SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.००
सोलापूर
सुिवचार
प्रतिकूल परिस्थितीमुळे
काही व्यक्ती खचून जातात
तर काही जण विक्रमांचे
पर्वत उभे करतात.
} विल्यम ए. वार्ड
ताे खेळाडू काेण?. १० बुधवार, ५ नाेव्हेंबर २०१४
दैिनक¼समूहाचे मराठी वृत्तपत्र
न्यूज इनबॉक्स
वर्ष ३ } अंक २१५ } महानगर १४ राज्ये } ५८ आवृत्त्या }मुंबई}बेंगळुरू}पुणे }अहमदाबाद (सुरत)}जयपूर }७ राज्ये}१७ केंद्रेमध्य प्रदेश}छत्तीसगड}राजस्थान}नवी दिल्ली}पंजाब}चंदिगड}हरियाणा}हिमाचल प्रदेश}उत्तराखंड}झारखंड}जम्मू-काश्मीर}बिहार }गुजरात}महाराष्ट्र }महाराष्ट्रदैिनकभास्कर
समूह
सांगली | दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या कडेगावातील मोहरमनिमित्त मंगळवारी
पंचक्रोशीतील मानकऱ्यांनी वाद्यांच्या गजरात ताबुतांची पूजा केली. हा सोहळा
पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून लाखावर भाविक उपस्थित होते.
कडेगावात
ताबूतांचामेळा
डिसेेंबरपर्यंत रेल्वे भाड्यात
कपात अशक्य : गौडा
नवीदिल्ली|रेल्वेच्याभाड्यातडिसेंबरपर्यंत
कपात होणार नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री
डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली. रेल्वेने
जून २०१४ मध्ये सर्व श्रेणींतील भाड्यात
१४.२ टक्के वाढ केली होती.
आयआयटी खरगपूरमध्ये
९१ लाख वेतनाची ऑफर
नवी दिल्ली | आयआयटी खरगपूरच्या
एका विद्यार्थ्याला ९१ लाख रुपये वेतनाची
ऑफर मिळाली आहे. प्री प्लेसमेंटमध्ये
१२५ विद्यार्थ्यांना २५ टक्के जास्त वेतनाची
ऑफर देण्यात आली आहे. फायनल
प्लेसमेंट डिसेंबरमध्ये होईल.
फडणवीस सरकारची
आजपासून सत्त्वपरीक्षा!
मुंबई | शपथविधीचा झगमगाट, स्मारकांना
भेटी, सत्कार सोहळ्यांचे सोपस्कार
आटोपले असून देवेंद्र फडणवीस
सरकारला बुधवारपासून सत्त्वपरीक्षेला
सामोरे जावे लागेल. शपथविधी झाल्यानंतर
मंत्रिमंडळाची पहिलीवहिली बैठक झाली
खरी; पण ती आैपचािरकता होती.
मॅरेथॉन एम-३ स्मार्टफोनची
बॅटरी ५० तास चालणार
नवी दिल्ली | जियोनी कंपनीने सर्वांत
शक्तिशाली बॅटरी
असलेला मॅरेथॉन एम-३
हा फोन सादर केला
आहे. त्याची बॅटरी
५,००० एमएएचची आहे.
ही बॅटरी २ जीवर ५०
तास आणि ३ जीवर ३०
तास एवढा टॉक टाइम देईल.
इराणच्या कारागृहात शिक्षेच्या
विरोधात युवतीची गांधीगिरी
तेहराण | इराणच्या कारागृहात ब्रिटिश-
इराणी युवती उपोषण करत आहे. गोनचेह
गवामी या २५ वर्षीय
युवतीला व्हॉलीबॉल
सामना पाहिल्याच्या
आरोपावरून एक
वर्षाच्या कैदेची शिक्षा
सुनावण्यात आली आहे.
इराणमध्ये महिलांना व्हॉलीबॉल आणि
फुटबॉल सामने पाहण्यास बंदी आहे.
पाच हजार फूट उंचीवर
विमानाला लटकला टॉम
न्यूयॉर्क | हॉलीवूड स्टार टॉम क्रूझ
याने ५००० फूट उंचीवर उडणाऱ्या
विमानाला लटकून स्टंट सीन केला.
त्याने मिशन इम्पॉसिबल-५ या
चित्रपटासाठी हा स्टंट सीन केला. हा
चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
आठ महिन्यांच्या राजकीय
अनिश्चिततेनंतर अखेर दिल्ली
विधानसभा मंगळवारी बरखास्त
करण्यात आली. दिल्लीत आता
जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नव्याने
निवडणुका होण्याची शक्यता आहे.
विधानसभा बरखास्त करण्याच्या
राज्यपालांच्या शिफारशीला केंद्रीय
मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर दिल्लीत
राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेला
प्रस्ताव आता राष्ट्रपतींकडे जाईल.
राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर
निवडणूक आयोगाला सहा महिन्यांच्या
आत विधानसभेची निवडणूक घ्यावी
लागेल. दरम्यान, दिल्लीतील तीनही
मोठ्या राजकीय पक्षांनी आपली
रणनीती स्पष्ट केली आहे. या
निवडणुकीत भाजप मुख्यमंत्रिपदाचा
उमेदवार प्रोजेक्ट करणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच
मते मागण्याचा इरादा भाजपने स्पष्ट
केला आहे.
