SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १५९ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
जळगाव गुरुवार, १९ फेब्रुवारी २०१५
सेन्सेक्स	 29230.26
मागील	 29135.88
सोने	 27,500.00
मागील	 27,900.00
चांदी	 39,500.00
मागील	 41,000.00
डॉलर	 62.34
मागील	 62.16
केळी (रावेर)	 850
फरक	 20.00एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.००
सुविचार
कुठलेही काम करताना हार
मानणे ही सर्वांत मोठी कमजोरी
आहे. यशाचा एकच मंत्र आहे,
पुन्हा एकदा प्रयत्न करा.
थॉमस अल्वा एडिसन
विशेष प्रतिनिधी | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी
उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे
िनधन महाराष्ट्राला चटका लावून
जाणारे असून, त्याला तंबाखूचे
अतिसेवन कारणीभूत ठरले आहे.
म्हणूनच राज्य सरकारने आता
तंबाखूविरोधात आरपारची लढाई
लढण्याचा निर्धार केला आहे. या
मोहिमेत आरोग्य खाते शाळा व अन्य
शैक्षणिकसंस्थांवरकरडीनजरठेवणार
आहे. राज्यात एकही शिक्षक तंबाखूचे
सेवन करणारा असू नये, शाळेच्या
आवारात वा वर्गात त्याने तंबाखूचा
बार भरून जाऊ नये, यासाठी दक्षता
घेतली जात असून अशा शिक्षकांवर
कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत.
‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’साठी
तंबाखू, पानमसाला, गुटख्याच्या
उच्चाटनासाठी  उर्वरित. पान १२
... ही धोक्याची घंटा
^‘तोंडाच्या कॅन्सरमुळे राज्याला
एका ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला
मुकावे लागले, ही दु:खद बाब आहे.
राज्यात सध्या २ कोटी लोक तंबाखूच्या
विळख्यात आहेत. त्यांच्यासाठी आबांचा
मृत्यू धोक्याची घंटा मानली गेली पाहिजे.
या घटनेतून धडा घेऊन 'तंबाखूमुक्त
महाराष्ट्र'चा विडा उचलला आहे.
- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री
जाहिरातींवरही बंदी : तंबाखूमुक्तीसाठी राज्यात टीव्ही व वर्तमानपत्रांतील
पानमसाल्याच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
शाळा-काॅलेजांततंबाखूमुक्तीचीघंटा;शिक्षकांवरथेटकारवाई
{ आबांच्या
िनधनानंतर िनर्धार
‘तंबाखूमुक्त
महाराष्ट्र’चा
{ राज्यात
तंबाखू, गुटखा,
पानमसाल्याच्या
उच्चाटनासाठी १०
कलमी कार्यक्रम
८ हजार डाॅक्टरांची मदत
इंडियन डेंटल असोसिएशनच्या ८
हजार डॉक्टरांनी या मोहिमेत योगदान
देण्याची तयारी दर्शवली आहे. तोंडाच्या
आरोग्याबाबत जनजागृती नसल्याने
तंबाखू, गुटखा खाण्याचे प्रमाण वाढलेे.
ही जागृती करण्याची आमची तयारी
असल्याचे असोिसएशनने म्हटले आहे.
समुपदेशन केंद्र उभारणार
राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य
केद्रात तोंडाच्या कॅन्सरचे निदान तसेच
स्क्रिनिंग करण्याची सुविधा उपलब्ध
करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाच्या
अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
अनेकांना तंबाखूचे व्यसन सोडायचे असते.
मात्र, त्यांना योग्य ते समुपदेशन मिळत
नाही. त्यासाठी विशेष समुपदेशन केंद्रे
उभारण्याचीही सरकारची योजना आहे.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
केंद्र सरकार भ्रष्टाचारविरोधी कायद्यात बदल
करण्याबाबत विचार करत आहे. शासकीय
अधिकाऱ्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या
आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआय
अथवा इतर तपास संस्थांनी लोकपालाची
संमती घेणे अनिवार्य करण्याची तरतूद
कायद्यात करण्याचा सरकारचा इरादा आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार
ही तरतूद करत असल्याचा आरोप होत आहे.
सरकारनेमात्र,कर्मचाऱ्यांचेकामपरिणामकारक
आणि पारदर्शक व्हावे यासाठी हे केले जात
असल्याचा दावा केला आहे.
खटला चालवण्याची परवानगी देणारा
अधिकार लोकपालाला असावा अशी तरतूद
लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यात करण्यात
येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी
लोकपालाची संमती अनिवार्य?
भ्रष्टाचारविरोधी कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार
वृत्तसंस्था | जिनेव्हा
संशयित मनी लाँडरिंग प्रकरणात स्वित्झर्लंडच्या
पोलिसांनी बुधवारी बँकिंग क्षेत्रातील दिग्गज
एचएसबीसी बँकेवर धाड टाकली. सुमारे १,१९५
भारतीयांची खाती या बँकेत असल्याची माहिती
उघड झाल्यानंतर एचएसबीसी बँक चर्चेत आली
होती. शोधपत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या समूहाने
महिनाभरापूर्वी बँकेच्या जिनेव्हा शाखेतील एक लाख
खातेधारकांची माहिती सार्वजनिक केली होती. त्यात
भारतातील मोठ्या उद्योगपती, राजकारणी आदी १,१९५
खातेधारकांची नावे होती.
स्विस पोलिसांची
एचएसबीसीवर धाड माेदींच्या दाैऱ्याबाबत
महाजनांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी । जळगाव
पंतप्रधान नरेंद्र माेदी हे बारामती
दाैऱ्यावर येऊन गेले. मात्र, त्यांच्या
दाैऱ्याचा अाणि सिंचन घाेटाळ्याच्या
चाैकशीचा काहीही संबंध नाही. सिंचन
घाेटाळ्याची चाैकशी सुरूच राहणार
असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश
महाजन यांनी बुधवारी स्पष्ट केले.
