SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
प्रतिनिधी | हिंगोली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२१-
२२ मध्ये वास्तव्य केलेले लंडनस्थित
घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी
होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वारस्य
किंमत म्हणून एकूण किमतीच्या
१० टक्के रक्कम भरण्याचा निर्णय
घेतला आहे.
लंडन येथील १० किंग्ज हेन्री
मार्गावरील एन.डब्ल्यू. ३ या घरात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास
होते. १ सप्टेंबर २०१४ रोजी संबंधित
घर मालकाने हे घर मे. सेडॉन्स या
कंपनीमार्फत विक्रीला काढले होते.
बाबासाहेबांनी वास्तव्य केलेली ही
वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन
त्या ठिकाणी स्मारक करावे, अशी
राज्यभरातील आंबेडकरप्रेमींची मागणी
आहे. ही इमारत खरेदी करण्याची इतर
खरेदीदारांनी तयारी दर्शवली आहे.
त्यामुळे शासनाकडून प्रक्रियेसाठी
आवश्यक पावले उचलणे गरजेचे
आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य
शासनानेसायमनरॉसयांचीसॉलिसिटर
(विधिज्ञ) म्हणून नियुक्ती केली आहे.
घर खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण
करण्यासाठी स्वारस्य बोलीसाठी एकूण
रकमेच्या १० टक्के म्हणजेच ३ कोटी
१० लाख रुपये महात्मा फुले आर्थिक
विकास महामंडळाच्या निधीतून
देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मे. सेडॉन्स सॉलिसिटर्सच्या लंडन
येथील बरक्लीस बँकेतील खात्यावर
ही रक्कम ताबडतोब जमा करण्याचे
आदेश देण्यात आले आहेत.
ही रक्कम महात्मा फुले
महामंडळाला नंतर परत करण्यात
येणार असल्याचेही आदेशात म्हटले
आहे. राज्य सरकारचे उपसचिव दि. रा.
डिंगळे यांनी बुधवारी सामाजिक न्याय
व विशेष साह्य विभागाला ही रक्कम
भरण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरासाठी
राज्य सरकारने भरले ३.१० कोटी रुपये
बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले लंडनस्थित घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू
प्रतिनिधी । नागपूर
मध्य भारतातील पहिले आणि
महाराष्ट्रातील दुसरे ‘सायन्स इनोव्हेशन
सेंटर’ नागपुरात सुरू होणार आहे. या
केंद्राचे बांधकाम रामण विज्ञान केंद्रात
सुरू झाले असून, जुलै-२०१५ मध्ये हे केंद्र
कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
रामण विज्ञान केंद्र, राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे
रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र विभाग
आणि इंडियन सायन्स काँग्रेसच्या नागपूर
शाखेच्या संयुक्त सहकार्याने गुरुवार
१९ फेब्रुवारीपासून रामण विज्ञान केंद्रात
पहिल्या तीन दिवसीय ‘नागपूर सायन्स
अँड इंजिनिअरिंग फेअर’चे आयोजन
केले आहे. या कार्यक्रमासंदर्भात माहिती
देण्यासाठी बाेलावलेल्या पत्रकार परिषदेत
रामण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक
व्ही. एम. जोशी यांनी ही माहिती दिली.
२०१४ मध्ये केंद्र सरकारने नागपुरात
‘सायन्स इनोव्हेशन सेंटर’ मंजूर केले.
नोव्हेंबर २०१४ मध्ये  उर्वरित पान. १२
मध्य भारतातील
पहिले ‘सायन्स
इनोव्हेशन सेंटर’
होणार नागपुरात
प्रतिनिधी । नागपूर
रेल्वे विभागाच्या वतीने
कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवासाची
कल्याणकारी योजना राबवली
जाते. त्यासाठी अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांना प्रिव्हीलेज पासेस
पुरवले जातात. या योजनेपोटी रेल्वेवर
पडणारा आर्थिक भार किमान दोन
हजार कोटींच्या घरात असण्याचा
अंदाज व्यक्त होत असला, तरी
त्याचा हिशेब रेल्वेकडून ठेवला
जात नाही, अशी धक्कादायक बाब
माहिती अधिकारात विचारलेल्या
माहितीवरून उघड झाली आहे.
रेल्वेच्या वतीने सर्वच
कर्मचाऱ्यांसाठी (सेवानिवृत्त
कर्मचाऱ्यांसह)मोफतरेल्वेप्रवासाची
योजना राबवली जाते. कर्मचाऱ्यांना
कुटुंबासह मोफत रेल्वे प्रवास करता
यावा, यासाठी त्यांना वर्षाकाठी
विशिष्ट संख्येने प्रिव्हीलेज पासेस
पुरवले जातात. अधिकाऱ्यांना वर्षाला
सहा, तर कर्मचाऱ्यांना तीन आणि
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन
वेळ कुटुंबासह मोफत प्रवास करता
येतो. कनिष्ठ वर्गवारीतील कर्मचारी
सोडले तर बहुतेकांना एसी-२, एसी-
३ या श्रेणीतून प्रवास करता येतो.