भाजपचा हा इरादा असला तरीही
जगदीश मुखी हे भाजपचा चेहरा
असतील, त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी
अरविंद केजरीवाल आणि मुखी
यांच्यातच सामना होईल, असा दावा
आम आदमी पार्टीने केला आहे तर
काँग्रेसने अद्यापही आपले पत्ते उघड
केलेले नाहीत.
कोंडी फुटली, दिल्ली
विधानसभा विसर्जित
उपराज्यपालांच्या शिफारसीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब
सध्याचे पक्षीय बलाबल
तीन मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द होणार
दिल्लीच्या कृष्णनगर, महरौली आणि तुघलकाबादमध्ये
पोटनिवडणुकीची जाहीर झाली आहे. ५ नोव्हेंबर ही अर्ज
भरण्याची अंतिम तारीख आहे. विधानसभा बरखास्तीची
औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया रद्द होईल.
चेहऱ्यांची लढाई महत्त्वाची
> भाजपने २०१३ च्या
निवडणुकीत हर्षवर्धनांचा
चेहरा समोर केला होता.
भाजप मोठा पक्ष ठरला
पण बहुमत मिळवून देऊ
शकले नाहीत.
> भाजपने महाराष्ट्र आणि
हरियाणात मोदींचा चेहरा
पुढे केला. फायदा झाला.
दिल्लीतही हाच फॉर्म्युला
वापरण्याचा भाजपचा
इरादा आहे.
> जगदीश मुखी
जनकपुरीतून पाच वेळा
निवडूण आले आहेत.
सध्या भाजप विधिमंडळ
पक्षाचे नेते आहेत.
> मदनलाल खुराणा
सरकारमध्ये मुखी
अर्थमंत्री होते. त्यानंतर
दोनवेळा विरोधी पक्षनेतेही
राहिले आहेत.
> केजरीवाल विरुद्ध जगदीश मुखी अशी लढत व्हावी,
असे ‘आप’ला वाटते. मात्र भाजपची तशी तयारी नाही.
> दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदरसिंह लव्हली आणि
हारूण यूसुफ यांच्या नेतृत्वात काँग्रेस मैदानात उतरेल.
भाजपमागणारमोदींच्याचनावावरमते
उशिरा उपरतीे
उपराज्यपालांनी आधीच हा निर्णय
घ्यायला हवा होता. पण
भाजपच्या दबावामुळे त्यांनी
ते केले नाही. दिल्लीत
कोणीचेही सरकार येण्याची स्थिती
नसल्याची उपरती त्यांना सुप्रीम
कोर्टाच्या हस्तक्षेपानंतरच झाली.
- शकीलअहमद, काँग्रेस नेते
दिल्ली जिंकली,
भाजप हारला
‘दिल्ली जिंकली, भाजप
हारला. भाजपने काळ्या
पैशाच्या जोरावर ‘आप’चे आमदार
विकत घेण्याचा प्रयत्न केला.
दिल्लीत काही ठिकाणी भाजप
दंगली घडवू शकते.’
- अरविंद केजरीवाल, आप नेते
मोदी हाच मुद्दा
‘नरेंद्रभाई आमचे नेते आहेत.
आम्ही त्यांच्याच नावावर
निवडणूक लढवू. निवडणूक
लढणे, जास्तीत जास्त जागा
जिंकणे, स्पष्ट बहुमत मिळवणे
आणि मग मुख्यमंत्र्याचे नाव
निश्चित करणे हाच आमचा सध्या
उद्देश आहे’.
-प्रभात झा, भाजपचे दिल्ली प्रभारी
(नोट : इतरमध्ये आपमधून निलंबित
विनोद बिन्नी यांचा समावेश)
विद्यमान
आमदार
६७७०
एकूण
२९
भाजप
०८
काँग्रेस
२७
आप
०३
इतर
वृत्तसंस्था | न्यूयॉर्क / वॉशिंग्टन
भारतीय लष्कराचा मुकाबला
करण्यासाठी पाकिस्तान दहशतवादी
गटांचा वापर करत आहे, असा
अहवाल अमेरिकेच्या संरक्षण
मंत्रालयाने अमेरिकन काँग्रेसला सादर
केला आहे. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा
तोंडघशी पडला आहे.
दहशतवाद्यांच्या सुरक्षित
ठिकाणांबाबत पेंटागॉनने १०० पानांचा
सहामाही अहवाल तयार केला आहे.
तो अमेरिकन संसदेला सादर करण्यात
आला असून त्यात ही माहिती आहे.
अहवालात म्हटले आहे की,
अफगाणिस्तान आणि भारताला
निशाणा बनवणारे दहशतवादी
पाकिस्तानसाठी काम करत आहेत.
त्यांचा उद्देश अफगाणिस्तान आणि
क्षेत्रीय स्थिरता यांना नुकसान करणे
हा आहे. अफगाणिस्तानमधील
प्रभाव कमी झाल्याने तसेच
भारताच्या बलशाली लष्कराचा
मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान या
दहशतवादी गटांचा वापर करत आहे.
