिलपासून अॅडव्हान्स तिकीट बुकिंगचा अवधी ६० दिवसांवरून १२० दिवस करण्यात आला आहे. काशी हनुमान मंदिरात गुलाम अली गाणार गझल वाराणसी | येथे ८ एप्रिलपासून सुरू होतअसलेल्यासंकटमोचनसंगीत महोत्सवात यंदा पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली गझलगायन करणार आहेत. या महोत्सवात भाग घेण्याची गुलाम अली यांची ही पहिलीच वेळ आहे. मॉडेल कार बंगळुरूत गुुरुवारी फ्रीस्केल कप २०१५ रोबोटिक्स स्पर्धेत आपल्या मॉडेल कारशी खटपट करणारा एक विद्यार्थी. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी व राष्ट्रीय विज्ञान संस्थेकडून ही स्पर्धा भरवली जाते. प्रमोद चुंचूवार | मुंबई केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाला संसदेची मान्यता मिळायची असतानाच राज्य सरकारने मात्र या कायद्यातील आक्षेपार्ह तरतुदी जशास तशा लागू केल्या आहेत. यामुळे सरकारी व खासगी प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी जमीन मालकांच्या संमतीची गरज भासणार नाही. केंद्राच्या अध्यादेशाला कडवा विरोध करणाऱ्या शिवसेनेने मात्र त्यास मूक संमती देत आपल्या दुटप्पी भूमिकेचे दर्शन घडवले आहे. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विरोधकांना अंधारात ठेवून १३ मार्च रोजीच हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्कालीन यूपीए सरकारच्या भूसंपादन विधेयकात बदल करत मोदी सरकारने ३१ डिसेंबर २०१४ रोजी नव्या कायद्याचा अध्यादेश काढला. यात ८० टक्के मालकांच्या संमतीची अट काढून टाकण्यात आली अाहे. तसेच खासगी प्रकल्पांसाठी भूसंपादन कायदा लागू झाला आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून सुरू झाले. १३ मार्चला महसूल विभागाने एक अधिसूचना काढली. उपसचिव एस. के. गावडे यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या अधिसूचनेने राज्यात उर्वरित. पान १२ भूसंपादन कायदा राज्यातही, सेना गप्प, विरोधक अंधारात गुपचूप अंमल | संमतीची अट रद्द, अधिसूचना १३ मार्चलाच निघाली विशेषवृत्त या प्रकल्पांना सूट मिळेल 1 जमिनीची मालकी शासनाकडे निहित असेल तेथे सार्वजनिक-खासगी भागीदारीने अंतर्गत शाळा, रुग्णालये, वीज प्रकल्प यांसह पायाभूत सुविधा 2 विद्युतीकरण, सिंचन, रस्ते, पाणीपुरवठा व जलसंधारण यांसह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा 3 परवडण्याजोगी घरे व गरिबांसाठी घरे 4 औद्योगिक कॉरिडार्स 5 संरक्षण सिद्धता किंवा संरक्षण उत्पादन यांसह राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणदृष्ट्या महत्वाचे प्रकल्प. नंतर बदल होऊ शकतात भूसंपादन अध्यादेश लागू करण्याचा धाेरणात्मक निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. हा अंतिम निर्णय नाही. संसदेत हा कायदा झाल्यानंतर बदल हाेऊ शकतात. एकनाथ खडसे, महसूल मंत्री अधिसूचना काढणे गैर नाही केंद्राने अध्यादेश काढल्यानंतर किंवा राज्याच्या एखाद्या कायद्याच्या नियमात अधिसूचनेद्वारे बदल करण्याचा अधिकार राज्याला अाहे.अधिवेशन सुरू असताना ती काढणे गैर नाही. - अॅड. उदय वारुंजीकर, ज्येष्ठ विधिज्ञ, घटनातज्ज्ञ काय आहेत प्रकरण दोन आणि तीन 1. प्रकरण : दोन खासगी कंपन्यांसाठी भूसंपादनात जिल्हाधिकारी मालकांच्या संमतीची प्रक्रिया सुरू करतील. पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठी वाटाघाटीतून सहमती झालेल्या अटी व शर्ती, भूसंपादन करणाऱ्या संस्थेने अभिवचन दिलेली नुकसान भरपाई वाचून दाखवली जाईल. अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभेचीही संमती घ्यावी लागेल. 2. प्रकरण : तीन प्रारंभिक अधिसूचनेनंतर दोन महिन्यांत जिल्हाधिकारी पुढील कामे करतील. मृत व्यक्तींच्या नोंदी वगळून कायदेशीर वारसांची नोंद, गहाण व कर्जे,वन कायदा, जमिनीवरील झाडे व विहिरी यांची नोंद घेणे, उभ्या किंवा पेरणी केलेल्या पिंकांच्या क्षेत्रासंबंधात नोंद याचा त्यात समावेश आहे. परिणाम असा : {खासगी कंपन्यांसाठी संमती न घेता भूसंपादन होईल. आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेता येतील. {विहिरी, पिके यांची नोंद घ्यावी लागणार नसल्याने नुकसान भरपाई कमी. सही केली नाही विधेयकातील आक्षेपार्ह तरतुदींसह अधिसूचनेसाठी फाइल मंजुरीकरिता आली होती. मात्र, आमची भूमिका याविरुद्ध असल्याने