SlideShare a Scribd company logo
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १४६ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
अहमदनगर गुरुवार, १२ मार्च, २०१५
एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.००
सेन्सेक्स	 28659.17
मागील	 28709.87
सोने	 26,55०.00
मागील	 26,750.00
चांदी	 ३7,55०.00
मागील	 38,000.00
डॉलर	 62.78
मागील	 62.76
यूरो	 66.37
मागील	 67.48
सुविचार
आयुष्यात कधी पडलो नाही
असे म्हणण्यात मोठेपणा नाही
तर पडल्यानंतर प्रत्येक वेळी
उभे राहणे हाच मोठेपणा आहे.
कन्फ्युशिअस
एलआयसी योजना चालवणार. खासगी विमा
कंपन्यांही भाग घेऊ शकतात.
कोण घेऊ
शकतो
पॉलिसी
स्कीमशी कसे
जोडणार
रिस्क
कव्हरेज
हप्ता कसा
देणार
कोणती कंपनी
चालवणार
स्वस्त विम्यासाठी खाते, आधार हवेच
दिव्यमराठीविशेष १२रुपयांतअपघातविमा,तर३३०रुपयांतजीवनविम्याचेनियमनिश्चित
दिव्य मराठी नेटवर्क । नवी दिल्ली
अर्थ मंत्रालयाने १२ रुपयांत अपघात विमा
आणि ३३० रुपयांत जीवन विमा संरक्षण
देण्यासाठी नियम निश्चित केले आहेत.
पॉलिसी घेण्यासाठी बँक खाते आणि
त्याच्याशी जोडलेला आधार क्रमांक
आवश्यक आहे. दोन्हींतही २ लाखांचे
विमा संरक्षण मिळेल.
अर्थमंत्री अरुण जेटली
यांनी अर्थसंकल्पात अपघात
विम्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा
आणि जीवन विम्यासाठी प्रधानमंत्री
जीवन ज्योती विमा योजनेची घोषणा
केली होती.
प्रधानमंत्री जीवन विमा योजना : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा
१८ ते ७० वर्षांची कुठलीही व्यक्ती. आधार
कार्ड आणि त्याच्याशी जोडलेले बँक खाते
आवश्यक.
१ जूनपर्यंत अर्ज भरून बँकेत जमा करावा.
दरवर्षी पॉलिसी नूतनीकरण आवश्यक.
अपघातात मृत्यू/विकलांग झाल्यास २ लाख,
अंशत: विकलांगतेसाठी १ लाखाचे कव्हर.
विमाधारकाच्या खात्यातून कपात. अनेक
वर्षांची पॉलिसी एकाच वेळीही देता येईल.
ओरिएंटल, नॅशनल, युनायटेड इंडिया, न्यू
इंडिया इन्शुरन्स, खासगी कंपन्याही.
१८ ते ५० वर्षांची व्यक्ती. एखाद्याने ५०
वर्षाआधी पॉलिसी घेतल्यास ५५ वर्षांपर्यंत
सुरू राहील.
कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यू
झाल्यास वारसांना २ लाखांचे कव्हर मिळेल.
बँक खात्यातून दरवर्षी कपात. १ वर्षापेक्षा
जास्तचा हप्ता एकत्रित कापता येईल.
दरवर्षी पॉलिसी घ्यावी लागेल. त्यासाठी
कुठलीही तारीख निश्चित केली नाही.
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
वाराणसीत एटीएमद्वारे १
रुपयात मिळणार पाणी
लखनऊ|वाराणसीतील गंगा घाट,
संकटमोचन, विश्वनाथ मंदिर
या प्रमुख स्थळांवर लवकरच
२५ वॉटर एटीएम लावले
जातील. त्याद्वारे एक रुपयात
एक लिटर शुद्ध पाणी मिळेल.
वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी
ही माहिती दिली.
चिनी महिला वैमानिक
जेटवर करणार कसरती
बीजिंग | चिनी महिला वैमानिक
पहिल्यांदाच चिनी जेट जे-१० वर
कसरतीकरणारआहेत.त्याचिनी
वायुदलाच्या अॅक्रोबिक संघाच्या
सदस्य आहेत. हा एअर शो पुढील
आठवड्यात मलेशियात होईल.
टॅटू, लांब केसांची मुले
असतात गुंड : पोलिस
बंगळुरू|लांब केस, टॅटू ठेवणारी
मुले गुंड असतात, असे वक्तव्य
बंगळुरूचे पोलिस उपायुक्त
आलोककुमार यांनी केले आहे.
शहरात अशा मुलांवर पोलिस
नजर ठेवून आहेत.
मंजुनाथ हत्याकांडात ६
दोषींना जन्मठेपेची शिक्षा
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने
मंजुनाथ हत्याकांडातील ६ दोषींना
जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आयओसीचे विक्री व्यवस्थापक