अतिरेक्यांमार्फतच
पाकचे छुपे युद्ध!
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा अहवाल
भारताची स्तुती
‘सुरक्षित आणि स्थिर
अफगाणिस्तान दक्षिण
आशियासाठी फायदेशीर ठरेल
याची जाणीव असल्याने भारत
अफगाणिस्तानला सहकार्य करत
आहे.’ अशा शब्दांत भारताची
स्तुती करण्यात आली आहे.
हल्ल्यामागे षड‌्यंत्र
देशातील बदलेल्या राजकीय
पार्श्वभूमीवर या हल्ल्यामागे
पड्यंत्र असावे, असा कयासही
वर्तविला जात आहे.
^पाकिस्तानी लष्कर भारताच्या
विरोधात अतिरेक्यांचा वापर
करत आहे या आमच्या दाव्याला
पुष्टी मिळाली आहे. पाक
दहशतवादी कारवायांत सहभागी
आहे हे जग मान्य करत आहेत.
- अकबरूद्दीन, परराष्ट्र मंत्रालय
आमचा दावा खरा ठरला
मुंबई । ‘एकनाथ खडसेंचा अपवाद वगळता
देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमधील
एकही मंत्री प्रभावी नाही. अनुभव नसलेल्या
व कमजोर मंत्र्यांमुळे राज्यातील जनतेचा
अपेक्षाभंग होणार हे िनश्चित आहे’, असे
भाकीत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी
मंगळवारी वर्तवले.
राज्य टोलमुक्त करण्याचे वचन भाजपने
िदले हाेते. सत्तेवर
येताच ते घूमजाव
करीत आहेत.
मिहान प्रकल्पातील
उद्योगांना थेट वीज
जोडणी देण्याचा
फडणवीसांचा
िनर्णय चुकीचा
आहे. वीज कंपन्या
तोट्यात आल्या
तर शेतकऱ्यांना
वीज सबसिडी
कशी देणार, असा सवाल करत नवे सरकार
काॅर्पोरेट्सचे िहत जोपासते आहे, असा आरोप
राणे यांनी केला.
िशवसेना लाचार : िशवसेना कधी नव्हे
इतकी लाचार झाली आहे. शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब असते तर सत्तेवर लाथ मारून
िवरोधात बसले असते. बाळासाहेबांनी
स्वाभिमान िशकवला. उद्धव मात्र लाचारीचे
धडे देत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.
 संबंधित पान ११
खडसेच प्रभावी;
बाकीचे कमजोर
राणेंचे
फडणवीसांवर
टीकास्त्र
मुंबई, पुणे, हैदराबादसह देशातील आठ शहरांमध्ये नव्या गृहप्रकल्पांच्या प्रमाणात मोठी घटसी अँड डब्ल्यूचा अहवाल
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये
नव्या गृहप्रकल्पांची बूम जुलै ते
सप्टेंबर या तिमाहीत २१ टक्क्यांनी
मंदावली आहे. यात अहमदाबाद
आघाडीवर असून महाराष्ट्रातील
मुंबई व पुणे शहरांचा समावेश
आहे. चालू वर्षाच्या तिसऱ्या
तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या
गृहप्रकल्पांमध्ये तब्बल ५२
टक्क्यांची घट झाली आहे.
दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता,
पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि
बंगळुरू या शहरांमध्ये गेल्या
वर्षी याच काळात ४३ हजार ८००
घरबांधणीचा प्रारंभ झाला होता.
ही संख्या जुलै-सप्टेंबर (२०१४)
या तिमाहीत ३४ हजार ६०० वर
आली आहे.
िवकासकांकडून प्रयत्न :
खरेदीदारांच्या अपेक्षेनुसार कमी
आकाराची घरे, फ्लॅट असणारे
गृहप्रकल्प साकारण्याचा प्रयत्न
विकासकांकडून होत आहे.
त्यामुळेच घरांच्या किमती स्थिर
राहण्यास मदत होईल, असे
सी अँड डब्ल्यूच्या कार्यकारी
संचालक श्वेता जैन म्हणाल्या.
परवडणाऱ्या गृहनिर्मिती प्रकल्पांना विकासकांची ‘ना’
लक्षणीय परिणाम
रिअॅल्टी इस्टेट क्षेत्रातील
मरगळीचा फटका नव्या
गृहप्रकल्पांना मोठ्या प्रमाणात
बसला आहे. जुलै ते सप्टेंबर या
तिमाहीत याचा फटका देशातील
आट प्रमुख शहरांतील नव्या
गृहप्रकल्पांना बसला आहे.