नागपुरातील आरटीआय कार्यकर्ते
अविनाश प्रभुणे यांनी यासंदर्भात
रेल्वेकडे माहिती मागितल्यावर या
योजनेसंदर्भात स्वतंत्र हिशेब ठेवला
जात नाही, अशी धक्कादायक
माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी
दिली. अधिकारी वा कर्मचाऱ्यांना
दिल्या जाणाऱ्या पासेसच्या संख्येचा
हिशेब तेवढा ठेवला जात असला
तरी या योजनेवरील खर्चाचे हिशेब
ठेवण्याची तरतूद नाही, असे रेल्वेने
स्पष्टपणे  उर्वरित पान. १२
कर्मचारी मोफत प्रवास;
खर्चाचा हिशेबच नाही
रेल्वेकडे मागितलेल्या माहितीतून झाले उघड
रेल्वेच्या सुमारे २५ लाख
कर्मचाऱ्यांना मिळते पास
संग्रामपूर तालुक्यातील पळशी येथे महाशिवरात्रीच्या रात्री बनविण्यात आलेला सात क्विंटल ३५ किलोचा महारोठ
प्रतिनिधी । संग्रामपूर
आदिवासीबहुल संग्रामपूर
तालुक्यातील १२३ वर्षांची परंपरा
असलेल्या पळशी झाशी येथील
शंकरगिरी महाराजांच्या महारोठाचा
प्रसाद स्वीकारण्यासाठी परिसरातील
हजारो आदिवासी बांधवांसह
नजीकच्या जिल्ह्यातील नागरिकांनी
मंदिरात मोठी गर्दी केली होती. महारोठ
आणि गूळ असा प्रसाद या वेळी
भाविकांनी मोठ्या श्रद्धेने स्वीकारला.
या वर्षीचा महाराेठ हा सात क्विंटल ३५
किलोचा होता.
मंगळवारी महाशिवरात्रीच्या रात्री
९ वाजता हा महारोठ बनवण्यास प्रारंभ
झाला. ‘हर हर महादेव’, ‘शंकरगिरी
महाराज की जय’  उर्वरित पान. १२
पळशी झाशीत महारोठचा प्रसाद
सात क्विंटल ३५ किलोचा होता महाराेठ, आदिवासी पट्ट्यातील भाविकांची गर्दी
अध्यात्म,विज्ञानाचीसांगड
^सुमारे १२५ वर्षांपूर्वी येथे शंकरगिरी
महाराजांनी ही प्रथा सुरू केली.
विज्ञान व अध्यात्माची सांगड घालत त्यांनी
नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रयत्न
केले. यामध्ये चमत्काराला स्थान नाही.
गुलाबराव मारोडे, विश्वस्त, श्री शंकरगिरी
महाराज संस्थान, पळशी झाशी.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज
यांची अाज जयंती.
विनम्रअभिवादन
अमरावती गुरुवार, १९ फेब्रुवारी २०१५
एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.००
सेन्सेक्स	 29230.26
मागील	 29135.88
सोने	 27,380.00
मागील	 27,680.00
चांदी	 39,000.00
मागील	 39,500.00
डॉलर	 62.34
मागील	 62.16
यूरो	 70.81
मागील	 70.95
सुविचार
कुठलेही काम करताना हार
मानणे ही सर्वांत मोठी कमजोरी
आहे. यशाचा एकच मंत्र आहे,
पुन्हा एकदा प्रयत्न करा.
थॉमस अल्वा एडिसन
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष २ | अंक १८७ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
बीएमडब्ल्यूची २.२९
कोटींची आय ८ कार लाँच
नवी दिल्ली | बीएमडब्ल्यूने
बुधवारी हायब्रीड कार आय ८
लाँच केली. दिल्लीत तिची किंमत
२.२९ कोटी रुपये आहे. बटरफ्लाय
डोअर हे तिचे वैशिष्ट्य आहे.
 सविस्तर. पान ९
प्रख्यात चित्रपट निर्माते
डी. रामा नायडूंचे निधन
हैदराबाद | खासगीरीत्या सर्वाधिक
चित्रपट बनवण्याचा गिनीज
रेकॉर्ड करणारे
चित्रपट निर्माते
डी.रामानायडू
(वय ७८)
यांचे निधन
झाले. त्यांनी
विविध भाषांत १५० चित्रपटांची
निर्मिती केली होती.
पीएम माेदींच्या सूटसाठी
सव्वा कोटीची बोली
सूरत | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक
ओबामा यांच्या भारत दौऱ्यात
पंतप्रधाननरेंद्रमोदीयांनीघातलेल्या
सूटचा लिलाव होत आहे. बुधवारी
त्याची बोली तब्बल १ कोटी २१
लाख ११ हजार १११ रुपयांवर
पोहोचली.  सविस्तर. पान १२
सचिनसोबत दीड लाख
रुपयांत डिनरची संधी
मेलबर्न | सिडनीत सचिन
तेंडुलकरसोबत ७० हजार ते
दीड लाख रुपयांत डिनर करता
येईल. येथील एका रेस्टॉरंटने २६
फेब्रुवारीसाठी ही ऑफर दिली.
एप्रिलपासून योजनांचे पैसे
थेट लाभार्थीच्या खात्यात
नवी दिल्ली | एप्रिलपासून सर्व
योजनांचा पैसा थेट लाभार्थीच्या
खात्यात पोहोचणार आहे. अर्थ
मंत्रालयाने केंद्र, राज्यांच्या सर्व
विभागांना तसे निर्देश दिले आहेत.
विशेष प्रतिनिधी | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी
उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे
िनधन महाराष्ट्राला चटका लावून
जाणारे असून त्याला तंबाखूचे
अतिसेवन कारणीभूत ठरले आहे.
म्हणूनच राज्य सरकारने आता
तंबाखूविरोधात आरपारची लढाई
लढण्याचा निर्धार केला आहे. या
मोहिमेत आरोग्य खाते शाळा तसेच
अन्य शैक्षणिक संस्थांवर करडी
नजर ठेवणार आहे. राज्यात एकही
शिक्षक तंबाखूचे सेवन करणारा असू
नये, शाळेच्या आवारात वा वर्गात
त्याने तंबाखूचा बार भरून जाऊ नये,
यासाठी दक्षता घेतली जात असून
अशा शिक्षकांवर कारवाईचा बडगा
उगारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘तंबाखूमुक्त महाराष्ट्रा’साठी
तंबाखू, पानमसाला, गुटख्याच्या
उच्चाटनासाठी  उर्वरित. पान १२
... ही धोक्याची घंटा
^‘तोंडाच्या कॅन्सरमुळे राज्याला
एका ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला
मुकावे लागले, ही दु:खद बाब आहे.