जिल्हापरिषदेच्यादक्षतासमितीच्या
बैठकीनंतर महाजन पत्रकारांशी बाेलत
हाेते. पंतप्रधान बारामतीत येऊन गेले.
त्यामुळे जलसिंचन घाेटाळ्याची
चाैकशी थांबेल,
अशा वावड्या
उठवल्या
गेल्या. मात्र, या
दाैऱ्यामुळे िसंचन
घाेटाळ्याच्या
चाैकशीवर काेणताही परिणाम
हाेणार नाही. जळगाव जिल्ह्यातील
प्रकल्पांसंदर्भात बाेलताना ते म्हणाले
की, जिल्ह्यातील  उर्वरित.पान १२
‘िसंचन’ चाैकशीवर परिणाम नाही
िशवसेना राज्यमंत्र्यांची
मागणी रास्त नाही
शिवसेनेचे राज्यमंत्री व भाजपचे
कॅबिनेटमंत्री यांच्यातील वादाबाबत गिरीश
महाजन म्हणाले की, राज्यमंत्र्यांना
िनयमानुसार अधिकार िदलेले अाहेत.
यासंदर्भात शासनाने अादेशही काढले
असून, िशवसेना राज्यमंत्र्यांच्या काही
मागण्या अवास्तव अाहेत. त्यामुळे त्या
मान्य करता येणार नाहीत. मुख्यमंत्री हा
वाद लावकरच मिटवतील.
प्रतिनिधी | हिंगोली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२१-
२२ मध्ये वास्तव्य केलेले लंडनस्थित
घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी
होण्यासाठी सरकारने स्वारस्य किंमत
म्हणून एकूण किमतीच्या १० टक्के
रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आहे.
लंडन येथील १० किंग्ज हेन्री
मार्गावरील एन.डब्ल्यू. ३ या घरात डॉ.
बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते.
१ सप्टेंबर २०१४ रोजी घर मालकाने हे
घर मे. सेडॉन्स या कंपनीमार्फत विक्रीला
काढले होते. ही वास्तू सरकारने विकत
घेऊन त्या ठिकाणी स्मारक करावे,
अशी आंबेडकरप्रेमींची मागणी आहे.
ही इमारत खरेदी करण्याची इतर
खरेदीदारांनी तयारी दर्शवली आहे.
त्यामुळे सरकारनेही पावले उचली
आहेत. सरकारने सायमन रॉस यांची
सॉलिसिटर म्हणून नियुक्ती केली आहे.
खरेदी प्रक्रियेसाठी स्वारस्य बोलीसाठी
एकूण रकमेच्या १० टक्के म्हणजेच
३ कोटी १० लाख रुपये महात्मा फुले
आर्थिक विकास महामंडळाच्या
निधीतून देण्याचा निर्णय घेतला.
आंबेडकरांच्याघरासाठी
~३.१० कोटी भरणारलंडनस्थित घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू
वृत्तसंस्था | नवी दिल्ली/ बंगळुरू
गुजरातच्या समुद्रात गेल्या ३१
डिसेंबरला दिसलेल्या पाकिस्तानी
बोटीशी संबंधित एक व्हिडिओ
उघडकीस आला आहे. सुरतमध्ये
मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमाचा
तो व्हिडिओ आहे. आपल्याच
आदेशावरून ही बोट उडवण्यात
आली, असा दावा भारतीय तटरक्षक
दलाचे महासंचालक बी. के. लोशाली
त्या व्हिडिओत करत आहेत. लोशाली
यांच्या दाव्यामुळे त्या बोटीवरील
चालक दलानेच आग लावल्याचा
दावा करणारे केंद्र सरकार चांगलेच
अडचणीत आले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी
लगेचच त्यावर प्रतिक्रिया दिली.
‘चुकीच्या वक्तव्यामुळे वस्तुस्थिती
बदलत नाही. आम्ही या वक्तव्याची
चौकशी करू,’ असे पर्रीकर म्हणाले.
लोशाली यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची
कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी
दिले आहेत. संरक्षणमंत्र्यांच्या या
विधानानंतर तटरक्षक दलाने लोशाली
यांना कारणे दाखवा नोटीस बजावली
असून सुरतमध्ये केलेल्या दाव्यावर
खुलासा मागितला आहे. बंगळुरूमध्ये
पर्रीकर म्हणाले की, ‘आम्ही जुन्याच
दाव्यावर ठाम आहोत. बोट तटरक्षक
दलाने उडवली नाही याचे पुरावेही मी
देईन.’ संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर
लोशाली यांनीही घूमजाव केले.
‘बोटीवरील लोकांनीच तिला आग
लावली,’ असे ते म्हणाले.
काेस्ट गार्डनेच उडवली
पाकची बाेट : डीअायजी
सरकारची गोची | चुकीच्या वक्तव्याने वस्तुस्थिती बदलत नाही : पर्रीकर
संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यावर संशय : संरक्षण मंत्रालयानुसार तटरक्षक
दलाने बोटीचा पाठलाग केला. घेरले गेल्यानंतर चार संशयितांनी बोट उडवून दिली. अाता
लोशालींच्या वक्तव्यानंतर पाकने भारताच्या दाव्यावर संशय घेतला. भारताने आंतरराष्ट्रीय
नियमांचे उल्लंघन केल्याचे पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी म्हटले.
तटरक्षक दलाची डीआयजी लोशालींना कारणे दाखवा नोटीस
^संरक्षण मंत्रीजी,
पाकिस्तानी बोट
उडवणे मोठा गुन्हा आहे की
देशाशी खोटे बोलणे? जर ते
दहशतवादी होते तर त्यांना
उडवण्यात लाज कसली?
- मनीष तिवारी, काँग्रेसचे नेते
^सरकार कसे काम करते
हे यावरून लक्षात येते.