मंजुनाथ यांनी तेल माफियांचे
कारनामे उघड केले होते. त्यांची
२००५ मध्ये हत्या झाली होती.
निर्भया डॉक्युमेंट्रीवर आज
हायकोर्टात सुनावणी
नवी दिल्ली | निर्भया अत्याचार
प्रकरणावरील डॉक्युमेंट्रीवरील
बंदी हटवावी, अशी मागणी
करणाऱ्या लॉच्या दोन
विद्यार्थ्यांच्या याचिकेवर दिल्ली
हायकाेर्टात गुरुवारी सुनावणी
होईल.  सविस्तर. पान १०
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
स्मार्टर ३ डी स्टडी अॅप लाँच
हैदराबाद | इयता दहावीच्या
विद्यार्थ्यांसाठी स्मार्टर ३ डी
स्टडी अॅप लाँच करण्यात आले
आहे. या अॅप द्वारे आई-वडील
आपल्या मुलांच्या प्रगतीची
माहिती मिळवू शकतील. हे
अॅप प्ले स्टोअरवरून मोफत
डाउनलोड करता येईल.
कुमार संगकाराचे सलग
चाैथे शतक
आजचा सामना :
दक्षिण आफ्रिका यूएई
सकाळी ६.३० पासून
९५ चेंडूंत
१२४ धावा
13 चौकार
4षटकार
संगकारा
वर्ल्ड कपमध्ये ४ शतके करणारा
कुमार संगकारा ठरला पहिला
खेळाडू. मार्क वॉ (१९९६) आणि
सौरव गांगुली (२००३), मॅथ्यू
हेडन (२००७) यांनी ३-३ शतके
केली होती. सविस्तर. पान ८
वृत्तसंस्था । मुंबई
गोवंशहत्या बंदी कायदा नेमका
केव्हापासून लागू झाला, ती निश्चित
तारीख सांगा अशी विचारणा
करत मुंबई उच्च न्यायालयाने
राज्य सरकारला गुरुवारीच उत्तर
देण्यास बजावले आहे. सरकारने या
कायद्याची अधिसूचना ९ मार्चला
जारी केली होती.
मुंबई उपनगर गोमांस व्यापारी
संघटेनेच्या याचिकेवर न्यायमूर्ती
व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती ए.
आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर
सुनावणी सुरू आहे. संघटनेचे वकील
युसूफ मुचला यांनी सांगितले की,
अधिसूचना जारी करण्याआधीच
पोलिसांनी कत्तलखान्यातून गुरे जप्त
केली. गोमांस जप्त करण्यात आले.
अधिसूचना जारी झालेली नसताना
पोलिस कारवाई करू शकत नाहीत,
असा युक्तिवाद मुचला यांनी केला.
त्यानंतर खंडपीठाने सरकारकडून
उत्तर मागवले आहे.
गोवंश हत्याबंदी कधीपासून?
{उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा {आजच द्यावे लागणार उत्तर
कडक शिक्षा
गोमांस विक्री अथवा ते जवळ
बाळगणाऱ्यास प्रतिबंध घालणाऱ्या
महाराष्ट्र सरकारच्या कायद्यावर
राष्ट्रपतींनी अलीकडेच स्वाक्षरी
केली आहे. गोमांसाची खरेदी-
विक्री करताना अथवा ते जवळ
बाळगताना पकडल्यास ५ वर्षे
कैदेच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात
आहे तसेच १० हजार रुपये दंडाची
शिक्षाही केली जाऊ शकते.
वृत्तसंस्था । नवी दिल्ली
आम आदमी पक्षातील (आप)
अंतर्गत कलह सुरूच आहे. बुधवारी
आणखी एक प्रकरण समोर आले.
सर्वांना स्टिंग करा असे सांगणाऱ्या
अरविंद केजरीवाल यांचेच स्टिंग
कोणीतरी जारी केले. दिल्लीत
सरकार स्थापनेसाठी काँग्रेसच्या सहा
आमदारांना फोडून त्यांचा पाठिंबा
मिळवावा, असे केजरीवाल हे आपचे
माजी आमदार राजेश गर्ग यांना सांगत
असल्याचे ऑडिओ टेपमध्ये दिसते.
राजेश गर्ग म्हणाले, ‘काँग्रेस
आमदार फोडा असे केजरीवालांनी
मला सांगितले होते. पण मला ते योग्य
वाटले नाही. त्यामुळे त्यानंतर मी
त्यांना कधीही भेटलो नाही. टेपमधील
चर्चा गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील
आहे. तेव्हा दिल्लीत राष्ट्रपती राजवट
होती. कुठल्याही पद्धतीने सरकार
स्थापन करण्याचा केजरीवाल यांचा
प्रयत्न सुरू होता. मनीष शिसोदिया
आणि संजय सिंह यांनीही याबाबत
चर्चा केली होती.’
केजरीवालांकडूनच
सत्तेसाठी घोडेबाजारस्टिंगमध्ये काँग्रेस आमदारांशी सौदेबाजी उघडकीस