राज्यात सध्या २ कोटी लोक तंबाखूच्या
विळख्यात आहेत. त्यांच्यासाठी आबांचा
मृत्यू धोक्याची घंटा मानली गेली पाहिजे.
या घटनेतून धडा घेऊन 'तंबाखूमुक्त
महाराष्ट्रा'चा विडा उचलला आहे.
- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री
जाहिरातींवरही बंदी : तंबाखूमुक्तीसाठी राज्यात टीव्ही तसेच वर्तमानपत्रांतील
पानमसाल्याच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
शाळा-काॅलेजांततंबाखूमुक्तीचीघंटा,शिक्षकांवरथेटकारवाई
{ आबांच्या
िनधनानंतर िनर्धार
‘तंबाखूमुक्त
महाराष्ट्रा’चा
{ राज्यात
तंबाखू, गुटखा,
पानमसाल्याच्या
उच्चाटनासाठी १०
कलमी कार्यक्रम
८ हजार डाॅक्टरांची मदत
इंडियन डेंटल असोसिएशनच्या ८
हजार डॉक्टरांनी या मोहिमेत योगदान
देण्याची तयारी दर्शविली आहे. तोंडाच्या
आरोग्याबाबत जागृती नसल्याने तंबाखू,
गुटखा खाण्याचे प्रमाण वाढलेे. ही जागृती
करण्याची आमची तयारी असल्याचे
असोिसएशनने म्हटले आहे.
समुपदेशन केंद्र उभारणार
राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य
केद्रात तोंडाच्या कॅन्सरचे निदान तसेच
स्क्रिनिंग करण्याची सुविधा उपलब्ध
करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाच्या
अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
अनेकांना तंबाखूचे व्यसन सोडायचे असते,
मात्र त्यांना योग्य ते समुपदेशन मिळत
नाही. त्यासाठी विशेष समुपदेशन केंद्रे
उभारण्याचीही सरकारची योजना आहे.
केजरींचा खोकला, मोदींना चिंता
दिव्यमराठीविशेष ‘आप’लेपणाने दिला सल्ला : बंगळुरूच्या डॉ. नागेंद्र यांना दाखवून बघा
अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली
नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल,
किरण बेदींसह अनेक दिग्गज नेते
मंगळवारी दिल्ली पोलिस आयुक्त
बी.एस. बस्सी यांच्या अॅट-होम'
रिसेप्शनमध्ये सहभागी झाले. या
वेळी त्यांच्यात अगदी घरच्यासारखी
गप्पाष्टके रंगली.
केजरीवाल, मनीष शिसोदिया,
नायब राज्यपाल नजीब जंग,
गृहमंत्री राजनाथसिंह व पंतप्रधान
नरेंद्र मोदी हे बस्सींच्या घरी दाखल
झाले. गप्पांदरम्यान केजरीवालांना
खोकला आला. त्यावर राजनाथ
म्हणाले- तुम्हाला नेहमीच खोकला
असतो! केजरीवाल उत्तरले - मीही
वैतागलोय, खोकला बराच होत
नाही. इतक्यात मोदींनी विचारले-
तुम्हाला इतका खोकला कसा येतो,
हा त्रास कधीपासून आहे? मध्येच
मनीष शिसोदिया म्हणाले - मी तर
१२-१५ वर्षांपासून बघतोय. यावर
केजरीवाल म्हणाले - कधी कधी
कमी होतो. मात्र, हवामान बदलले
वा धूळ वाढली की खाेकला पुन्हा
वाढतो. त्यावर मोदी म्हणाले - तुम्ही
बंगळुरूत डॉ. नागेंद्र यांना दाखवून
पाहा. ते जुनाट खोकल्याचे तज्ज्ञ
आहेत. तुमचा आजार नक्कीच बरा
होईल. उत्तरात केजरीवाल यांनी
होकारार्थी मान हलवली.
पंतप्रधानांनी शिकवले -
बघा, अशी घेतात सेल्फी
कार्यक्रमात लोक फोटो घेत होते. मीही
(दिव्य मराठी प्रतिनिधी) मोदींसोबत
सेल्फीची फर्माईश केली. त्यांनी मान्य
केली. मात्र, मला चांगला फोटो घेता
येत नव्हता. मोदींनी माझा फोन घेतला
व म्हणाले - ज्याच्यासोबत सेल्फी
घ्यायची त्याला कॅमेऱ्याकडे पाहायला
सांगायचे... अन् फोटो क्लिक केला.
चाय पे चर्चा : दिल्ली निवडणुकीनंतर सत्ताधारी-विरोधक प्रथमच एकत्र अाले.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे
व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावरील
प्राणघातक हल्ला ही गंभीर घटना
असल्याचे सांगत राष्ट्रीय मानवी हक्क
आयोगाने राज्य सरकारला नोटीस
बजावून अहवाल सादर करण्याचेही
आदेश दिले आहेत.
मानवी हक्क आयोगाने जारी
केलेल्या पत्रकानुसार, राज्याचे मुख्य
सचिव, पोलिस महासंचालकांना
चार आठवड्यांत अहवाल सादर
करण्यास सांगितले आहे. कोल्हापूरात
१६ फेब्रुवारीला पानसरे दांपत्यावर
अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला
होता. गंभीर जखमी पानसरेंवर
अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या
असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.
याबाबतीच्या बातम्यांची दखल घेऊन
आयोगाने ही नोटीस बजावली आहे.