मी सही केली नाही. कॅबिनेटमध्ये काय चर्चा झाली ते मला माहिती नाही. संजय राठोड, महसूल राज्यमंत्री आधी अभ्यास करतो केंद्राच्या भूसंपादन वटहुकुमाच्या अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना निघाल्याची मला कल्पना नाही. त्या अधिसूचनेची आधी प्रत मिळवतो आणि त्याचा अभ्यास करून सांगतो. राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा साेलापूर । महापालिका करापोटी रेल्वे विभागाकडे सुमारे सात ते आठ कोटी रुपये थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी महापालिकेने रेल्वे विभागाचा पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइन बंद करण्याची मोहीम मागील दोन दिवसांपासून हाती घेतली आहे. १२ ठिकाणची ड्रेनेज लाइन बंद केली, तर एका ठिकाणच्या सहा इंचीसह सहा ठिकाणचा उर्वरित पान १२ रेल्वेचा सहा ठिकाणचा पाणीपुरवठा केला बंद महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी कारवाई कारवाई सुरूच राहणार ^रेल्वे विभागास अनेक ठिकाणांहून पाणीपुरवठा मनपाकडून करण्यात येत आहे. ३० ते ३२ ठिकाणांहून ड्रेनेज लाइन जोडली आहे. ती तोडण्यात येत आहे. रेल्वेकडून रक्कम न आल्यास यापुढे कारवाई सुरूच ठेवणार आहे. अमिता दगडे-पाटील, साहाय्यक आयुक्त, मनपा सोलापूर. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त येथील जैन महिला मंडळाच्या वतीने महावीरांच्या जन्मावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. महावीरांच्या जन्मापूर्वीची सामाजिक परिस्थिती, महावीरांच्या मातेची सोळा स्वप्ने, ओटी भरण, जन्म यासह विविध प्रसंग नाटिकेतून मांडण्यात आले. भगवान महावीरांची जन्मगाथा... कलाकार - मानसी शहा, सुरेखा शहा, नीता शहा, मीना पटवा, आरती दोशी, प्रतिमा गांधी, सोनिया चंकेश्वरा, श्रृती शहा. भूमिका - सिध्दार्थ राजा - शर्मिला शहा, त्रिशला राणी - डॉ. नेहा गांधी यांनी घेतले परिश्रम - मंडळाच्या अध्यक्ष संगीता शहा, उपाध्यक्ष डॉ. सरिता कोठाडिया, सचिव प्रीती मेहता, पल्लवी मेहता, निशा गांधी, पूजा शहा. सोलापूर । युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइज युनियनचे निमंत्रक गजानन हरी मेहेंदळे (वय ६३) यांचे गुरुवारी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात िनधन झाले. त्यांना कर्करोग होता. उपचार सुरू असतानाच दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा तेजस आणि मुलगी डॉ. रसिका कुलकर्णी (पंढरपूर) असा परिवार आहे. (कै.) मेहेंदळे बँक ऑफ इंडियातून िनवृत्त झाले. त्यानंतरही त्यांची संघटनेशी असलेली नाळ तुटली नाही. कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात ते अग्रभागी असत. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी ते गेली काही महिने लढत होते. मार्चमध्ये झालेल्या या आंदोलनाची दखल व्यवस्थापनाला घ्यावी लागली. संघटनेशी वाटाघाटी झाल्या. या प्रक्रियेत श्री. मेहेंदळे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या िनधनाने बँक कर्मचाऱ्यांचा मोठा आधारवड कोसळल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. गजानन मेहेंदळे यांचे िनधन {महागाई, भ्रष्टाचार मुद्द्यांवर असमाधान, परराष्ट्र प्रतिमा सुधारल्याचे मात्र मान्य. {धार्मिक ध्रुवीकरण नाही. संघाचा अजेंडा चालवत नाहीत. {महागाई मुद्दा प्राधान्याने घ्यावा. मग भ्रष्टाचार, राम मंदिर शेवटी. वृत्तसंस्था | नवी दिल्ली केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने १० महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मोदींची लोकप्रियता ६५ वरून ३७ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून ३० टक्क्यांसह मोदींवरच शिक्कामोर्तब झाले. त्यांच्या खालोखाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या पदासाठी पसंती मिळाली आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरोने मूड आॅफ नेशन' या नावाने हे सर्वेक्षण केले आहे. लोकप्रियता घटली; परंतु मोदी अजूनही बेस्ट पीएम! 1.अरविंद केजरीवाल, दिल्ली 2.अखिलेश यादव, उ. प्र. 3.चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेश 4.ममता बॅनर्जी, प. बंगाल 5.