सप्टेंबर तिमाहीतील नव्या
गृहप्रकल्पासंदर्भात आठ प्रमुख
शहरांतील स्थिती दर्शवणारी
आकडेवारी
३४,६००यंदा लाँच न होऊ
शकलेली घरे
४३,८००गतवर्षीच्या तिमाहीत
सादर झालेली घरे
सर्वाधिक गृह
प्रकल्पांना फटका
अहमदाबाद : ६२%
सर्वात कमी गृह
प्रकल्पांना फटका
मुंबई : ११%
नव्या घरांच्या मागणीत वाढ - पुणे,
हैदराबाद,कोलकाता, चेन्नई (वार्षिक तुलनेत)
विक्रीत घट, चालू
प्रकल्पांवरच भर
विक्री मंदावल्यामुळे चालू
प्रकल्प पूर्ण करण्यावरच
विकासकांनी भर दिला
आहे. नव्या गृहप्रकल्पांचा
शहरनिहाय विचार करता
अहमदाबादेत सर्वाधिक ६२
टक्के घट दिसून येत असून
त्या पाठोपाठ दिल्लीचा
(५४ टक्के) क्रमांक
लागतो. मुंबईत ही घट
केवळ ११ टक्के आहे.
प्रतिनिधी | सोलापूर
िजल्ह्यातील अवैध दगड खाणी
सील करून खाणचालकांना दंड
ठोठावण्यात आला होता. मात्र, महसूल
प्रशासनाच्या या कारवाईकडे दुर्लक्ष
करीत खाणचालकांनी पुन्हा जोमाने
अवैध खाणी सुरू केल्याचे वृत्त दिव्य
मराठी'ने पुराव्यानिशी प्रकाशित केले.
त्यामुळे महसूल प्रशासन खडबडून
जागे झाले. जिल्हािधकारी डॉ. प्रवीण
गेडाम यांनी आता अनधिकृत खाण
चालविणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल
करण्याचे आदेश प्रांताधिकारी व
तहसीलदारांना दिले आहेत.
जिल्ह्यात १७२ दगडखाणी
अनधिकृत आहेत. त्या सील करण्यात
आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने
दिली. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यात
अनधिकृत खाणी पुन्हा जाेमाने
सुरू असल्याचे दिसले. तलाठी,
मंडलाधिकारी व तहसीलदार यांनीही
याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
अनधिकृत खाणचालकांकडून रॉयल्टी
व दंड वसूल  उर्वरित पान १२
अवैध खाणचालकांवर गुन्हे दाखल
करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
तत्काळ कारवाई हवी
Ãजिल्ह्यातील अनधिकृत ठरविण्यात
आलेल्या खाणींची पाहणी करावी.
ज्या अनधिकृत खाणी आहेत, त्यांनी
पुन्हा खाणी सुरू केल्या असतील
तर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी
संबंधित खाणचालकांवर गुन्हे दाखल
करावेत. याचा अहवाल तातडीने वरिष्ठ
कार्यालयास सादर करावा.''
डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी
पाठपुरावा अहवालही फसवा?
जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी तहसीलदार
व प्रांताधिकारी यांना दगडखाणीवर
केलेल्या कारवाईचा अहवाल देण्याचे
आदेश िदले होते. तलाठी, मंडलािधकारी,
तहसीलदार यांनी खाणी सील केल्याचा
अहवाल दिला. दुसरीकडे खाणी सुरूच
असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे
महसूल अिधकाऱ्यांनी दिलेला अहवाल
फसवा होता का? अशीही चर्चा आहे.
 आवश्यकतेनुसार पद, जबाबदारी
निश्चित होईल. पात्रता आणि अनुभव
याबाबतच्या अर्हता निश्चित होईल.
 निवडीची जबाबदारी यूपीएससीची
असेल. यूपीएससीच सध्या आयएएस,
आयपीएसची नियुक्ती करते.
 सरकारी कर्मचाऱ्यांना नियमित की
खासगी क्षेत्राएवढे वेतन हवे ही माहिती
द्यावी लागेल.
 खासगी क्षेत्राएवढे वेतन हवे असेल
तर त्याला राजीनामा द्यावा लागेल
किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागेल.
अशी असेल प्रक्रिया
नवी िदल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे
सरकार आता व्यावसायिक पद्धतीने काम
करणार आहे. ज्या सरकारी पदांसाठी तज्ज्ञ
आणि विशेषज्ञांची आवश्यकता असेल अशा
पदांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ नियुक्त केले
जातील. त्यासाठी नियुक्ती नियमांत बदल केले
जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनीदिलेल्यामाहितीनुसार,यानियुक्त्या
तीन ते पाच वर्षांसाठी असतील. त्यांचे वेतन
खासगी क्षेत्राप्रमाणे असेल. कार्मिक आणि
प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) सर्व
मंत्रालयांना पत्र लिहून अशी पदे निश्चित
करण्याची सूचना केली आहे. प्रशासकीय
सुधारणेअंतर्गत उच्च पदांवर व्यावसायिक
व्यक्तींची नियुक्ती केली जाईल.
मोदी सरकारात
‘खासगी तज्ज्ञ’
नियुक्ती नियमांत सरकार
करणार बदल
प्रतिनिधी | नगर
आपल्या विविधांगी भूमिकांचा अमीट ठसा
उमटवणारे व रुपेरी विश्वात वावरतानाही
सामाजिक भान जपणारे ज्येष्ठ रंगकर्मी
सदाशिव अमरापूरकर यांना मंगळवारी दुपारी
हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी
अखेरचा निरोप देण्यात आला. ज्येष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे, कवी व चित्रपट
निर्माते रामदास फुटाणे, सामाजिक कार्यकर्ते
बाबा आढाव, खासदार दिलीप गांधी यांच्यासह
अनेक मान्यवरांनी अमरापूरकर यांना भावपूर्ण
श्रद्धांजली अर्पण केली.