पानसरे हल्ला : मानवी
हक्क आयोगाची राज्य
सरकारला नोटीस
नेटशिवाय मोबाइलवर
शोधा १३०० पर्यटनस्थळे
नवी दिल्ली | हॉलीडे आयक्यू
ऑफ लाइन मोबाइल अॅप लाँच
झाले आहे. त्याद्वारे इंटरनेट
कनेक्शनशिवाय देशातील १००
पर्यटनस्थळांशी संबंधित माहिती
मिळेल. ते हॉलीडे आयक्यू
कंपनीने तयार केले आहे.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली/ बंगळुरू
गुजरातच्या समुद्रात गेल्या ३१
डिसेंबरला दिसलेल्या पाकिस्तानी
बोटीशी संबंधित एक व्हिडिओ
उघडकीस आला आहे. सुरतमध्ये
मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमाचा
तो व्हिडिओ आहे. आपल्याच
आदेशावरून ही बोट उडवण्यात
आली, असा दावा भारतीय तटरक्षक
दलाचे महासंचालक बी. के. लोशाली
त्या व्हिडिओत करत आहेत. लोशाली
यांच्या दाव्यामुळे त्या बोटीवरील
चालक दलानेच आग लावल्याचा
दावा करणारे केंद्र सरकार चांगलेच
अडचणीत आले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी
लगेचच त्यावर प्रतिक्रिया दिली.
‘चुकीच्या वक्तव्यामुळे वस्तुस्थिती
बदलत नाही. आम्ही या वक्तव्याची
चौकशी करू,’ असे पर्रीकर म्हणाले.
लोशाली यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची
कारवाई करण्याचे संकतेही त्यांनी
दिले आहेत. संरक्षणमंत्र्यांच्या या
विधानानंतर तटरक्षक दलाने लोशाली
यांना कारणे दाखवा नोटीस बजावली
असून सुरतमध्ये केलेल्या दाव्यावर
खुलासा मागितला आहे. बंगळुरूमध्ये
पर्रीकर म्हणाले की, ‘आम्ही जुन्याच
दाव्यावर ठाम आहोत. बोट तटरक्षक
दलाने उडवली नाही याचे पुरावेही मी
देईन.’ संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर
लोशाली यांनीही घूमजाव केले.
‘बोटीवरील लोकांनीच तिला आग
लावली,’ असे ते म्हणाले.
पाकिस्तानची बोट अाम्हीच
उडवली : डीआयजींचा दावा
सरकारची गोची | चुकीच्या वक्तव्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही : संरक्षणमंत्री
तटरक्षक दलाने बजावली डीआयजी लोशालींना कारणे दाखवा नोटीस
^संरक्षण मंत्रीजी, पाकिस्तानी बोट
उडवणे मोठा गुन्हा आहे की देशाशी
खोटे बोलणे? जर ते दहशतवादी होते तर
त्यांना उडवण्यात लाज कसली?
- मनीष तिवारी, काँग्रेसचे नेते
^सरकार कसे काम करते हे यावरून
लक्षात येते. हे म्हणजे एक हात
काय काम करत आहे याचा दुसऱ्या
हाताला पत्ताच नसावा तसे हे आहे.
- दीपक वाजपेयी, आप प्रवक्ता
बोट उडवणे मोठा गुन्हा की देशाशी खोटे बोलणे?
लोशाली यांची
दोन वक्तव्ये...
आधी : बोट उडवून द्या,
त्यांना बिर्याणी खाऊ
घालण्याची आमची इच्छा
नाही : ‘तुम्हाला ३१
डिसेंबरच्या रात्रीची आठवण
असेल. आम्ही पाकिस्तानी
बोट उडवून दिली होती. मी
त्या रात्री गांधीनगरमध्ये
होतो. मी म्हणालो - बोट
उडवून द्या. त्यांना बिर्याणी
खाऊ घालण्याची आमची
इच्छा नाही.’
नंतर म्हणाले : जे छापून
आले त्यात तथ्य नाही : ‘हे
प्रकरण माझ्याकडे नाही.
जे छापून आले त्यात तथ्य
नाही. मी असे वक्तव्य केले
नाही. फक्त राष्ट्रविरोधी
तत्त्वांना बिर्याणी खाऊ
घालण्याची गरज नाही
एवढेच म्हणालो होतो.’
हीच ती संशयित पाकिस्तानी बाेट डिसेंबरमध्ये उडवून देण्यात अाली हाेती.
कराचीहून निघाली होती संशयित बोट
पाकिस्तानी बोटीला ३१ डिसेंबरच्या रात्री पोरबंदर समुद्र किनाऱ्यापासून ३६५ किमी
अंतरावर आग लागली होती. ही बोट कराची केटी बंदरावरून निघाली होती, तिला
तेथूनच निर्देश मिळत होते, असे संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले होते. बोटीवरील
चार संशयितांनीच ती उडवली होती, असे तटरक्षक दलानेही सांगितले होते.
संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यावर संशय : संशयित पाकिस्तानी बोटीबाबत संरक्षण मंत्रालयाने
दोन जानेवारीला निवेदन जारी करण्यात आले होते. भारतीय तटरक्षक दलाने संशयित पाकिस्तानी बोटीचा
पाठलाग केला होता. घेरले गेल्यानंतर चार संशयितांनी बोट उडवून दिली, असा दावा त्यात करण्यात आला
होता. लोशाली यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने भारताच्या दाव्यावर संशय घेतला. भारताने आंतरराष्ट्रीय
नियमांचे उल्लंघन केले आणि मानवतेच्या दृष्टिकोनाला तिलांजली दिल्याचे लोशाली यांच्या दाव्यावरून
स्पष्ट होते, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
केंद्र सरकार भ्रष्टाचारविरोधी कायद्यात बदल
करण्याबाबत विचार करत आहे. शासकीय
अधिकाऱ्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या
आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआय
अथवा इतर तपास संस्थांनी लोकपालाची
संमती घेणे अनिवार्य करण्याची तरतूद
कायद्यात करण्याचा सरकारचा इरादा आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार
ही तरतूद करत असल्याचा आरोप होत आहे.