दमानियांचा राजीनामा
ही टेप जारी झाल्यानंतर आपच्या
नेत्या अंजली दमानिया यांनी
राजीनामा दिला. ‘मी तत्त्वांसाठी
केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता.
अशा घोडेबाजारासाठी नाही. अशा
मूर्खपणासाठी मी आपमध्ये आले
नव्हते. मी राजीनामा देत आहे.
केजरीवाल यांनी ४८ तासांत त्याचे
उत्तर द्यावे,’ असे ट्विट त्यांनी केले.
दरम्यान, आम आदमी पक्षाने या
प्रकाराचा इन्कार केलेला नाही.
भूषण, यादवांची टीका
आपच्या बड्या नेत्यांनी जारी केलेल्या
वक्तव्यावर योगेंद्र यादव आणि प्रशांत
भूषण यांनी पलटवार केला आहे.
त्यांनी कार्यकर्त्यांच्या नावे १० पानी
पत्र लिहिले आहे. भांडण संयोजक पद
मिळवण्यासाठी नाही, तर तत्त्वांसाठी
आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आता
आपण बोलू इच्छित नाही, असे यादव
यांनी स्पष्ट केले.
कोलगेट|सहाजणांनाआरोपीम्हणूनन्यायालयाचेसमन्सजारी
मनमोहनसिंग हाजिर हो...{उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला,
पी. सी. पारेखांनाही बोलावणे
{सीबीआय न्यायालयात ८ एप्रिल
रोजी हजर राहण्याचे निर्देश
वृत्तसंस्था। नवी दिल्ली
कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ.
मनमोहनसिंग यांच्या अडचणी वाढताना दिसत
आहेत. सीबीआय न्यायालयाने बुधवारी त्यांना
आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहण्यासाठी
समन्स बजावले. काँग्रेसने डॉ. सिंग यांच्या पाठीशी
उभे राहणार असल्याचे सांगत भूसंपादनाच्या
‘काळ्या कायद्या’वरून लोकांचे लक्ष विचलित
करण्यासाठी भाजप गलिच्छ राजकारण करत
असल्याचा आरोप केला आहे.
सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती भरत पराशर
यांनी भादंविच्या कलम १२० ब (गुन्हेगारी कट),
४०९ (गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) आणि
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार
हे समन्स बजावले. डॉ. सिंग यांच्याबरोबरच
उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा
सचिव पी. सी. पारेख, हिंदाल्कोचे अधिकारी
शुभेंदूअमिताभआणिडी.भट्टाचार्ययांनाहीसमन्स
बजावले. या सर्वांना ८ एप्रिल रोजी न्यायालयात
हजर रहायचे आहे. यापूर्वी सीबीआयने डॉ.
मनमोहनसिंग यांची दोन वेळा चौकशी केली आहे.
घोटाळ्याच्या वेळी मनमोहनसिंग यांच्याकडेच
कोळसा मंत्रालयाचा प्रभार होता.
मनमोहनसिंग यांनी हिंदाल्कोला प्रत्यक्षपणे मदत
केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे नेव्हेली
लिग्नाइट या सरकारी कंपनीचे नुकसान झाले.
ओडिशामध्ये २००० मेगावॉटचा प्रकल्प सुरु
करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला. मनमोहनसिंग
यांनी मंजुरी देऊन प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे.
सिंग यांनी कोळसा मंत्रालय स्वत:कडेच ठेवले होते.
पंतप्रधान असल्यामुळे प्रत्येक प्रकरणात व्यक्तिश: लक्ष
घालण्याची आपल्याकडून अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही,
असा दावा ते करू शकत नाहीत.
माजी पंतप्रधानांना आरोपी म्हणून न्यायालयाने समन्स पाठवण्याची देशातील ही
दुसरीच वेळ आहे. विशेष म्हणजे दोन्ही माजी पंतप्रधान काँग्रेसचेच आहेत. यापूर्वी
२००० मध्ये न्यायालयाने खासदार खेरदी प्रकरणात पी. व्ही. नरसिंह राव यांना
दोषी ठरवले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने नंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली.
नरसिंहराव सरकारमध्ये मनमोहनसिंग अर्थमंत्री होते.