अमरापूरकर यांचे सोमवारी (३ नोव्हेंबर)
पहाटे मुंबईत उपचार सुरू असताना निधन
झाले. मंगळवारी सकाळी नऊ वाजता त्यांचे
पार्थिव माणिक चौकातील अमरापूरकर वाड्यात
आणण्यात आले. सकाळपासूनच त्यांचे स्नेही,
चाहते व सर्वसामान्य नगरकरांनी मोठी गर्दी
केली होती. हजारो चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन
घेतले. या वेळी अनेकांना हंुदका आवरला नाही.
अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमरापूरकरअनंतातविलीन
‘बकरे की
मांँ ने खैर
मना ली’
कोडीनार (गुजरात) |
‘बकरे की माँ कब तक
खैर मनाएगी’ अशी
एक म्हण आहे. मात्र,
सौराष्ट्रातील एका गावात
वेगळेच घडले. डोलासा
गावात एकाच दिवसात
चार जनावरांचा फडशा
पाडणाऱ्या बिबट्याला
पकडण्यासाठी पिंजऱ्यात
‘खाद्य’ म्हणून एक बकरी
ठेवण्यात आली. तब्बल
दोन तासांनंतर बकरी
आणि बिबट्या दोघेही
सहीसलामत आढळून
आले. - दिव्य भास्कर

More Related Content

What's hot

What's hot (9)

Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 

More from divyamarathibhaskarnews

More from divyamarathibhaskarnews (16)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Latest Solapr News In Marathi

  • 1. एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.०० सोलापूर सुिवचार प्रतिकूल परिस्थितीमुळे काही व्यक्ती खचून जातात तर काही जण विक्रमांचे पर्वत उभे करतात. } विल्यम ए. वार्ड ताे खेळाडू काेण?. १० बुधवार, ५ नाेव्हेंबर २०१४ दैिनक¼समूहाचे मराठी वृत्तपत्र न्यूज इनबॉक्स वर्ष ३ } अंक २१५ } महानगर १४ राज्ये } ५८ आवृत्त्या }मुंबई}बेंगळुरू}पुणे }अहमदाबाद (सुरत)}जयपूर }७ राज्ये}१७ केंद्रेमध्य प्रदेश}छत्तीसगड}राजस्थान}नवी दिल्ली}पंजाब}चंदिगड}हरियाणा}हिमाचल प्रदेश}उत्तराखंड}झारखंड}जम्मू-काश्मीर}बिहार }गुजरात}महाराष्ट्र }महाराष्ट्रदैिनकभास्कर समूह सांगली | दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या कडेगावातील मोहरमनिमित्त मंगळवारी पंचक्रोशीतील मानकऱ्यांनी वाद्यांच्या गजरात ताबुतांची पूजा केली. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून लाखावर भाविक उपस्थित होते. कडेगावात ताबूतांचामेळा डिसेेंबरपर्यंत रेल्वे भाड्यात कपात अशक्य : गौडा नवीदिल्ली|रेल्वेच्याभाड्यातडिसेंबरपर्यंत कपात होणार नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली. रेल्वेने जून २०१४ मध्ये सर्व श्रेणींतील भाड्यात १४.२ टक्के वाढ केली होती. आयआयटी खरगपूरमध्ये ९१ लाख वेतनाची ऑफर नवी दिल्ली | आयआयटी खरगपूरच्या एका विद्यार्थ्याला ९१ लाख रुपये वेतनाची ऑफर मिळाली आहे. प्री प्लेसमेंटमध्ये १२५ विद्यार्थ्यांना २५ टक्के जास्त वेतनाची ऑफर देण्यात आली आहे. फायनल प्लेसमेंट डिसेंबरमध्ये होईल. फडणवीस सरकारची आजपासून सत्त्वपरीक्षा! मुंबई | शपथविधीचा झगमगाट, स्मारकांना भेटी, सत्कार सोहळ्यांचे सोपस्कार आटोपले असून देवेंद्र फडणवीस सरकारला बुधवारपासून सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागेल. शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिलीवहिली बैठक झाली खरी; पण ती आैपचािरकता होती. मॅरेथॉन एम-३ स्मार्टफोनची बॅटरी ५० तास चालणार नवी दिल्ली | जियोनी कंपनीने सर्वांत शक्तिशाली बॅटरी असलेला मॅरेथॉन एम-३ हा फोन सादर केला आहे. त्याची बॅटरी ५,००० एमएएचची आहे. ही बॅटरी २ जीवर ५० तास आणि ३ जीवर ३० तास एवढा टॉक टाइम देईल. इराणच्या कारागृहात शिक्षेच्या विरोधात युवतीची गांधीगिरी तेहराण | इराणच्या कारागृहात ब्रिटिश- इराणी युवती उपोषण करत आहे. गोनचेह गवामी या २५ वर्षीय युवतीला व्हॉलीबॉल सामना पाहिल्याच्या आरोपावरून एक वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इराणमध्ये महिलांना व्हॉलीबॉल आणि फुटबॉल सामने पाहण्यास बंदी आहे. पाच हजार फूट उंचीवर विमानाला लटकला टॉम न्यूयॉर्क | हॉलीवूड स्टार टॉम क्रूझ याने ५००० फूट उंचीवर उडणाऱ्या विमानाला लटकून स्टंट सीन केला. त्याने मिशन इम्पॉसिबल-५ या चित्रपटासाठी हा स्टंट सीन केला. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल. वृत्तसंस्था | नवी दिल्ली आठ महिन्यांच्या राजकीय अनिश्चिततेनंतर अखेर दिल्ली विधानसभा मंगळवारी बरखास्त करण्यात आली. दिल्लीत आता जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नव्याने निवडणुका होण्याची शक्यता आहे. विधानसभा बरखास्त करण्याच्या राज्यपालांच्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेला प्रस्ताव आता राष्ट्रपतींकडे जाईल. राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर निवडणूक आयोगाला सहा महिन्यांच्या आत विधानसभेची निवडणूक घ्यावी लागेल. दरम्यान, दिल्लीतील तीनही मोठ्या राजकीय पक्षांनी आपली रणनीती स्पष्ट केली आहे. या निवडणुकीत भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार प्रोजेक्ट करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच मते मागण्याचा इरादा भाजपने स्पष्ट केला आहे. भाजपचा हा इरादा असला तरीही जगदीश मुखी हे भाजपचा चेहरा असतील, त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी अरविंद केजरीवाल आणि मुखी यांच्यातच सामना होईल, असा दावा आम आदमी पार्टीने केला आहे तर काँग्रेसने अद्यापही आपले पत्ते उघड केलेले नाहीत. कोंडी फुटली, दिल्ली विधानसभा विसर्जित उपराज्यपालांच्या शिफारसीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब सध्याचे पक्षीय बलाबल तीन मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द होणार दिल्लीच्या कृष्णनगर, महरौली आणि तुघलकाबादमध्ये पोटनिवडणुकीची जाहीर झाली आहे. ५ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. विधानसभा बरखास्तीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया रद्द होईल. चेहऱ्यांची लढाई महत्त्वाची > भाजपने २०१३ च्या निवडणुकीत हर्षवर्धनांचा चेहरा समोर केला होता. भाजप मोठा पक्ष ठरला पण बहुमत मिळवून देऊ शकले नाहीत. > भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणात मोदींचा चेहरा पुढे केला. फायदा झाला. दिल्लीतही हाच फॉर्म्युला वापरण्याचा भाजपचा इरादा आहे. > जगदीश मुखी जनकपुरीतून पाच वेळा निवडूण आले आहेत. सध्या भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. > मदनलाल खुराणा सरकारमध्ये मुखी अर्थमंत्री होते. त्यानंतर दोनवेळा विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. > केजरीवाल विरुद्ध जगदीश मुखी अशी लढत व्हावी, असे ‘आप’ला वाटते. मात्र भाजपची तशी तयारी नाही. > दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदरसिंह लव्हली आणि हारूण यूसुफ यांच्या नेतृत्वात काँग्रेस मैदानात उतरेल. भाजपमागणारमोदींच्याचनावावरमते उशिरा उपरतीे उपराज्यपालांनी आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता. पण भाजपच्या दबावामुळे त्यांनी ते केले नाही. दिल्लीत कोणीचेही सरकार येण्याची स्थिती नसल्याची उपरती त्यांना सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतरच झाली. - शकीलअहमद, काँग्रेस नेते दिल्ली जिंकली, भाजप हारला ‘दिल्ली जिंकली, भाजप हारला. भाजपने काळ्या पैशाच्या जोरावर ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत काही ठिकाणी भाजप दंगली घडवू शकते.’ - अरविंद केजरीवाल, आप नेते मोदी हाच मुद्दा ‘नरेंद्रभाई आमचे नेते आहेत. आम्ही त्यांच्याच नावावर निवडणूक लढवू. निवडणूक लढणे, जास्तीत जास्त जागा जिंकणे, स्पष्ट बहुमत मिळवणे आणि मग मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित करणे हाच आमचा सध्या उद्देश आहे’. -प्रभात झा, भाजपचे दिल्ली प्रभारी (नोट : इतरमध्ये आपमधून निलंबित विनोद बिन्नी यांचा समावेश) विद्यमान आमदार ६७७० एकूण २९ भाजप ०८ काँग्रेस २७ आप ०३ इतर वृत्तसंस्था | न्यूयॉर्क / वॉशिंग्टन भारतीय लष्कराचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान दहशतवादी गटांचा वापर करत आहे, असा अहवाल अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकन काँग्रेसला सादर केला आहे. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला आहे. दहशतवाद्यांच्या सुरक्षित ठिकाणांबाबत पेंटागॉनने १०० पानांचा सहामाही अहवाल तयार केला आहे. तो अमेरिकन संसदेला सादर करण्यात आला असून त्यात ही माहिती आहे. अहवालात म्हटले आहे की, अफगाणिस्तान आणि भारताला निशाणा बनवणारे दहशतवादी पाकिस्तानसाठी काम करत आहेत. त्यांचा उद्देश अफगाणिस्तान आणि क्षेत्रीय स्थिरता यांना नुकसान करणे हा आहे. अफगाणिस्तानमधील प्रभाव कमी झाल्याने तसेच भारताच्या बलशाली लष्कराचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान या दहशतवादी गटांचा वापर करत आहे. अतिरेक्यांमार्फतच पाकचे छुपे युद्ध! अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा अहवाल भारताची स्तुती ‘सुरक्षित आणि स्थिर अफगाणिस्तान दक्षिण आशियासाठी फायदेशीर ठरेल याची जाणीव असल्याने भारत अफगाणिस्तानला सहकार्य करत आहे.’ अशा शब्दांत भारताची स्तुती करण्यात आली आहे. हल्ल्यामागे षड‌्यंत्र देशातील बदलेल्या राजकीय पार्श्वभूमीवर या हल्ल्यामागे पड्यंत्र असावे, असा कयासही वर्तविला जात आहे. ^पाकिस्तानी लष्कर भारताच्या विरोधात अतिरेक्यांचा वापर करत आहे या आमच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. पाक दहशतवादी कारवायांत सहभागी आहे हे जग मान्य करत आहेत. - अकबरूद्दीन, परराष्ट्र मंत्रालय आमचा दावा खरा ठरला मुंबई । ‘एकनाथ खडसेंचा अपवाद वगळता देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमधील एकही मंत्री प्रभावी नाही. अनुभव नसलेल्या व कमजोर मंत्र्यांमुळे राज्यातील जनतेचा अपेक्षाभंग होणार हे िनश्चित आहे’, असे भाकीत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मंगळवारी वर्तवले. राज्य टोलमुक्त करण्याचे वचन भाजपने िदले हाेते. सत्तेवर येताच ते घूमजाव करीत आहेत. मिहान प्रकल्पातील उद्योगांना थेट वीज जोडणी देण्याचा फडणवीसांचा िनर्णय चुकीचा आहे. वीज कंपन्या तोट्यात आल्या तर शेतकऱ्यांना वीज सबसिडी कशी देणार, असा सवाल करत नवे सरकार काॅर्पोरेट्सचे िहत जोपासते आहे, असा आरोप राणे यांनी केला. िशवसेना लाचार : िशवसेना कधी नव्हे इतकी लाचार झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर सत्तेवर लाथ मारून िवरोधात बसले असते. बाळासाहेबांनी स्वाभिमान िशकवला. उद्धव मात्र लाचारीचे धडे देत आहेत, अशी टीका राणे यांनी केली. संबंधित पान ११ खडसेच प्रभावी; बाकीचे कमजोर राणेंचे फडणवीसांवर टीकास्त्र मुंबई, पुणे, हैदराबादसह देशातील आठ शहरांमध्ये नव्या गृहप्रकल्पांच्या प्रमाणात मोठी घटसी अँड डब्ल्यूचा अहवाल वृत्तसंस्था | नवी दिल्ली देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये नव्या गृहप्रकल्पांची बूम जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत २१ टक्क्यांनी मंदावली आहे. यात अहमदाबाद आघाडीवर असून महाराष्ट्रातील मुंबई व पुणे शहरांचा समावेश आहे. चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये तब्बल ५२ टक्क्यांची घट झाली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि बंगळुरू या शहरांमध्ये गेल्या वर्षी याच काळात ४३ हजार ८०० घरबांधणीचा प्रारंभ झाला होता. ही संख्या जुलै-सप्टेंबर (२०१४) या तिमाहीत ३४ हजार ६०० वर आली आहे. िवकासकांकडून प्रयत्न : खरेदीदारांच्या अपेक्षेनुसार कमी आकाराची घरे, फ्लॅट असणारे गृहप्रकल्प साकारण्याचा प्रयत्न विकासकांकडून होत आहे. त्यामुळेच घरांच्या किमती स्थिर राहण्यास मदत होईल, असे सी अँड डब्ल्यूच्या कार्यकारी संचालक श्वेता जैन म्हणाल्या. परवडणाऱ्या गृहनिर्मिती प्रकल्पांना विकासकांची ‘ना’ लक्षणीय परिणाम रिअॅल्टी इस्टेट क्षेत्रातील मरगळीचा फटका नव्या गृहप्रकल्पांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत याचा फटका देशातील आट प्रमुख शहरांतील नव्या गृहप्रकल्पांना बसला आहे. सप्टेंबर तिमाहीतील नव्या गृहप्रकल्पासंदर्भात आठ प्रमुख शहरांतील स्थिती दर्शवणारी आकडेवारी ३४,६००यंदा लाँच न होऊ शकलेली घरे ४३,८००गतवर्षीच्या तिमाहीत सादर झालेली घरे सर्वाधिक गृह प्रकल्पांना फटका अहमदाबाद : ६२% सर्वात कमी गृह प्रकल्पांना फटका मुंबई : ११% नव्या घरांच्या मागणीत वाढ - पुणे, हैदराबाद,कोलकाता, चेन्नई (वार्षिक तुलनेत) विक्रीत घट, चालू प्रकल्पांवरच भर विक्री मंदावल्यामुळे चालू प्रकल्प पूर्ण करण्यावरच विकासकांनी भर दिला आहे. नव्या गृहप्रकल्पांचा शहरनिहाय विचार करता अहमदाबादेत सर्वाधिक ६२ टक्के घट दिसून येत असून त्या पाठोपाठ दिल्लीचा (५४ टक्के) क्रमांक लागतो. मुंबईत ही घट केवळ ११ टक्के आहे. प्रतिनिधी | सोलापूर िजल्ह्यातील अवैध दगड खाणी सील करून खाणचालकांना दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, महसूल प्रशासनाच्या या कारवाईकडे दुर्लक्ष करीत खाणचालकांनी पुन्हा जोमाने अवैध खाणी सुरू केल्याचे वृत्त दिव्य मराठी'ने