हे म्हणजे एक हात काय
काम करत आहे याचा दुसऱ्या
हाताला पत्ताच नसावा तसे
हे आहे.
- दीपक वाजपेयी, आप प्रवक्ता
बोट उडवणे की खोटे बोलणे हा गुन्हा?
लोशाली यांची
दोन वक्तव्ये...
आधी : बोट उडवून द्या,
त्यांना बिर्याणी खाऊ
घालण्याची आमची
इच्छा नाही : ‘तुम्हाला
३१ डिसेंबरच्या रात्रीची
आठवण असेल. आम्ही
पाकिस्तानी बोट उडवून
दिली होती. मी त्या रात्री
गांधीनगरमध्ये होतो. मी
म्हणालो - बोट उडवून
द्या. त्यांना बिर्याणी खाऊ
घालण्याची आमची इच्छा
कदापि नाही.’
नंतर म्हणाले : जे छापून
आले त्यात तथ्य नाही :
‘हे प्रकरण माझ्याकडे
नाही. जे छापून आले
त्यात तथ्य नाही. मी
असे वक्तव्य केले नाही.
फक्त राष्ट्रविरोधी तत्त्वांना
बिर्याणी खाऊ घालण्याची
गरज नाही एवढेच
म्हणालो होतो.’
उडवून देण्यात अालेली हीच ती संशयित पाकिस्तानी बाेट.
कराचीहून निघाली होती संशयित बोट
बोटीला ३१ डिसेंबरच्या रात्री पोरबंदर समुद्र किनाऱ्यापासून ३६५
किमी अंतरावर आग लागली होती. ती कराची केटी बंदरावरून
निघाली होती, तिला तेथूनच निर्देश मिळत होते, असे संरक्षण
मंत्रालयातर्फे सांगण्यात आले होते. बोटीवरील चार संशयितांनीच
ती उडवली होती, असे तटरक्षक दलानेही सांगितले होते.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे
व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावरील
प्राणघातक हल्ला ही गंभीर घटना
असल्याचे सांगत राष्ट्रीय मानवी हक्क
आयोगाने राज्य सरकारला नोटीस
बजावून अहवाल सादर करण्याचेही
आदेश दिले आहेत.
मानवी हक्क आयोगाने जारी
केलेल्या पत्रकानुसार, राज्याचे मुख्य
सचिव, पोलिस महासंचालकांना
चार आठवड्यांत अहवाल सादर
करण्यास सांगितले आहे. कोल्हापूरात
१६ फेब्रुवारीला पानसरे दांपत्यावर
अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला
होता. गंभीर जखमी पानसरेंवर
अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या
असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.
याबाबतीच्या बातम्यांची दखल घेऊन
आयोगाने ही नोटीस बजावली आहे.
पानसरे हल्ला : मानवी
हक्क आयोगाची राज्य
सरकारला नोटीस
मोदींचे नाव विणलेल्या
सूटवरसव्वाकोटीचीबोलीसुरत | नरेंद्र मोदींच्या सूटचा लिलाव बुधवारी
सुरू झाला. पहिल्या दिवशी राजेश जुनेजा
या व्यावसायिकाने १.२१ कोटी रुपयांची
बोली लावली. या कोटवर सोन्याच्या तारांनी
नरेंद्र दामोदरदास मोदी' असे नाव विणलेले
आहे. मोदींनी तो २५ जानेवारीला अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत चाय
पे चर्चा कार्यक्रमात घातला होता. मोदींना भेट
मिळालेल्या ४५५ वस्तूही लिलावात ठेवलेल्या
आहेत. त्यातून मिळणारी रक्कम गंगेच्या
स्वच्छतेवर खर्च केली जाईल.
ज्याने भेट दिला : मुलाच्या
लग्नाच्या आमंत्रणात दिला होता..
मी २६ जानेवारीच्या माझ्या मुलाच्या
लग्नात घालून येण्यासाठी मोदींना सूट भेट
दिला. ते आले नाहीत, सूट मात्र घातला.
- रमेश भिकाभाई विराणी, व्यावसायिक.
ज्याने बोली लावली : सूट व
मोदींच्या पुतळ्याशी गुजगोष्टी...
२००६ मध्ये सुरतेतील महापुरादरम्यान
मोदींनी विद्याभारती शाळेत
थांबून २२-२२ तास काम केले.
त्याने मी प्रभावित झालो. मी हा सूट
घालणार नाही, तो पुतळ्यासकट
ऑफिसमध्ये ठेवून त्यांच्याशी गप्पा
करीन. त्यामुळे मला प्रेरणा मिळेल.
- राजेश जुनेजा, कपड्यांचे व्यावसायिक.
अन् ज्यांनी विरोध केला :
सूट अशुभ, म्हणूनच लिलावात
सूटमुळे दिल्लीची निवडणूक हरले. मोदी
त्याला अपशकुनी मानतात. यामुळे त्याचा
लिलाव करत आहेत.- राशीद अल्वी, काँग्रेस प्रवक्ते.
सूटवर चर्चा
२५ जाने.
ला घातला
होता सूट
एक लाखापासून बोली सुरू,
शुक्रवारपर्यंत लिलाव
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
देशभरात स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी
पडलेल्यांची संख्या ६६३ वर गेली
आहे, तर १०,०२५ लोकांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले आहेत. आरोग्य
मंत्रालयानुसार, स्वाइन फ्लूमुळे
राजस्थानमध्ये बुधवारी ८ लोकांचा
मृत्यू, तर ३४३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
आढळून आले आहेत. दिल्लीत
स्वाइन फ्लूची तपासणी आणि
उपचारासाठी सरकारने साडेचार
हजार रुपये शुल्क निश्चित केले आहे.
खासगी रुग्णालयांना यापेक्षा जास्त
शुल्क घेता येणार नाही. तेलंगणमध्ये
२४ तासांत ३० रुग्ण पॉझिटिव्ह
आढळून आले आहेत. तेथे एकूण ४६
लोकांचा मृत्यू झाला आहे.