हा जीवनाचा भागच
माजी पंतप्रधान
आरोपी होण्याची
दुसरीच वेळ
समन्स जारी केल्यामुळे डॉ.
मनमोहनसिंग यांनी नाराजी व्यक्त
केली आहे. मी निराश आहे पण हाही
जीवनाचा एक भागच आहे. सत्य
समोर येईल असा माझा विश्वास
आहे. तथ्य सादर करताना मला
माझी बाजू मांडण्याची संधी मिळेल,
असे त्यांनी म्हटले आहे.
समन्समध्ये कोर्टाने म्हटले...
बिर्लांच्या हिंदाल्को कंपनीला
२००५ मध्ये ओडिशातील
तालाबीरा-२ व तालाबीरा
-३ मध्ये कोळसा खाणी
देण्यात गैरव्यवहार झाला
होता. तेव्हा कोळसा मंत्रालय
मनमोहनसिंगांकडेच होते.
या प्रकरणी सीबीआयने
क्लोजर रिपोर्ट दाखल केला
होता. परंतु न्यायालयाने
तो फेटाळला आणि
मनमोहनसिंग यांच्या
चौकशीचे आदेश दिले
होते. तत्कालीन कोळसा
मंत्रालयाचा जवाब गरजेचा
नाही काय? असे न्यायालयाने
तेव्हा विचारले होते.
पंतप्रधानांच्या चौकशीची
परवानगी मिळाली नव्हती,
असे सीबीआयने न्यायालयास
सांगितले होते.
काय आहे प्रकरण?
काँग्रेस पाठीशी
^सिंग यांच्या प्रामाणिकपणाबद्दल
कोणालाच शंका नाही. अख्ख्या
देशाला त्यांचा पारदर्शकपणा
माहीत आहे. भाजप या प्रकरणाचे
राजकारण करत आहे. खाण
लिलाव थांबण्यासाठी भाजपच्याच
मुख्यमंत्र्यांनी पत्रे दिली होती.
रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते
नवी दिल्ली | केंद्र सरकारी
कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची मर्यादा
६० वर्षेच आहे. त्यात घट अथवा वाढ
करण्याचा विचार नाही, अशी माहिती
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री
जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत
दिली. दरम्यान, केंद्र सरकारने नव्या
नोकऱ्यांवर बंदी घातलेली नाही, असे
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत
स्पष्ट केले. कुठलेही संवेदनशील
सरकार नोकऱ्यांवर बंदी घालण्याचा
आदेश देऊ शकत नाही, असे त्यांनी
सांगितले. दिल्लीतील निवडणूक
प्रचारादरम्यान या दोन्ही मुद्द्यांची
चर्चा झाली होती. त्यामुळे सरकारला
त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या
वयात घट करण्याचा विचार करत
असल्याचे वृत्त हास्यास्पद असल्याचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले
होते. निवडणुकीपूर्वी सेवानिवृत्तीच्या
वयात वाढ होईल, अशी चर्चा होती.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची
निवृत्ती ६० व्या वर्षीच
भाकपचे ज्येष्ठ नेते काॅ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईत डाव्या, पुरोगामी अाणि आंबेडकरवादी पक्ष व संघटनांनी राज्य
सरकार व हिंदुत्ववादी संघटनांच्या िवरोधात िवशाल मोर्चा काढला होता. भायखळ्यातून निघालेल्या माेर्चाचे आझाद मैदानावर सभेत रुपांतर झाले.आम्ही सारे पानसरे...
प्रतिनिधी | संगमनेर
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरनजीक कऱ्हे घाटाच्या
पायथ्याशी दोन मालट्रकच्या धडकेत गुजरातमधील तिघांचा
मृत्यू झाला. सहाजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती
अत्यवस्थ अाहे. बुधवारी सकाळी हा अपघात झाला.
रणजितकुमार नवलाभाई दोडी (वापी, गुजरात) असे
एका मृताचे नाव अाहे. दोन मृतांची ओळख पटली नाही.
राजहंस दूध संघाच्या एक टँकरचालकाने व परिसरातील
लोकांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.
अपघाताची तीव्रता एवढी होती की, जखमी व मृतांना बाहेर
काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली.
संगमनेरजवळ अपघातात तीन ठार
अपघातग्रस्त मालट्रकची अवस्था.  छाया : विवेक भिडे.