सरकारनेमात्र,कर्मचाऱ्यांचेकामपरिणामकारक
आणि पारदर्शक व्हावे यासाठी हे केले जात
असल्याचा दावा केला आहे.
खटला चालवण्याची परवानगी देणारा
अधिकार लोकपालाला असावा अशी तरतूद
लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यात करण्यात
येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी
लोकपालाची संमती अनिवार्य?
भ्रष्टाचारविरोधी कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार
प्रतिनिधी | शिऊर
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत तुकाराम
महाराज विद्यार्थी आश्रमात वारकरी
संगीताचे धडे घेत असलेला
राहुल खरे ई टीव्हीच्या ‘गौरव
महाराष्ट्राचा,शोध सुरेल नात्याचा’
या रिअॅलिटी शोचा महाविजेता
ठरला .तो कन्नड तालुक्यातील
भोकनगावचा राहिवाशी आहे. राहुलने औरंगाबादच्या
गजानन केचे व विश्वनाथ दाशरथे यांच्याकडे संगीत
विशारदचे धडे घेतले.
शिऊरचा राहुल खरे ठरला
‘गौरव महाराष्ट्राचा’

More Related Content

What's hot (16)

माढा विजय संकल्प सभा
माढा विजय संकल्प सभामाढा विजय संकल्प सभा
माढा विजय संकल्प सभा
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi		Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Akola News In Marathi
Akola News In Marathi		Akola News In Marathi
Akola News In Marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Latest Amravati News In Marathi
Latest Amravati News In Marathi		Latest Amravati News In Marathi
Latest Amravati News In Marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 

More from divyamarathibhaskarnews (10)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Amravati News In Marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र प्रतिनिधी | हिंगोली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२१- २२ मध्ये वास्तव्य केलेले लंडनस्थित घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वारस्य किंमत म्हणून एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आहे. लंडन येथील १० किंग्ज हेन्री मार्गावरील एन.डब्ल्यू. ३ या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते. १ सप्टेंबर २०१४ रोजी संबंधित घर मालकाने हे घर मे. सेडॉन्स या कंपनीमार्फत विक्रीला काढले होते. बाबासाहेबांनी वास्तव्य केलेली ही वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्या ठिकाणी स्मारक करावे, अशी राज्यभरातील आंबेडकरप्रेमींची मागणी आहे. ही इमारत खरेदी करण्याची इतर खरेदीदारांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शासनाकडून प्रक्रियेसाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनानेसायमनरॉसयांचीसॉलिसिटर (विधिज्ञ) म्हणून नियुक्ती केली आहे. घर खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वारस्य बोलीसाठी एकूण रकमेच्या १० टक्के म्हणजेच ३ कोटी १० लाख रुपये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या निधीतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे. सेडॉन्स सॉलिसिटर्सच्या लंडन येथील बरक्लीस बँकेतील खात्यावर ही रक्कम ताबडतोब जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही रक्कम महात्मा फुले महामंडळाला नंतर परत करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. राज्य सरकारचे उपसचिव दि. रा. डिंगळे यांनी बुधवारी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाला ही रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरासाठी राज्य सरकारने भरले ३.१० कोटी रुपये बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले लंडनस्थित घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू प्रतिनिधी । नागपूर मध्य भारतातील पहिले आणि महाराष्ट्रातील दुसरे ‘सायन्स इनोव्हेशन सेंटर’ नागपुरात सुरू होणार आहे. या केंद्राचे बांधकाम रामण विज्ञान केंद्रात सुरू झाले असून, जुलै-२०१५ मध्ये हे केंद्र कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. रामण विज्ञान केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र विभाग आणि इंडियन सायन्स काँग्रेसच्या नागपूर शाखेच्या संयुक्त सहकार्याने गुरुवार १९ फेब्रुवारीपासून रामण विज्ञान केंद्रात पहिल्या तीन दिवसीय ‘नागपूर सायन्स अँड इंजिनिअरिंग फेअर’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी बाेलावलेल्या पत्रकार परिषदेत रामण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक व्ही. एम. जोशी यांनी ही माहिती दिली. २०१४ मध्ये केंद्र सरकारने नागपुरात ‘सायन्स इनोव्हेशन सेंटर’ मंजूर केले. नोव्हेंबर २०१४ मध्ये उर्वरित पान. १२ मध्य भारतातील पहिले ‘सायन्स इनोव्हेशन सेंटर’ होणार नागपुरात प्रतिनिधी । नागपूर रेल्वे विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवासाची कल्याणकारी योजना राबवली जाते. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रिव्हीलेज पासेस पुरवले जातात. या योजनेपोटी रेल्वेवर पडणारा आर्थिक भार किमान दोन हजार कोटींच्या घरात असण्याचा अंदाज व्यक्त होत असला, तरी त्याचा हिशेब रेल्वेकडून ठेवला जात नाही, अशी धक्कादायक बाब माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीवरून उघड झाली आहे. रेल्वेच्या वतीने सर्वच कर्मचाऱ्यांसाठी (सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह)मोफतरेल्वेप्रवासाची योजना राबवली जाते. कर्मचाऱ्यांना कुटुंबासह मोफत रेल्वे प्रवास करता यावा, यासाठी त्यांना वर्षाकाठी विशिष्ट संख्येने प्रिव्हीलेज पासेस पुरवले जातात. अधिकाऱ्यांना वर्षाला सहा, तर कर्मचाऱ्यांना तीन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळ कुटुंबासह मोफत प्रवास करता येतो. कनिष्ठ वर्गवारीतील कर्मचारी सोडले तर बहुतेकांना एसी-२, एसी- ३ या श्रेणीतून प्रवास करता येतो. नागपुरातील आरटीआय कार्यकर्ते अविनाश प्रभुणे यांनी यासंदर्भात रेल्वेकडे माहिती मागितल्यावर या योजनेसंदर्भात स्वतंत्र हिशेब ठेवला जात नाही, अशी धक्कादायक माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. अधिकारी वा कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पासेसच्या संख्येचा हिशेब तेवढा ठेवला जात असला तरी या योजनेवरील खर्चाचे हिशेब ठेवण्याची तरतूद नाही, असे रेल्वेने स्पष्टपणे उर्वरित पान. १२ कर्मचारी मोफत प्रवास; खर्चाचा हिशेबच नाही रेल्वेकडे मागितलेल्या माहितीतून झाले उघड रेल्वेच्या सुमारे २५ लाख कर्मचाऱ्यांना मिळते पास संग्रामपूर तालुक्यातील पळशी येथे महाशिवरात्रीच्या रात्री बनविण्यात आलेला सात क्विंटल ३५ किलोचा महारोठ प्रतिनिधी । संग्रामपूर आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यातील १२३ वर्षांची परंपरा असलेल्या पळशी झाशी येथील शंकरगिरी महाराजांच्या महारोठाचा प्रसाद स्वीकारण्यासाठी परिसरातील हजारो आदिवासी बांधवांसह नजीकच्या जिल्ह्यातील नागरिकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. महारोठ आणि गूळ असा प्रसाद या वेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने स्वीकारला. या वर्षीचा महाराेठ हा सात क्विंटल ३५ किलोचा होता. मंगळवारी महाशिवरात्रीच्या रात्री ९ वाजता हा महारोठ बनवण्यास प्रारंभ झाला. ‘हर हर महादेव’, ‘शंकरगिरी महाराज की जय’ उर्वरित पान. १२ पळशी झाशीत महारोठचा प्रसाद सात क्विंटल ३५ किलोचा होता महाराेठ, आदिवासी पट्ट्यातील भाविकांची गर्दी अध्यात्म,विज्ञानाचीसांगड ^सुमारे १२५ वर्षांपूर्वी येथे शंकरगिरी महाराजांनी ही प्रथा सुरू केली. विज्ञान व अध्यात्माची सांगड घालत त्यांनी नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रयत्न केले. यामध्ये चमत्काराला स्थान नाही. गुलाबराव मारोडे, विश्वस्त, श्री शंकरगिरी महाराज संस्थान, पळशी झाशी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची अाज जयंती. विनम्रअभिवादन अमरावती गुरुवार, १९ फेब्रुवारी २०१५ एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.०० सेन्सेक्स 29230.26 मागील 29135.88 सोने 27,380.00 मागील 27,680.00 चांदी 39,000.00 मागील 39,500.00 डॉलर 62.34 मागील 62.16 यूरो 70.81 मागील 70.95 सुविचार कुठलेही काम करताना हार मानणे ही सर्वांत मोठी कमजोरी आहे. यशाचा एकच मंत्र आहे, पुन्हा एकदा प्रयत्न करा. थॉमस अल्वा एडिसन ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष २ | अंक १८७ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन न्यूजइनबॉक्स गुडन्यूज बीएमडब्ल्यूची २.२९ कोटींची आय ८ कार लाँच नवी दिल्ली | बीएमडब्ल्यूने बुधवारी हायब्रीड कार आय ८ लाँच केली. दिल्लीत तिची किंमत २.२९ कोटी रुपये आहे. बटरफ्लाय डोअर हे तिचे वैशिष्ट्य आहे. सविस्तर. पान ९ प्रख्यात चित्रपट निर्माते डी. रामा नायडूंचे निधन हैदराबाद | खासगीरीत्या सर्वाधिक चित्रपट बनवण्याचा गिनीज रेकॉर्ड करणारे चित्रपट निर्माते डी.रामानायडू (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांनी विविध भाषांत १५० चित्रपटांची निर्मिती केली होती. पीएम माेदींच्या सूटसाठी सव्वा कोटीची बोली सूरत | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधाननरेंद्रमोदीयांनीघातलेल्या सूटचा लिलाव होत आहे. बुधवारी त्याची बोली तब्बल १ कोटी २१ लाख ११ हजार १११ रुपयांवर पोहोचली. सविस्तर. पान १२ सचिनसोबत दीड लाख रुपयांत डिनरची संधी मेलबर्न | सिडनीत सचिन तेंडुलकरसोबत ७० हजार ते दीड लाख रुपयांत डिनर करता येईल. येथील एका रेस्टॉरंटने २६ फेब्रुवारीसाठी ही ऑफर दिली. एप्रिलपासून योजनांचे पैसे थेट लाभार्थीच्या खात्यात नवी दिल्ली | एप्रिलपासून सर्व योजनांचा पैसा थेट लाभार्थीच्या खात्यात पोहोचणार आहे. अर्थ मंत्रालयाने केंद्र, राज्यांच्या सर्व विभागांना तसे निर्देश दिले आहेत. विशेष प्रतिनिधी | मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे िनधन महाराष्ट्राला चटका लावून जाणारे असून त्याला तंबाखूचे अतिसेवन कारणीभूत ठरले आहे. म्हणूनच राज्य सरकारने आता तंबाखूविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. या मोहिमेत आरोग्य