स्वाइन फ्लूमुळे ६६३
बळी, १० हजार बाधित
वर्ल्डकपिवंडो
अाजचा सामना
िझम्बाॅब्वे युएई
पहाटे 3.30 वाजेपासून
अफगाणिस्तान
162 (42.5 षटके)
बांगलादेश
267 (50 षटके)
105 धावांनी
बांगलादेश विजयी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज
यांची अाज जयंती.
विनम्रअभिवादन!
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
नेटशिवाय मोबाइलवर
शोधा १३०० पर्यटनस्थळे
नवी दिल्ली | हॉलीडे आयक्यू
ऑफ लाइन मोबाइल अॅप लाँच
झाले आहे. त्याद्वारे इंटरनेट
कनेक्शनशिवाय देशातील १००
पर्यटनस्थळांशी संबंधित माहिती
मिळेल. ते हॉलीडे आयक्यू
कंपनीने तयार केले आहे.
बीएमडब्ल्यूची २.२९
कोटींची आय ८ कार लाँच
नवी दिल्ली | बीएमडब्ल्यूने
बुधवारी हायब्रीड कार आय ८
लाँच केली. दिल्लीत तिची किंमत
२.२९ कोटी रुपये आहे. बटरफ्लाय
डोअर हे तिचे वैशिष्ट्य आहे.
प्रख्यात चित्रपट निर्माते
डी. रामा नायडूंचे निधन
हैदराबाद | खासगीरीत्या सर्वाधिक
चित्रपट बनवण्याचा गिनीज
रेकॉर्ड करणारे
चित्रपट निर्माते
डी.रामानायडू
(वय ७८)
यांचे निधन
झाले. त्यांनी
विविध भाषांत १५० चित्रपटांची
निर्मिती केली होती.
सचिनसोबत दीड लाख
रुपयांत डिनरची संधी
मेलबर्न | सिडनीत सचिन
तेंडुलकरसोबत ७० हजार ते
दीड लाख रुपयांत डिनर करता
येईल. येथील एका रेस्टॉरंटने २६
फेब्रुवारीसाठी ही ऑफर दिली.
एप्रिलपासून योजनांचे पैसे
थेट लाभार्थीच्या खात्यात
नवी दिल्ली | एप्रिलपासून सर्व
योजनांचा पैसा थेट लाभार्थीच्या
खात्यात पोहोचणार आहे. अर्थ
मंत्रालयाने केंद्र, राज्यांच्या सर्व
विभागांना तसे निर्देश दिले आहेत.
दिव्यमराठीविशेष आयपॅडच्या साहाय्याने लिहितात सेरेब्रल पाल्सी आजाराने पीडित रिचर्ड
नाकाने लिहिली रागाची कविता!वृत्तसंस्था | लिव्हरपूल
लिव्हरपूलच्या रिचर्ड हॉपले यांच्या शरीराच्या
कोणत्याही भागावर त्यांच्या मेंदूचे नियंत्रण नाही. ते नीट
बोलूही शकत नाहीत. बहुतांश वेळ व्हीलचेअरवरच
असतात.त्यांचाआजारचतसाआहे.(सेरेब्रलपाल्सी)
तो कोणालाही कुंठित करून टाकतो. रिचर्डचेही तेच
झाले. मग वयाच्या एका टप्प्यावर बरोबरीचे तरुण
गर्लफ्रेंडचा हात हातात घेऊन फिरताना पाहिल्यावर
त्यांना आपल्या लाचारीचा प्रचंड राग आला.
एकेदिवशी घरी बसून कॉम्प्युटरवर काही तरी काम
करत होते. तेव्हा मनात काही शब्द गुणगुणू लागले. एक
कविता आकार घेत होती. त्यांना त्याची जाणीव झाली.
मग ते लिहित गेले. वर्षभरानंतर त्यांचा ‘रिव्हर बुक’ हा
कवितासंग्रह बाजारात आला. रिचर्ड आयपॅडवर नाकाने
लिहितात. त्यांची बोटे काम करत नाहीत. आता तीच
त्यांची गर्लफ्रेंड आहे. आपला राग व्यक्त करण्याचा
सर्वात चांगला मार्ग!
‘प्रत्येक कविता अभिव्यक्तीचा स्नॅपशॉटच’
रिचर्ड ४१ वर्षांचे आहेत. ते सांगतात, ‘मी धड बोलू शकत नव्हतो,
पण मला नेहमीच माझे म्हणणे मांडावे वाटत असे. त्यामुळे आपले
म्हणणे मांडण्यासाठी कविताच योग्य माध्यम वाटले. आज प्रत्येक
कविता माझ्या अभिव्यक्तीचा स्नॅपशॉट आहे. या प्रवासातही काही
कमी अडचणी
आल्या नाहीत.
आधी मी जुन्या
कॉम्प्युटरवर
लिहित होतो.
विशेष प्रकारचा
माऊस व स्टँडर्ड की
बोर्डच्या साहाय्याने लिहित होतो, मात्र शरीरावर खूप ताण पडायचा.
त्यामुळे एकदा पाठीला मारही लागला. समस्या आणखीच वाढली.
मात्र कधीच हार मानली नाही. आयपॅड विकत घेतला. नाकाने
लिहिण्याचा प्रयत्न केला आणि मग लिहितच राहिलो.’
लिव्हरपूलमधून वाहणाऱ्या
मर्सी नदी किनाऱ्यालगतच्या
एल्बर्ट डॉक परिसरात
रिचर्ड राहतात. घरापासूनच
वाहणारी ही नदी त्यांच्या
कवितांची सर्वात मोठी प्रेरणा
आहे. खिडकीत बसून जेव्हा
ते नदीकडे पाहायचे तेव्हा
त्यांच्या डोक्यात कविता रुंजी
घालायची. दुसरी प्रेरणा आहे
तंत्रज्ञान. त्यामुळेच ते आज
या टप्प्यावर पोहोचले आहेत.