More Related Content

What's hot

Jalgaon news marathi
Jalgaon news marathi		Jalgaon news marathi
Jalgaon news marathi
divyamarathibhaskarnews
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi		Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Akola News In Marathi
Akola News In Marathi		Akola News In Marathi
Akola News In Marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
divyamarathibhaskarnews
 

What's hot (7)

Jalgaon news marathi
Jalgaon news marathi		Jalgaon news marathi
Jalgaon news marathi
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
 
Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi		Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Akola News In Marathi
Akola News In Marathi		Akola News In Marathi
Akola News In Marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 

Viewers also liked

Simplify Your Print Production
Simplify Your Print ProductionSimplify Your Print Production
Simplify Your Print Production
jeffwrussell
 
Migrasi
MigrasiMigrasi
Migrasi
nida30
 
Shelter Magazine
Shelter MagazineShelter Magazine
Shelter Magazine
Francisca Maria
 
Pasadenia Residence Pulomas By Evita Maharani
Pasadenia Residence Pulomas By Evita MaharaniPasadenia Residence Pulomas By Evita Maharani
Pasadenia Residence Pulomas By Evita Maharani
evitamaharani
 
Museo de arte Contemporáneo de Burdeos
Museo de arte Contemporáneo de BurdeosMuseo de arte Contemporáneo de Burdeos
Museo de arte Contemporáneo de Burdeos
proyecto_comenius
 
Kompozitoret me te rendesishem te renesansës
Kompozitoret me te rendesishem te renesansësKompozitoret me te rendesishem te renesansës
Kompozitoret me te rendesishem te renesansës
Ismer Zanzibar
 
Trout fly fishing vacation in british columbia
Trout fly fishing vacation in  british columbiaTrout fly fishing vacation in  british columbia
Trout fly fishing vacation in british columbia
samsancrow
 
ad:Tech New York
ad:Tech New Yorkad:Tech New York
ad:Tech New York
Chris Chambers
 
Vivi novitasari tugas pti 2
Vivi novitasari tugas pti 2Vivi novitasari tugas pti 2
Vivi novitasari tugas pti 2
vivinov
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Presentazione concorso sport
Presentazione concorso sportPresentazione concorso sport
Presentazione concorso sportMedieZanella
 

Viewers also liked (13)

Simplify Your Print Production
Simplify Your Print ProductionSimplify Your Print Production
Simplify Your Print Production
 
Migrasi
MigrasiMigrasi
Migrasi
 
Shelter Magazine
Shelter MagazineShelter Magazine
Shelter Magazine
 
Pasadenia Residence Pulomas By Evita Maharani
Pasadenia Residence Pulomas By Evita MaharaniPasadenia Residence Pulomas By Evita Maharani
Pasadenia Residence Pulomas By Evita Maharani
 
Museo de arte Contemporáneo de Burdeos
Museo de arte Contemporáneo de BurdeosMuseo de arte Contemporáneo de Burdeos
Museo de arte Contemporáneo de Burdeos
 
Kompozitoret me te rendesishem te renesansës
Kompozitoret me te rendesishem te renesansësKompozitoret me te rendesishem te renesansës
Kompozitoret me te rendesishem te renesansës
 
Q6 evaluation
Q6 evaluationQ6 evaluation
Q6 evaluation
 
Trout fly fishing vacation in british columbia
Trout fly fishing vacation in  british columbiaTrout fly fishing vacation in  british columbia
Trout fly fishing vacation in british columbia
 
ad:Tech New York
ad:Tech New Yorkad:Tech New York
ad:Tech New York
 
Vivi novitasari tugas pti 2
Vivi novitasari tugas pti 2Vivi novitasari tugas pti 2
Vivi novitasari tugas pti 2
 
Mapa conceptual tema 2
Mapa conceptual tema 2Mapa conceptual tema 2
Mapa conceptual tema 2
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
Presentazione concorso sport
Presentazione concorso sportPresentazione concorso sport
Presentazione concorso sport
 

More from divyamarathibhaskarnews

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
divyamarathibhaskarnews
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
divyamarathibhaskarnews
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
divyamarathibhaskarnews
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
divyamarathibhaskarnews
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
divyamarathibhaskarnews
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
divyamarathibhaskarnews
 