पुराव्यानिशी प्रकाशित केले. त्यामुळे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हािधकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी आता अनधिकृत खाण चालविणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत. जिल्ह्यात १७२ दगडखाणी अनधिकृत आहेत. त्या सील करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यात अनधिकृत खाणी पुन्हा जाेमाने सुरू असल्याचे दिसले. तलाठी, मंडलाधिकारी व तहसीलदार यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. अनधिकृत खाणचालकांकडून रॉयल्टी व दंड वसूल उर्वरित पान १२ अवैध खाणचालकांवर गुन्हे दाखल करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश तत्काळ कारवाई हवी Ãजिल्ह्यातील अनधिकृत ठरविण्यात आलेल्या खाणींची पाहणी करावी. ज्या अनधिकृत खाणी आहेत, त्यांनी पुन्हा खाणी सुरू केल्या असतील तर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी संबंधित खाणचालकांवर गुन्हे दाखल करावेत. याचा अहवाल तातडीने वरिष्ठ कार्यालयास सादर करावा.'' डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी पाठपुरावा अहवालही फसवा? जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दगडखाणीवर केलेल्या कारवाईचा अहवाल देण्याचे आदेश िदले होते. तलाठी, मंडलािधकारी, तहसीलदार यांनी खाणी सील केल्याचा अहवाल दिला. दुसरीकडे खाणी सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे महसूल अिधकाऱ्यांनी दिलेला अहवाल फसवा होता का? अशीही चर्चा आहे. आवश्यकतेनुसार पद, जबाबदारी निश्चित होईल. पात्रता आणि अनुभव याबाबतच्या अर्हता निश्चित होईल. निवडीची जबाबदारी यूपीएससीची असेल. यूपीएससीच सध्या आयएएस, आयपीएसची नियुक्ती करते. सरकारी कर्मचाऱ्यांना नियमित की खासगी क्षेत्राएवढे वेतन हवे ही माहिती द्यावी लागेल. खासगी क्षेत्राएवढे वेतन हवे असेल तर त्याला राजीनामा द्यावा लागेल किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागेल. अशी असेल प्रक्रिया नवी िदल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आता व्यावसायिक पद्धतीने काम करणार आहे. ज्या सरकारी पदांसाठी तज्ज्ञ आणि विशेषज्ञांची आवश्यकता असेल अशा पदांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ नियुक्त केले जातील. त्यासाठी नियुक्ती नियमांत बदल केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनीदिलेल्यामाहितीनुसार,यानियुक्त्या तीन ते पाच वर्षांसाठी असतील. त्यांचे वेतन खासगी क्षेत्राप्रमाणे असेल. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) सर्व मंत्रालयांना पत्र लिहून अशी पदे निश्चित करण्याची सूचना केली आहे. प्रशासकीय सुधारणेअंतर्गत उच्च पदांवर व्यावसायिक व्यक्तींची नियुक्ती केली जाईल. मोदी सरकारात ‘खासगी तज्ज्ञ’ नियुक्ती नियमांत सरकार करणार बदल प्रतिनिधी | नगर आपल्या विविधांगी भूमिकांचा अमीट ठसा उमटवणारे व रुपेरी विश्वात वावरतानाही सामाजिक भान जपणारे ज्येष्ठ रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांना मंगळवारी दुपारी हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कवी व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, खासदार दिलीप गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अमरापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अमरापूरकर यांचे सोमवारी (३ नोव्हेंबर) पहाटे मुंबईत उपचार सुरू असताना निधन झाले. मंगळवारी सकाळी नऊ वाजता त्यांचे पार्थिव माणिक चौकातील अमरापूरकर वाड्यात आणण्यात आले. सकाळपासूनच त्यांचे स्नेही, चाहते व सर्वसामान्य नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. हजारो चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. या वेळी अनेकांना हंुदका आवरला नाही. अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरापूरकरअनंतातविलीन ‘बकरे की मांँ ने खैर मना ली’ कोडीनार (गुजरात) | ‘बकरे की माँ कब तक खैर मनाएगी’ अशी एक म्हण आहे. मात्र, सौराष्ट्रातील एका गावात वेगळेच घडले. डोलासा गावात एकाच दिवसात चार जनावरांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात ‘खाद्य’ म्हणून एक बकरी ठेवण्यात आली. तब्बल दोन तासांनंतर बकरी आणि बिबट्या दोघेही सहीसलामत आढळून आले. - दिव्य भास्कर