म्हणून त्यांनी तंत्रज्ञानालाही
कवितेचा साज चढवला.
घराजवळच्या
नदीपासून प्रेरणा
वृत्तसंस्था । गुवाहाटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘लोकशाहीविरोधी’ आहेत,
तर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा
‘अहंकारी’ आहेत, असा आरोप
करत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय
कार्यकारिणीचे सदस्य प्रद्युत बोरा
यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
बोरा आसाममधील असून,
ते २००७-२००९ दरम्यान पक्षाच्या
आयटी आघाडीचे सदस्य होते. त्यांनी
बुधवारी रात्री पक्षाध्यक्ष अमित शहा
यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले
आहे की, मोदींनी लोकशाही परंपरेला
नुकसान पोहोचवले नाही काय?
परराष्ट्र सचिवांना हटवले जात आहे
याची माहिती आज परराष्ट्रमंत्र्यांना
नसते. कॅबिनेट मंत्र्यांना ओएसडी
नियुक्त करण्याचा अधिकारही नाही.
मोदी लोकशाहीविरोधी,
तर शहा अहंकारी
भाजप नेत्याकडून आरोप

More Related Content

What's hot (8)

Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Jalgaon news marathi
Jalgaon news marathi		Jalgaon news marathi
Jalgaon news marathi
 
Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi		Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi		Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 

More from divyamarathibhaskarnews (15)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Jalgaon News In Marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १५९ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन जळगाव गुरुवार, १९ फेब्रुवारी २०१५ सेन्सेक्स 29230.26 मागील 29135.88 सोने 27,500.00 मागील 27,900.00 चांदी 39,500.00 मागील 41,000.00 डॉलर 62.34 मागील 62.16 केळी (रावेर) 850 फरक 20.00एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.०० सुविचार कुठलेही काम करताना हार मानणे ही सर्वांत मोठी कमजोरी आहे. यशाचा एकच मंत्र आहे, पुन्हा एकदा प्रयत्न करा. थॉमस अल्वा एडिसन विशेष प्रतिनिधी | मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे िनधन महाराष्ट्राला चटका लावून जाणारे असून, त्याला तंबाखूचे अतिसेवन कारणीभूत ठरले आहे. म्हणूनच राज्य सरकारने आता तंबाखूविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. या मोहिमेत आरोग्य खाते शाळा व अन्य शैक्षणिकसंस्थांवरकरडीनजरठेवणार आहे. राज्यात एकही शिक्षक तंबाखूचे सेवन करणारा असू नये, शाळेच्या आवारात वा वर्गात त्याने तंबाखूचा बार भरून जाऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात असून अशा शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’साठी तंबाखू, पानमसाला, गुटख्याच्या उच्चाटनासाठी उर्वरित. पान १२ ... ही धोक्याची घंटा ^‘तोंडाच्या कॅन्सरमुळे राज्याला एका ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला मुकावे लागले, ही दु:खद बाब आहे. राज्यात सध्या २ कोटी लोक तंबाखूच्या विळख्यात आहेत. त्यांच्यासाठी आबांचा मृत्यू धोक्याची घंटा मानली गेली पाहिजे. या घटनेतून धडा घेऊन 'तंबाखूमुक्त महाराष्ट्र'चा विडा उचलला आहे. - डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री जाहिरातींवरही बंदी : तंबाखूमुक्तीसाठी राज्यात टीव्ही व वर्तमानपत्रांतील पानमसाल्याच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शाळा-काॅलेजांततंबाखूमुक्तीचीघंटा;शिक्षकांवरथेटकारवाई { आबांच्या िनधनानंतर िनर्धार ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’चा { राज्यात तंबाखू, गुटखा, पानमसाल्याच्या उच्चाटनासाठी १० कलमी कार्यक्रम ८ हजार डाॅक्टरांची मदत इंडियन डेंटल असोसिएशनच्या ८ हजार डॉक्टरांनी या मोहिमेत योगदान देण्याची तयारी दर्शवली आहे. तोंडाच्या आरोग्याबाबत जनजागृती नसल्याने तंबाखू, गुटखा खाण्याचे प्रमाण वाढलेे. ही जागृती करण्याची आमची तयारी असल्याचे असोिसएशनने म्हटले आहे. समुपदेशन केंद्र उभारणार राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केद्रात तोंडाच्या कॅन्सरचे निदान तसेच स्क्रिनिंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अनेकांना तंबाखूचे व्यसन सोडायचे असते. मात्र, त्यांना योग्य ते समुपदेशन मिळत नाही. त्यासाठी विशेष समुपदेशन केंद्रे उभारण्याचीही सरकारची योजना आहे. वृत्तसंस्था | नवी दिल्ली केंद्र सरकार भ्रष्टाचारविरोधी कायद्यात बदल करण्याबाबत विचार करत आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआय अथवा इतर तपास संस्थांनी लोकपालाची संमती घेणे अनिवार्य करण्याची तरतूद कायद्यात करण्याचा सरकारचा इरादा आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार ही तरतूद करत असल्याचा आरोप होत आहे. सरकारनेमात्र,कर्मचाऱ्यांचेकामपरिणामकारक आणि पारदर्शक व्हावे यासाठी