More from divyamarathibhaskarnews (14)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Ahmednagar news in marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १४६ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन अहमदनगर गुरुवार, १२ मार्च, २०१५ एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.०० सेन्सेक्स 28659.17 मागील 28709.87 सोने 26,55०.00 मागील 26,750.00 चांदी ३7,55०.00 मागील 38,000.00 डॉलर 62.78 मागील 62.76 यूरो 66.37 मागील 67.48 सुविचार आयुष्यात कधी पडलो नाही असे म्हणण्यात मोठेपणा नाही तर पडल्यानंतर प्रत्येक वेळी उभे राहणे हाच मोठेपणा आहे. कन्फ्युशिअस एलआयसी योजना चालवणार. खासगी विमा कंपन्यांही भाग घेऊ शकतात. कोण घेऊ शकतो पॉलिसी स्कीमशी कसे जोडणार रिस्क कव्हरेज हप्ता कसा देणार कोणती कंपनी चालवणार स्वस्त विम्यासाठी खाते, आधार हवेच दिव्यमराठीविशेष १२रुपयांतअपघातविमा,तर३३०रुपयांतजीवनविम्याचेनियमनिश्चित दिव्य मराठी नेटवर्क । नवी दिल्ली अर्थ मंत्रालयाने १२ रुपयांत अपघात विमा आणि ३३० रुपयांत जीवन विमा संरक्षण देण्यासाठी नियम निश्चित केले आहेत. पॉलिसी घेण्यासाठी बँक खाते आणि त्याच्याशी जोडलेला आधार क्रमांक आवश्यक आहे. दोन्हींतही २ लाखांचे विमा संरक्षण मिळेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात अपघात विम्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा आणि जीवन विम्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची घोषणा केली होती. प्रधानमंत्री जीवन विमा योजना : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा १८ ते ७० वर्षांची कुठलीही व्यक्ती. आधार कार्ड आणि त्याच्याशी जोडलेले बँक खाते आवश्यक. १ जूनपर्यंत अर्ज भरून बँकेत जमा करावा. दरवर्षी पॉलिसी नूतनीकरण आवश्यक. अपघातात मृत्यू/विकलांग झाल्यास २ लाख, अंशत: विकलांगतेसाठी १ लाखाचे कव्हर. विमाधारकाच्या खात्यातून कपात. अनेक वर्षांची पॉलिसी एकाच वेळीही देता येईल. ओरिएंटल, नॅशनल, युनायटेड इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स, खासगी कंपन्याही. १८ ते ५० वर्षांची व्यक्ती. एखाद्याने ५० वर्षाआधी पॉलिसी घेतल्यास ५५ वर्षांपर्यंत सुरू राहील. कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास वारसांना २ लाखांचे कव्हर मिळेल. बँक खात्यातून दरवर्षी कपात. १ वर्षापेक्षा जास्तचा हप्ता एकत्रित कापता येईल. दरवर्षी पॉलिसी घ्यावी लागेल. त्यासाठी कुठलीही तारीख निश्चित केली नाही. न्यूजइनबॉक्स गुडन्यूज वाराणसीत एटीएमद्वारे १ रुपयात मिळणार पाणी लखनऊ|वाराणसीतील गंगा घाट, संकटमोचन, विश्वनाथ मंदिर या प्रमुख स्थळांवर लवकरच २५ वॉटर एटीएम लावले जातील. त्याद्वारे एक रुपयात एक लिटर शुद्ध पाणी मिळेल. वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. चिनी महिला वैमानिक जेटवर करणार कसरती बीजिंग | चिनी महिला वैमानिक पहिल्यांदाच चिनी जेट जे-१० वर कसरतीकरणारआहेत.त्याचिनी वायुदलाच्या अॅक्रोबिक संघाच्या सदस्य आहेत. हा एअर शो पुढील आठवड्यात मलेशियात होईल. टॅटू, लांब केसांची मुले असतात गुंड : पोलिस बंगळुरू|लांब केस, टॅटू ठेवणारी मुले गुंड असतात, असे वक्तव्य बंगळुरूचे पोलिस उपायुक्त आलोककुमार यांनी केले आहे. शहरात अशा मुलांवर पोलिस नजर ठेवून आहेत. मंजुनाथ हत्याकांडात ६ दोषींना जन्मठेपेची शिक्षा नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने मंजुनाथ हत्याकांडातील ६ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आयओसीचे विक्री व्यवस्थापक मंजुनाथ यांनी तेल माफियांचे कारनामे उघड केले होते. त्यांची २००५ मध्ये हत्या झाली होती. निर्भया डॉक्युमेंट्रीवर आज हायकोर्टात सुनावणी नवी दिल्ली | निर्भया अत्याचार प्रकरणावरील डॉक्युमेंट्रीवरील बंदी हटवावी, अशी मागणी करणाऱ्या लॉच्या दोन विद्यार्थ्यांच्या याचिकेवर दिल्ली हायकाेर्टात गुरुवारी सुनावणी होईल. सविस्तर. पान १० दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्टर ३ डी स्टडी अॅप लाँच हैदराबाद | इयता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्टर ३ डी स्टडी अॅप लाँच करण्यात आले आहे. या अॅप द्वारे आई-वडील आपल्या मुलांच्या प्रगतीची माहिती मिळवू शकतील. हे अॅप प्ले स्टोअरवरून मोफत डाउनलोड करता येईल. कुमार संगकाराचे सलग चाैथे शतक आजचा सामना : दक्षिण आफ्रिका यूएई सकाळी ६.