खाते शाळा तसेच अन्य शैक्षणिक संस्थांवर करडी नजर ठेवणार आहे. राज्यात एकही शिक्षक तंबाखूचे सेवन करणारा असू नये, शाळेच्या आवारात वा वर्गात त्याने तंबाखूचा बार भरून जाऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात असून अशा शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्रा’साठी तंबाखू, पानमसाला, गुटख्याच्या उच्चाटनासाठी उर्वरित. पान १२ ... ही धोक्याची घंटा ^‘तोंडाच्या कॅन्सरमुळे राज्याला एका ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला मुकावे लागले, ही दु:खद बाब आहे. राज्यात सध्या २ कोटी लोक तंबाखूच्या विळख्यात आहेत. त्यांच्यासाठी आबांचा मृत्यू धोक्याची घंटा मानली गेली पाहिजे. या घटनेतून धडा घेऊन 'तंबाखूमुक्त महाराष्ट्रा'चा विडा उचलला आहे. - डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री जाहिरातींवरही बंदी : तंबाखूमुक्तीसाठी राज्यात टीव्ही तसेच वर्तमानपत्रांतील पानमसाल्याच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शाळा-काॅलेजांततंबाखूमुक्तीचीघंटा,शिक्षकांवरथेटकारवाई { आबांच्या िनधनानंतर िनर्धार ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्रा’चा { राज्यात तंबाखू, गुटखा, पानमसाल्याच्या उच्चाटनासाठी १० कलमी कार्यक्रम ८ हजार डाॅक्टरांची मदत इंडियन डेंटल असोसिएशनच्या ८ हजार डॉक्टरांनी या मोहिमेत योगदान देण्याची तयारी दर्शविली आहे. तोंडाच्या आरोग्याबाबत जागृती नसल्याने तंबाखू, गुटखा खाण्याचे प्रमाण वाढलेे. ही जागृती करण्याची आमची तयारी असल्याचे असोिसएशनने म्हटले आहे. समुपदेशन केंद्र उभारणार राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केद्रात तोंडाच्या कॅन्सरचे निदान तसेच स्क्रिनिंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अनेकांना तंबाखूचे व्यसन सोडायचे असते, मात्र त्यांना योग्य ते समुपदेशन मिळत नाही. त्यासाठी विशेष समुपदेशन केंद्रे उभारण्याचीही सरकारची योजना आहे. केजरींचा खोकला, मोदींना चिंता दिव्यमराठीविशेष ‘आप’लेपणाने दिला सल्ला : बंगळुरूच्या डॉ. नागेंद्र यांना दाखवून बघा अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, किरण बेदींसह अनेक दिग्गज नेते मंगळवारी दिल्ली पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांच्या अॅट-होम' रिसेप्शनमध्ये सहभागी झाले. या वेळी त्यांच्यात अगदी घरच्यासारखी गप्पाष्टके रंगली. केजरीवाल, मनीष शिसोदिया, नायब राज्यपाल नजीब जंग, गृहमंत्री राजनाथसिंह व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बस्सींच्या घरी दाखल झाले. गप्पांदरम्यान केजरीवालांना खोकला आला. त्यावर राजनाथ म्हणाले- तुम्हाला नेहमीच खोकला असतो! केजरीवाल उत्तरले - मीही वैतागलोय, खोकला बराच होत नाही. इतक्यात मोदींनी विचारले- तुम्हाला इतका खोकला कसा येतो, हा त्रास कधीपासून आहे? मध्येच मनीष शिसोदिया म्हणाले - मी तर १२-१५ वर्षांपासून बघतोय. यावर केजरीवाल म्हणाले - कधी कधी कमी होतो. मात्र, हवामान बदलले वा धूळ वाढली की खाेकला पुन्हा वाढतो. त्यावर मोदी म्हणाले - तुम्ही बंगळुरूत डॉ. नागेंद्र यांना दाखवून पाहा. ते जुनाट खोकल्याचे तज्ज्ञ आहेत. तुमचा आजार नक्कीच बरा होईल. उत्तरात केजरीवाल यांनी होकारार्थी मान हलवली. पंतप्रधानांनी शिकवले - बघा, अशी घेतात सेल्फी कार्यक्रमात लोक फोटो घेत होते. मीही (दिव्य मराठी प्रतिनिधी) मोदींसोबत सेल्फीची फर्माईश केली. त्यांनी मान्य केली. मात्र, मला चांगला फोटो घेता येत नव्हता. मोदींनी माझा फोन घेतला व म्हणाले - ज्याच्यासोबत सेल्फी घ्यायची त्याला कॅमेऱ्याकडे पाहायला सांगायचे... अन् फोटो क्लिक केला. चाय पे चर्चा : दिल्ली निवडणुकीनंतर सत्ताधारी-विरोधक प्रथमच एकत्र अाले. वृत्तसंस्था | नवी दिल्ली ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावरील प्राणघातक हल्ला ही गंभीर घटना असल्याचे सांगत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावून अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. मानवी हक्क आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार, राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालकांना चार आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कोल्हापूरात १६ फेब्रुवारीला पानसरे दांपत्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. गंभीर जखमी पानसरेंवर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. याबाबतीच्या बातम्यांची दखल घेऊन आयोगाने ही नोटीस बजावली आहे. पानसरे हल्ला : मानवी हक्क आयोगाची राज्य सरकारला नोटीस नेटशिवाय मोबाइलवर शोधा १३०० पर्यटनस्थळे नवी दिल्ली | हॉलीडे आयक्यू ऑफ लाइन मोबाइल अॅप लाँच झाले आहे. त्याद्वारे इंटरनेट कनेक्शनशिवाय देशातील १०० पर्यटनस्थळांशी संबंधित माहिती मिळेल. ते हॉलीडे आयक्यू कंपनीने तयार केले आहे. वृत्तसंस्था | नवी दिल्ली/ बंगळुरू गुजरातच्या समुद्रात गेल्या ३१ डिसेंबरला दिसलेल्या पाकिस्तानी बोटीशी संबंधित एक व्हिडिओ उघडकीस आला आहे. सुरतमध्ये मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. आपल्याच आदेशावरून ही बोट उडवण्यात आली, असा दावा भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक बी. के. लोशाली त्या व्हिडिओत करत आहेत. लोशाली यांच्या दाव्यामुळे त्या बोटीवरील चालक दलानेच आग लावल्याचा दावा करणारे केंद्र सरकार चांगलेच अडचणीत आले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लगेचच त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘चुकीच्या वक्तव्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. आम्ही या वक्तव्याची चौकशी करू,’ असे पर्रीकर म्हणाले. लोशाली यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकतेही त्यांनी दिले आहेत. संरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर तटरक्षक दलाने लोशाली यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून सुरतमध्ये केलेल्या दाव्यावर खुलासा मागितला आहे. बंगळुरूमध्ये पर्रीकर म्हणाले की, ‘आम्ही जुन्याच दाव्यावर ठाम आहोत. बोट तटरक्षक दलाने उडवली नाही याचे पुरावेही मी देईन.’ संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर लोशाली यांनीही घूमजाव केले. ‘बोटीवरील लोकांनीच तिला आग लावली,’ असे ते म्हणाले. पाकिस्तानची बोट अाम्हीच उडवली : डीआयजींचा दावा सरकारची गोची | चुकीच्या वक्तव्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही : संरक्षणमंत्री तटरक्षक दलाने बजावली डीआयजी लोशालींना कारणे दाखवा नोटीस ^संरक्षण मंत्रीजी, पाकिस्तानी बोट उडवणे मोठा गुन्हा आहे की देशाशी खोटे बोलणे? जर ते दहशतवादी होते तर त्यांना उडवण्यात लाज कसली? - मनीष तिवारी, काँग्रेसचे नेते ^सरकार कसे काम करते हे यावरून लक्षात येते. हे म्हणजे एक हात काय काम करत आहे याचा दुसऱ्या हाताला पत्ताच नसावा तसे हे आहे. - दीपक वाजपेयी, आप प्रवक्ता बोट उडवणे मोठा गुन्हा की देशाशी खोटे बोलणे? लोशाली यांची दोन वक्तव्ये... आधी : बोट उडवून द्या, त्यांना बिर्याणी खाऊ घालण्याची आमची इच्छा नाही : ‘तुम्हाला ३१ डिसेंबरच्या रात्रीची आठवण असेल. आम्ही पाकिस्तानी बोट उडवून दिली होती. मी त्या रात्री गांधीनगरमध्ये होतो. मी म्हणालो - बोट उडवून द्या. त्यांना बिर्याणी खाऊ घालण्याची आमची इच्छा नाही.’ नंतर म्हणाले : जे छापून आले त्यात तथ्य नाही : ‘हे प्रकरण माझ्याकडे नाही. जे छापून आले त्यात तथ्य नाही. मी असे वक्तव्य केले नाही. फक्त राष्ट्रविरोधी तत्त्वांना बिर्याणी खाऊ घालण्याची गरज नाही एवढेच म्हणालो होतो.’ हीच ती संशयित पाकिस्तानी बाेट डिसेंबरमध्ये उडवून देण्यात अाली हाेती. कराचीहून निघाली होती संशयित बोट पाकिस्तानी बोटीला ३१ डिसेंबरच्या रात्री पोरबंदर समुद्र किनाऱ्यापासून ३६५ किमी अंतरावर आग लागली होती. ही बोट कराची केटी बंदरावरून निघाली होती, तिला तेथूनच निर्देश मिळत होते, असे संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले होते. बोटीवरील चार संशयितांनीच ती उडवली होती, असे तटरक्षक दलानेही सांगितले होते. संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यावर संशय : संशयित पाकिस्तानी बोटीबाबत संरक्षण मंत्रालयाने दोन जानेवारीला निवेदन जारी करण्यात आले होते. भारतीय तटरक्षक दलाने संशयित पाकिस्तानी बोटीचा पाठलाग केला होता. घेरले गेल्यानंतर चार संशयितांनी बोट उडवून दिली, असा दावा त्यात करण्यात आला होता. लोशाली यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने भारताच्या दाव्यावर संशय घेतला. भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आणि मानवतेच्या दृष्टिकोनाला तिलांजली दिल्याचे लोशाली यांच्या दाव्यावरून स्पष्ट होते, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी म्हटले आहे. वृत्तसंस्था | नवी दिल्ली केंद्र सरकार भ्रष्टाचारविरोधी कायद्यात बदल करण्याबाबत विचार करत आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआय अथवा इतर तपास संस्थांनी लोकपालाची संमती घेणे अनिवार्य करण्याची तरतूद कायद्यात करण्याचा सरकारचा इरादा आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार ही तरतूद करत असल्याचा आरोप होत आहे. सरकारनेमात्र,कर्मचाऱ्यांचेकामपरिणामकारक आणि पारदर्शक व्हावे यासाठी हे केले जात असल्याचा दावा केला आहे. खटला चालवण्याची परवानगी देणारा अधिकार लोकपालाला असावा अशी तरतूद लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यात करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी लोकपालाची संमती अनिवार्य? भ्रष्टाचारविरोधी कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार प्रतिनिधी | शिऊर वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रमात वारकरी संगीताचे धडे घेत असलेला राहुल खरे ई टीव्हीच्या ‘गौरव महाराष्ट्राचा,शोध सुरेल नात्याचा’ या रिअॅलिटी शोचा महाविजेता ठरला .तो कन्नड तालुक्यातील भोकनगावचा राहिवाशी आहे. राहुलने औरंगाबादच्या गजानन केचे व विश्वनाथ दाशरथे यांच्याकडे संगीत विशारदचे धडे घेतले. शिऊरचा राहुल खरे ठरला ‘गौरव महाराष्ट्राचा’