हे केले जात असल्याचा दावा केला आहे. खटला चालवण्याची परवानगी देणारा अधिकार लोकपालाला असावा अशी तरतूद लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यात करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी लोकपालाची संमती अनिवार्य? भ्रष्टाचारविरोधी कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार वृत्तसंस्था | जिनेव्हा संशयित मनी लाँडरिंग प्रकरणात स्वित्झर्लंडच्या पोलिसांनी बुधवारी बँकिंग क्षेत्रातील दिग्गज एचएसबीसी बँकेवर धाड टाकली. सुमारे १,१९५ भारतीयांची खाती या बँकेत असल्याची माहिती उघड झाल्यानंतर एचएसबीसी बँक चर्चेत आली होती. शोधपत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या समूहाने महिनाभरापूर्वी बँकेच्या जिनेव्हा शाखेतील एक लाख खातेधारकांची माहिती सार्वजनिक केली होती. त्यात भारतातील मोठ्या उद्योगपती, राजकारणी आदी १,१९५ खातेधारकांची नावे होती. स्विस पोलिसांची एचएसबीसीवर धाड माेदींच्या दाैऱ्याबाबत महाजनांचे स्पष्टीकरण प्रतिनिधी । जळगाव पंतप्रधान नरेंद्र माेदी हे बारामती दाैऱ्यावर येऊन गेले. मात्र, त्यांच्या दाैऱ्याचा अाणि सिंचन घाेटाळ्याच्या चाैकशीचा काहीही संबंध नाही. सिंचन घाेटाळ्याची चाैकशी सुरूच राहणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी स्पष्ट केले. जिल्हापरिषदेच्यादक्षतासमितीच्या बैठकीनंतर महाजन पत्रकारांशी बाेलत हाेते. पंतप्रधान बारामतीत येऊन गेले. त्यामुळे जलसिंचन घाेटाळ्याची चाैकशी थांबेल, अशा वावड्या उठवल्या गेल्या. मात्र, या दाैऱ्यामुळे िसंचन घाेटाळ्याच्या चाैकशीवर काेणताही परिणाम हाेणार नाही. जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांसंदर्भात बाेलताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील उर्वरित.पान १२ ‘िसंचन’ चाैकशीवर परिणाम नाही िशवसेना राज्यमंत्र्यांची मागणी रास्त नाही शिवसेनेचे राज्यमंत्री व भाजपचे कॅबिनेटमंत्री यांच्यातील वादाबाबत गिरीश महाजन म्हणाले की, राज्यमंत्र्यांना िनयमानुसार अधिकार िदलेले अाहेत. यासंदर्भात शासनाने अादेशही काढले असून, िशवसेना राज्यमंत्र्यांच्या काही मागण्या अवास्तव अाहेत. त्यामुळे त्या मान्य करता येणार नाहीत. मुख्यमंत्री हा वाद लावकरच मिटवतील. प्रतिनिधी | हिंगोली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२१- २२ मध्ये वास्तव्य केलेले लंडनस्थित घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सरकारने स्वारस्य किंमत म्हणून एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आहे. लंडन येथील १० किंग्ज हेन्री मार्गावरील एन.डब्ल्यू. ३ या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते. १ सप्टेंबर २०१४ रोजी घर मालकाने हे घर मे. सेडॉन्स या कंपनीमार्फत विक्रीला काढले होते. ही वास्तू सरकारने विकत घेऊन त्या ठिकाणी स्मारक करावे, अशी आंबेडकरप्रेमींची मागणी आहे. ही इमारत खरेदी करण्याची इतर खरेदीदारांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सरकारनेही पावले उचली आहेत. सरकारने सायमन रॉस यांची सॉलिसिटर म्हणून नियुक्ती केली आहे. खरेदी प्रक्रियेसाठी स्वारस्य बोलीसाठी एकूण रकमेच्या १० टक्के म्हणजेच ३ कोटी १० लाख रुपये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या निधीतून देण्याचा निर्णय घेतला. आंबेडकरांच्याघरासाठी ~३.१० कोटी भरणारलंडनस्थित घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू वृत्तसंस्था | नवी दिल्ली/ बंगळुरू गुजरातच्या समुद्रात गेल्या ३१ डिसेंबरला दिसलेल्या पाकिस्तानी बोटीशी संबंधित एक व्हिडिओ उघडकीस आला आहे. सुरतमध्ये मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. आपल्याच आदेशावरून ही बोट उडवण्यात आली, असा दावा भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक बी. के. लोशाली त्या व्हिडिओत करत आहेत. लोशाली यांच्या दाव्यामुळे त्या बोटीवरील चालक दलानेच आग लावल्याचा दावा करणारे केंद्र सरकार चांगलेच अडचणीत आले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लगेचच त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘चुकीच्या वक्तव्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. आम्ही या वक्तव्याची चौकशी करू,’ असे पर्रीकर म्हणाले. लोशाली यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. संरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर तटरक्षक दलाने लोशाली यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून सुरतमध्ये केलेल्या दाव्यावर खुलासा मागितला आहे. बंगळुरूमध्ये पर्रीकर म्हणाले की, ‘आम्ही जुन्याच दाव्यावर ठाम आहोत. बोट तटरक्षक दलाने उडवली नाही याचे पुरावेही मी देईन.’ संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर लोशाली यांनीही घूमजाव केले. ‘बोटीवरील लोकांनीच तिला आग लावली,’ असे ते म्हणाले. काेस्ट गार्डनेच उडवली पाकची बाेट : डीअायजी सरकारची गोची | चुकीच्या वक्तव्याने वस्तुस्थिती बदलत नाही : पर्रीकर संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यावर संशय : संरक्षण मंत्रालयानुसार तटरक्षक दलाने बोटीचा पाठलाग केला. घेरले गेल्यानंतर चार संशयितांनी बोट उडवून दिली. अाता लोशालींच्या वक्तव्यानंतर पाकने भारताच्या दाव्यावर संशय घेतला. भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचे पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी म्हटले. तटरक्षक दलाची डीआयजी लोशालींना कारणे दाखवा नोटीस ^संरक्षण मंत्रीजी, पाकिस्तानी बोट उडवणे मोठा गुन्हा आहे की देशाशी खोटे बोलणे? जर ते दहशतवादी होते तर त्यांना उडवण्यात लाज कसली? - मनीष तिवारी, काँग्रेसचे नेते ^सरकार कसे काम करते हे यावरून लक्षात येते. हे म्हणजे एक हात काय काम करत आहे याचा दुसऱ्या हाताला पत्ताच नसावा तसे हे आहे. - दीपक वाजपेयी, आप प्रवक्ता बोट उडवणे की खोटे बोलणे हा गुन्हा? लोशाली यांची दोन वक्तव्ये... आधी : बोट उडवून द्या, त्यांना बिर्याणी खाऊ घालण्याची आमची इच्छा नाही : ‘तुम्हाला ३१ डिसेंबरच्या रात्रीची आठवण असेल. आम्ही पाकिस्तानी बोट उडवून दिली होती. मी त्या रात्री गांधीनगरमध्ये होतो. मी म्हणालो - बोट उडवून द्या. त्यांना बिर्याणी खाऊ घालण्याची आमची इच्छा कदापि नाही.’ नंतर म्हणाले : जे छापून आले त्यात तथ्य नाही : ‘हे प्रकरण माझ्याकडे नाही. जे छापून आले त्यात तथ्य नाही. मी असे वक्तव्य केले नाही. फक्त राष्ट्रविरोधी तत्त्वांना बिर्याणी खाऊ घालण्याची गरज नाही एवढेच म्हणालो होतो.’ उडवून देण्यात अालेली हीच ती संशयित पाकिस्तानी बाेट. कराचीहून निघाली होती संशयित बोट बोटीला ३१ डिसेंबरच्या रात्री पोरबंदर समुद्र किनाऱ्यापासून ३६५ किमी अंतरावर आग लागली होती. ती कराची केटी बंदरावरून निघाली होती, तिला तेथूनच निर्देश मिळत होते, असे संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले होते. बोटीवरील चार संशयितांनीच ती उडवली होती, असे तटरक्षक दलानेही सांगितले होते. वृत्तसंस्था | नवी दिल्ली ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावरील प्राणघातक हल्ला ही गंभीर घटना असल्याचे सांगत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावून अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. मानवी हक्क आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार, राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालकांना चार आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कोल्हापूरात १६ फेब्रुवारीला पानसरे दांपत्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. गंभीर जखमी पानसरेंवर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. याबाबतीच्या बातम्यांची दखल घेऊन आयोगाने ही नोटीस बजावली आहे. पानसरे हल्ला : मानवी हक्क आयोगाची राज्य सरकारला नोटीस मोदींचे नाव विणलेल्या सूटवरसव्वाकोटीचीबोलीसुरत | नरेंद्र मोदींच्या सूटचा लिलाव बुधवारी सुरू झाला. पहिल्या दिवशी राजेश जुनेजा या व्यावसायिकाने १.२१ कोटी रुपयांची बोली लावली. या कोटवर सोन्याच्या तारांनी नरेंद्र दामोदरदास मोदी' असे नाव विणलेले आहे. मोदींनी तो २५ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत चाय पे चर्चा कार्यक्रमात घातला होता. मोदींना भेट मिळालेल्या ४५५ वस्तूही लिलावात ठेवलेल्या आहेत. त्यातून मिळणारी रक्कम गंगेच्या स्वच्छतेवर खर्च केली जाईल. ज्याने भेट दिला : मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणात दिला होता.. मी २६ जानेवारीच्या माझ्या मुलाच्या लग्नात घालून येण्यासाठी मोदींना सूट भेट दिला. ते आले नाहीत, सूट मात्र घातला. - रमेश भिकाभाई विराणी, व्यावसायिक. ज्याने बोली लावली : सूट व मोदींच्या पुतळ्याशी गुजगोष्टी... २००६ मध्ये सुरतेतील महापुरादरम्यान मोदींनी विद्याभारती शाळेत थांबून २२-२२ तास काम केले. त्याने मी प्रभावित झालो. मी हा सूट घालणार नाही, तो पुतळ्यासकट ऑफिसमध्ये ठेवून त्यांच्याशी गप्पा करीन. त्यामुळे मला प्रेरणा मिळेल. - राजेश जुनेजा, कपड्यांचे व्यावसायिक. अन् ज्यांनी विरोध केला : सूट अशुभ, म्हणूनच लिलावात सूटमुळे दिल्लीची निवडणूक हरले. मोदी त्याला अपशकुनी मानतात. यामुळे त्याचा लिलाव करत आहेत.