नवीन पटनायक, ओडिशा २०% मते पक्षात तेच पंतप्रधानपदाचे दावेदार इंडिया टुडे-सिसेरो सर्वेक्षण निष्कर्ष सरकारचे १० महिने; जनमत काय? 69% 25% समाधानकारक अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी काँग्रेसबाबत काय वाटते आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपच्या मतांचा टक्का वाढेल, पण जागा मात्र घटतील. राहुल गांधी पक्षाचा कायापालट करतील ४६% लोकांना वाटते. टॉप फाइव्ह सीएम अतुल पेठकर | घुमान (पंजाब) भाषा भगिनींचा संगम असलेल्या पंजाबातील घुमानमध्ये शुक्रवारपासून ८८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. दुपारी ४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद‌्घाटन होईल. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक गुरुदयालसिंह, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, िशवसेना पक्षप्रमुखउद्धवठाकरेयांचीउपस्थिती राहील. नियोजित संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे, िवद्यमान संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांचे गुरुवारीच आगमन झाले. महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण, नंतर नांदेडच्या नानक साई फाउंडेशनची भक्त नामदेव ग्रंथदिंडी निघणार आहे. सारस्वत मेळ्यासाठी घुमान सजले; आजपासून संमेलन साहित्य संमेलनासाठी पंजाबातील घुमाननगरी सज्ज झाली आहे. संत नामदेव दरबाराच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानी. आज उद‌्घाटन : ज्ञानपीठ पुरस्कार िवजेते गुरुदयालसिंग यांची उपस्थिती संमेलननगरीत रिमझिम पाऊस, पण मंडप वाॅटरप्रूफ संमेलननगरीत गुरुवारी सायंकाळी रिमझिम पाऊस झाला, परंतु संपूर्ण मंडप वाॅटरप्रूफ असल्याने काहीही अडचण येणार नसल्याची ग्वाही संयोजकांनी दिली आहे. १० हजारांहून अधिक रसिक हजेरी लावतील, असा विश्वास त्यांना आहे. भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक शुक्रवारपासून कर्नाटकातील बंगळुरूत होत आहे. नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी राज्यातील नेते बी.एस. येदियुरप्पा यांनी स्वागत केले. भाजप जगात सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा आनंद बैठकीत अाहे. भूसंपादन विधेयकाला होणाऱ्या विरोधावर चर्चा शक्य. अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसलेल्या मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. कंजार्डा येथे व्यासपीठावर न जाता बसस्थानकावरच महिलांची वास्तपुस्त केली. पाया पडण्यासाठी पुढे आलेल्या वयोवृद्ध महिलेला उठवत सोनियांनी साडीच्या पदराने तिचे अश्रू पुसले. व्यासपीठावर न जाता रस्त्यावरच अश्रू पुसले व्यासपीठावर हारतुरे, भूसंपादनावर चर्चा! वृत्तसंस्था | नवी दिल्ली चेन स्मोकर्सना कर्करोग होत नाही, याबाबत डॉक्टर कोणतेही स्पष्टीकरण देऊन शकलेले नाहीत, असे सांगत आणखी एक भाजप खासदार शामचरम गुप्ता यांनी धुम्रपानाचे समर्थन केले. एक वृत्तवाहिनीशी बोलताना गुप्ता म्हणाले की, साखर हानीकारक आहे. त्यामुळे मधुमेह होतो म्हणून साखरेवर बंदी येत नाही. हाताने बनवलेली बिडी-सिगारेटच्या तुलनेत कमी हानीकारक असते. मेक इन इंडिया आपला नारा आहे. बिडी उद्योगावर एक कोटी लोकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना प्रभावित करता येणार नाही. विशेष म्हणजे गुप्ता हे मोठे बिडी उद्योगपती आहेत. भाजप खासदाराकडून धूम्रपानाचे समर्थन वृत्तसंस्था | डेहराडून आयएएस अधिकारी असल्याचे भासवून मसुरीच्या प्रतिष्ठित लाल बहादूर शास्त्री अकादमीमध्ये तब्बल सहा महिने राहणाऱ्या रुबी चौधरी या महिलेने पाच लाख रुपयांची लाच देऊन अकादमीचे बनावट ओळखपत्र मिळवले होते. चौधरी यांनीच हा गौप्यस्फोट केला. या प्रकरणात आपली काहीही चूक नाही. अकादमीच्याच एका अधिकाऱ्याने बनावट ओळखपत्र दिलेे. त्याने तीन हप्त्यांत ५ लाख रुपये लाच घेतली. त्या अधिकाऱ्याने अकादमीत ग्रंथपालाची नोकरी देण्याचेही आश्वासन दिले होते. त्यासाठी २० लाखांची लाच मागितली होती. आपण नातेवाईक व मित्रांकडून पैशांची तजवीज करत होतो, असे चौधरी म्हणाल्या. ही महिला गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी अकादमीत आली होती. अकादमीत सहा महिने राहून २७ मार्च रोजी ती अचानक गायब झाली होती. त्यामुळे गोंधळ झाला होता. पाच लाखांत दिले मसुरी अकादमीचे बनावट अायकार्ड ‘तोतया आयएएस’ रुबीचा खळबळजनक गौप्यस्फोट