३० पासून ९५ चेंडूंत १२४ धावा 13 चौकार 4षटकार संगकारा वर्ल्ड कपमध्ये ४ शतके करणारा कुमार संगकारा ठरला पहिला खेळाडू. मार्क वॉ (१९९६) आणि सौरव गांगुली (२००३), मॅथ्यू हेडन (२००७) यांनी ३-३ शतके केली होती. सविस्तर. पान ८ वृत्तसंस्था । मुंबई गोवंशहत्या बंदी कायदा नेमका केव्हापासून लागू झाला, ती निश्चित तारीख सांगा अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारीच उत्तर देण्यास बजावले आहे. सरकारने या कायद्याची अधिसूचना ९ मार्चला जारी केली होती. मुंबई उपनगर गोमांस व्यापारी संघटेनेच्या याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. संघटनेचे वकील युसूफ मुचला यांनी सांगितले की, अधिसूचना जारी करण्याआधीच पोलिसांनी कत्तलखान्यातून गुरे जप्त केली. गोमांस जप्त करण्यात आले. अधिसूचना जारी झालेली नसताना पोलिस कारवाई करू शकत नाहीत, असा युक्तिवाद मुचला यांनी केला. त्यानंतर खंडपीठाने सरकारकडून उत्तर मागवले आहे. गोवंश हत्याबंदी कधीपासून? {उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा {आजच द्यावे लागणार उत्तर कडक शिक्षा गोमांस विक्री अथवा ते जवळ बाळगणाऱ्यास प्रतिबंध घालणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या कायद्यावर राष्ट्रपतींनी अलीकडेच स्वाक्षरी केली आहे. गोमांसाची खरेदी- विक्री करताना अथवा ते जवळ बाळगताना पकडल्यास ५ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षाही केली जाऊ शकते. वृत्तसंस्था । नवी दिल्ली आम आदमी पक्षातील (आप) अंतर्गत कलह सुरूच आहे. बुधवारी आणखी एक प्रकरण समोर आले. सर्वांना स्टिंग करा असे सांगणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचेच स्टिंग कोणीतरी जारी केले. दिल्लीत सरकार स्थापनेसाठी काँग्रेसच्या सहा आमदारांना फोडून त्यांचा पाठिंबा मिळवावा, असे केजरीवाल हे आपचे माजी आमदार राजेश गर्ग यांना सांगत असल्याचे ऑडिओ टेपमध्ये दिसते. राजेश गर्ग म्हणाले, ‘काँग्रेस आमदार फोडा असे केजरीवालांनी मला सांगितले होते. पण मला ते योग्य वाटले नाही. त्यामुळे त्यानंतर मी त्यांना कधीही भेटलो नाही. टेपमधील चर्चा गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील आहे. तेव्हा दिल्लीत राष्ट्रपती राजवट होती. कुठल्याही पद्धतीने सरकार स्थापन करण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न सुरू होता. मनीष शिसोदिया आणि संजय सिंह यांनीही याबाबत चर्चा केली होती.’ केजरीवालांकडूनच सत्तेसाठी घोडेबाजारस्टिंगमध्ये काँग्रेस आमदारांशी सौदेबाजी उघडकीस दमानियांचा राजीनामा ही टेप जारी झाल्यानंतर आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी राजीनामा दिला. ‘मी तत्त्वांसाठी केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. अशा घोडेबाजारासाठी नाही. अशा मूर्खपणासाठी मी आपमध्ये आले नव्हते. मी राजीनामा देत आहे. केजरीवाल यांनी ४८ तासांत त्याचे उत्तर द्यावे,’ असे ट्विट त्यांनी केले. दरम्यान, आम आदमी पक्षाने या प्रकाराचा इन्कार केलेला नाही. भूषण, यादवांची टीका आपच्या बड्या नेत्यांनी जारी केलेल्या वक्तव्यावर योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पलटवार केला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या नावे १० पानी पत्र लिहिले आहे. भांडण संयोजक पद मिळवण्यासाठी नाही, तर तत्त्वांसाठी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आता आपण बोलू इच्छित नाही, असे यादव यांनी स्पष्ट केले. कोलगेट|सहाजणांनाआरोपीम्हणूनन्यायालयाचेसमन्सजारी मनमोहनसिंग हाजिर हो...{उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, पी. सी. पारेखांनाही बोलावणे {सीबीआय न्यायालयात ८ एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देश वृत्तसंस्था। नवी दिल्ली कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआय न्यायालयाने बुधवारी त्यांना आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले. काँग्रेसने डॉ. सिंग यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगत भूसंपादनाच्या ‘काळ्या कायद्या’वरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती भरत पराशर यांनी भादंविच्या कलम १२० ब (गुन्हेगारी कट), ४०९ (गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार हे समन्स बजावले. डॉ. सिंग यांच्याबरोबरच उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख, हिंदाल्कोचे अधिकारी शुभेंदूअमिताभआणिडी.