- राशीद अल्वी, काँग्रेस प्रवक्ते. सूटवर चर्चा २५ जाने. ला घातला होता सूट एक लाखापासून बोली सुरू, शुक्रवारपर्यंत लिलाव वृत्तसंस्था | नवी दिल्ली देशभरात स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६६३ वर गेली आहे, तर १०,०२५ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार, स्वाइन फ्लूमुळे राजस्थानमध्ये बुधवारी ८ लोकांचा मृत्यू, तर ३४३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत स्वाइन फ्लूची तपासणी आणि उपचारासाठी सरकारने साडेचार हजार रुपये शुल्क निश्चित केले आहे. खासगी रुग्णालयांना यापेक्षा जास्त शुल्क घेता येणार नाही. तेलंगणमध्ये २४ तासांत ३० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तेथे एकूण ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूमुळे ६६३ बळी, १० हजार बाधित वर्ल्डकपिवंडो अाजचा सामना िझम्बाॅब्वे युएई पहाटे 3.30 वाजेपासून अफगाणिस्तान 162 (42.5 षटके) बांगलादेश 267 (50 षटके) 105 धावांनी बांगलादेश विजयी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची अाज जयंती. विनम्रअभिवादन! न्यूजइनबॉक्स गुडन्यूज नेटशिवाय मोबाइलवर शोधा १३०० पर्यटनस्थळे नवी दिल्ली | हॉलीडे आयक्यू ऑफ लाइन मोबाइल अॅप लाँच झाले आहे. त्याद्वारे इंटरनेट कनेक्शनशिवाय देशातील १०० पर्यटनस्थळांशी संबंधित माहिती मिळेल. ते हॉलीडे आयक्यू कंपनीने तयार केले आहे. बीएमडब्ल्यूची २.२९ कोटींची आय ८ कार लाँच नवी दिल्ली | बीएमडब्ल्यूने बुधवारी हायब्रीड कार आय ८ लाँच केली. दिल्लीत तिची किंमत २.२९ कोटी रुपये आहे. बटरफ्लाय डोअर हे तिचे वैशिष्ट्य आहे. प्रख्यात चित्रपट निर्माते डी. रामा नायडूंचे निधन हैदराबाद | खासगीरीत्या सर्वाधिक चित्रपट बनवण्याचा गिनीज रेकॉर्ड करणारे चित्रपट निर्माते डी.रामानायडू (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांनी विविध भाषांत १५० चित्रपटांची निर्मिती केली होती. सचिनसोबत दीड लाख रुपयांत डिनरची संधी मेलबर्न | सिडनीत सचिन तेंडुलकरसोबत ७० हजार ते दीड लाख रुपयांत डिनर करता येईल. येथील एका रेस्टॉरंटने २६ फेब्रुवारीसाठी ही ऑफर दिली. एप्रिलपासून योजनांचे पैसे थेट लाभार्थीच्या खात्यात नवी दिल्ली | एप्रिलपासून सर्व योजनांचा पैसा थेट लाभार्थीच्या खात्यात पोहोचणार आहे. अर्थ मंत्रालयाने केंद्र, राज्यांच्या सर्व विभागांना तसे निर्देश दिले आहेत. दिव्यमराठीविशेष आयपॅडच्या साहाय्याने लिहितात सेरेब्रल पाल्सी आजाराने पीडित रिचर्ड नाकाने लिहिली रागाची कविता!वृत्तसंस्था | लिव्हरपूल लिव्हरपूलच्या रिचर्ड हॉपले यांच्या शरीराच्या कोणत्याही भागावर त्यांच्या मेंदूचे नियंत्रण नाही. ते नीट बोलूही शकत नाहीत. बहुतांश वेळ व्हीलचेअरवरच असतात.त्यांचाआजारचतसाआहे.(सेरेब्रलपाल्सी) तो कोणालाही कुंठित करून टाकतो. रिचर्डचेही तेच झाले. मग वयाच्या एका टप्प्यावर बरोबरीचे तरुण गर्लफ्रेंडचा हात हातात घेऊन फिरताना पाहिल्यावर त्यांना आपल्या लाचारीचा प्रचंड राग आला. एकेदिवशी घरी बसून कॉम्प्युटरवर काही तरी काम करत होते. तेव्हा मनात काही शब्द गुणगुणू लागले. एक कविता आकार घेत होती. त्यांना त्याची जाणीव झाली. मग ते लिहित गेले. वर्षभरानंतर त्यांचा ‘रिव्हर बुक’ हा कवितासंग्रह बाजारात आला. रिचर्ड आयपॅडवर नाकाने लिहितात. त्यांची बोटे काम करत नाहीत. आता तीच त्यांची गर्लफ्रेंड आहे. आपला राग व्यक्त करण्याचा सर्वात चांगला मार्ग! ‘प्रत्येक कविता अभिव्यक्तीचा स्नॅपशॉटच’ रिचर्ड ४१ वर्षांचे आहेत. ते सांगतात, ‘मी धड बोलू शकत नव्हतो, पण मला नेहमीच माझे म्हणणे मांडावे वाटत असे. त्यामुळे आपले म्हणणे मांडण्यासाठी कविताच योग्य माध्यम वाटले. आज प्रत्येक कविता माझ्या अभिव्यक्तीचा स्नॅपशॉट आहे. या प्रवासातही काही कमी अडचणी आल्या नाहीत. आधी मी जुन्या कॉम्प्युटरवर लिहित होतो. विशेष प्रकारचा माऊस व स्टँडर्ड की बोर्डच्या साहाय्याने लिहित होतो, मात्र शरीरावर खूप ताण पडायचा. त्यामुळे एकदा पाठीला मारही लागला. समस्या आणखीच वाढली. मात्र कधीच हार मानली नाही. आयपॅड विकत घेतला. नाकाने लिहिण्याचा प्रयत्न केला आणि मग लिहितच राहिलो.’ लिव्हरपूलमधून वाहणाऱ्या मर्सी नदी किनाऱ्यालगतच्या एल्बर्ट डॉक परिसरात रिचर्ड राहतात. घरापासूनच वाहणारी ही नदी त्यांच्या कवितांची सर्वात मोठी प्रेरणा आहे. खिडकीत बसून जेव्हा ते नदीकडे पाहायचे तेव्हा त्यांच्या डोक्यात कविता रुंजी घालायची. दुसरी प्रेरणा आहे तंत्रज्ञान. त्यामुळेच ते आज या टप्प्यावर पोहोचले आहेत. म्हणून त्यांनी तंत्रज्ञानालाही कवितेचा साज चढवला. घराजवळच्या नदीपासून प्रेरणा वृत्तसंस्था । गुवाहाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लोकशाहीविरोधी’ आहेत, तर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा ‘अहंकारी’ आहेत, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रद्युत बोरा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. बोरा आसाममधील असून, ते २००७-२००९ दरम्यान पक्षाच्या आयटी आघाडीचे सदस्य होते. त्यांनी बुधवारी रात्री पक्षाध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, मोदींनी लोकशाही परंपरेला नुकसान पोहोचवले नाही काय? परराष्ट्र सचिवांना हटवले जात आहे याची माहिती आज परराष्ट्रमंत्र्यांना नसते. कॅबिनेट मंत्र्यांना ओएसडी नियुक्त करण्याचा अधिकारही नाही. मोदी लोकशाहीविरोधी, तर शहा अहंकारी भाजप नेत्याकडून आरोप