भट्टाचार्ययांनाहीसमन्स बजावले. या सर्वांना ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर रहायचे आहे. यापूर्वी सीबीआयने डॉ. मनमोहनसिंग यांची दोन वेळा चौकशी केली आहे. घोटाळ्याच्या वेळी मनमोहनसिंग यांच्याकडेच कोळसा मंत्रालयाचा प्रभार होता. मनमोहनसिंग यांनी हिंदाल्कोला प्रत्यक्षपणे मदत केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे नेव्हेली लिग्नाइट या सरकारी कंपनीचे नुकसान झाले. ओडिशामध्ये २००० मेगावॉटचा प्रकल्प सुरु करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला. मनमोहनसिंग यांनी मंजुरी देऊन प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे. सिंग यांनी कोळसा मंत्रालय स्वत:कडेच ठेवले होते. पंतप्रधान असल्यामुळे प्रत्येक प्रकरणात व्यक्तिश: लक्ष घालण्याची आपल्याकडून अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही, असा दावा ते करू शकत नाहीत. माजी पंतप्रधानांना आरोपी म्हणून न्यायालयाने समन्स पाठवण्याची देशातील ही दुसरीच वेळ आहे. विशेष म्हणजे दोन्ही माजी पंतप्रधान काँग्रेसचेच आहेत. यापूर्वी २००० मध्ये न्यायालयाने खासदार खेरदी प्रकरणात पी. व्ही. नरसिंह राव यांना दोषी ठरवले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने नंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली. नरसिंहराव सरकारमध्ये मनमोहनसिंग अर्थमंत्री होते. हा जीवनाचा भागच माजी पंतप्रधान आरोपी होण्याची दुसरीच वेळ समन्स जारी केल्यामुळे डॉ. मनमोहनसिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी निराश आहे पण हाही जीवनाचा एक भागच आहे. सत्य समोर येईल असा माझा विश्वास आहे. तथ्य सादर करताना मला माझी बाजू मांडण्याची संधी मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. समन्समध्ये कोर्टाने म्हटले... बिर्लांच्या हिंदाल्को कंपनीला २००५ मध्ये ओडिशातील तालाबीरा-२ व तालाबीरा -३ मध्ये कोळसा खाणी देण्यात गैरव्यवहार झाला होता. तेव्हा कोळसा मंत्रालय मनमोहनसिंगांकडेच होते. या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. परंतु न्यायालयाने तो फेटाळला आणि मनमोहनसिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. तत्कालीन कोळसा मंत्रालयाचा जवाब गरजेचा नाही काय? असे न्यायालयाने तेव्हा विचारले होते. पंतप्रधानांच्या चौकशीची परवानगी मिळाली नव्हती, असे सीबीआयने न्यायालयास सांगितले होते. काय आहे प्रकरण? काँग्रेस पाठीशी ^सिंग यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणालाच शंका नाही. अख्ख्या देशाला त्यांचा पारदर्शकपणा माहीत आहे. भाजप या प्रकरणाचे राजकारण करत आहे. खाण लिलाव थांबण्यासाठी भाजपच्याच मुख्यमंत्र्यांनी पत्रे दिली होती. रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते नवी दिल्ली | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची मर्यादा ६० वर्षेच आहे. त्यात घट अथवा वाढ करण्याचा विचार नाही, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत दिली. दरम्यान, केंद्र सरकारने नव्या नोकऱ्यांवर बंदी घातलेली नाही, असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. कुठलेही संवेदनशील सरकार नोकऱ्यांवर बंदी घालण्याचा आदेश देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान या दोन्ही मुद्द्यांची चर्चा झाली होती. त्यामुळे सरकारला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात घट करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त हास्यास्पद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले होते. निवडणुकीपूर्वी सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होईल, अशी चर्चा होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांची निवृत्ती ६० व्या वर्षीच भाकपचे ज्येष्ठ नेते काॅ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईत डाव्या, पुरोगामी अाणि आंबेडकरवादी पक्ष व संघटनांनी राज्य सरकार व हिंदुत्ववादी संघटनांच्या िवरोधात िवशाल मोर्चा काढला होता. भायखळ्यातून निघालेल्या माेर्चाचे आझाद मैदानावर सभेत रुपांतर झाले.आम्ही सारे पानसरे... प्रतिनिधी | संगमनेर नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरनजीक कऱ्हे घाटाच्या पायथ्याशी दोन मालट्रकच्या धडकेत गुजरातमधील तिघांचा मृत्यू झाला. सहाजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती अत्यवस्थ अाहे. बुधवारी सकाळी हा अपघात झाला. रणजितकुमार नवलाभाई दोडी (वापी, गुजरात) असे एका मृताचे नाव अाहे. दोन मृतांची ओळख पटली नाही. राजहंस दूध संघाच्या एक टँकरचालकाने व परिसरातील लोकांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. अपघाताची तीव्रता एवढी होती की, जखमी व मृतांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. संगमनेरजवळ अपघातात तीन ठार अपघातग्रस्त मालट्रकची अवस्था. छाया : विवेक भिडे.