1. [New post] माफक नफावसूली
1 message
Rapet Bajarachi <comment-reply@wordpress.com> Mon, 22 May, 2023 at 05:54
Reply to: Rapet Bajarachi <comment+rf55whg7t35kxtll-
9n133@comment.wordpress.com>
To: smv2004@gmail.com
Rapet Bajarachi
माफक नफावसूली
Sudhir Joshi
May 22
सोमवारच्या तेजी नंतर बाजारात नफा वसूलीचा जोर पहायला
मिळाला. येणारे निकाल चांगले असले तरी ते जाहीर झाल्यावर
उत्सुकता संपल्यामुळे कं पन्यांमधे नफा वसूली पहायला मिळत
होती. एसबीआय व आयटीसी या दोन्ही कं पन्यांचे निकाल चांगले
असले तरी नफा वसूली झाली व दोन्ही कं पन्यांच्या भावात नरमाई
आली. (Click on Date Below to read full article)
शुक्रवारी परदेशी बाजारांतील घडामोडींवर आधारित माहिती
तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांच्या आघाडीने बाजार सावरला पण
2. साप्ताहिक तुलनेत बाजारात साधारण अर्धा टक्क्यांचे नुकसान
झाले.
कोटक महिन्द्र बँक: बँकांचे निकाल आता चांगले येऊ लागले
आहेत. करोना काळानंतरचा बुडित कर्जांचा भार आता कमी होत
आहे. व्याज दर व एकू न अर्थव्यवस्थेतील वाढ या क्षेत्रासाठी
उपयुक्त आहे. कोटक महिन्द्र बँके चे मार्च अखेरचे तिमाही नक्त
व्याज उत्पन्न ३५ टक्क्यांनी वाढले. संपूर्ण वर्षात बँके चे प्रति
समभाग उत्पन्न ६० रुपयांवरून ७५ रुपयांवर गेले. एमएससीआय
इंडेक्स मधील बदलांचा (weight rebalancing) सर्वात जास्त
फायदा या बँके ला होणार आहे. त्यामुळे या निर्देशांकावर आधारित
गुंतवणूक करणाऱ्या म्युचल फं डांची या बँके तील गुंतवणूक मे
महिन्या अखेर वाढेल. सध्याच्या १९०० च्या आसपास गुंतवणूकीची
संधी वाटते.
त्रिवेणी इंजिनिअरिंग: भारतातील प्रमुख साखर उत्पादकांपैकी
एक असलेल्या या कं पनीचे इंजिनियरिंग व डिस्टिलिअरी असेही
व्यवसाय आहेत. साखर उत्पादनातून ६४ टक्के , डिस्टिलिअरी मधून
२६ टक्के तर उरलेले १० टक्के उत्पन्न इंजिनियरिंग व्यवसायातून
मिळते. हाय स्पीड गिअर च्या बाजारात कं पनीचा ५५ टक्के वाटा
आहे. सध्या भांडवली उत्पादनातील वाढत्या मागणीमुळे कं पनीच्या
हातात पुरेशा मागण्या आहेत. साखर व्यवसायही येत्या काही
महिन्यात चांगला चालण्याचा अंदाज आहे. कं पनी इथेनॉलची
उत्पादन पुढील वर्ष अखेर क्षमता दुप्पट करणार आहे. सध्याच्या
२६८ च्या भावात खरेदी कमी जोखमीची आहे.
3. सेंचुरी प्लायबोर्ड: भारतातील ही सर्वात मोठी प्लायवुड बोर्ड
उत्पादन करणारी कं पनी आहे (वार्षिक उलाढाल ३६४६ कोटी).
डेकोरेटिव्ह, मरीन ग्रेड, लॅमिनेट्स, एमडीएफ अशा विविध प्रकारांचे
भारतभर वितरण करण्याची परिसंस्था कं पनीकडे आहे. देशातील
गृहनिर्माण व्यवसाय व उंचावणारी जीवनशैली कं पनीला पूरक
आहे. सध्याची ५७५ ची भाव पातळी गुंतवणूकीसाठी आकर्षक
वाटते.
स्टेट बँक: भारतातील या सर्वात मोठ्या बँके ने मार्च अखेरच्या
तिमाही साठी विक्रमी नफा जाहीर के ला तर संपूर्ण वर्षासाठी ५०
हजार कोटींचा प्रचंड नफा जाहीर के ला. २०१९ साली हा नफा
के वळ ८६२ कोटी होता. बाजाराची या निकालांवरील उदासीनता
ही काही वर्षापूर्वी आयटीसी बाबत असलेल्या उदासीनतेची
आठवण करून देते. एक सरकारी बँक म्हणून बघण्याचा बाजाराचा
द्रुष्टीकोन लवकरच बदलेल. ‘योनो’ हे बँके चे अॅप डिजीटल सेवा
क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित करीत आहे. बुडीत कर्जाचे प्रमाण
घटते आहे. एसबीआय लाईफ, एसबीआय एएमसी, एसबीआय
कार्ड्स या सारख्या उप-कं पन्यांतील गुंतवणूकीचा विचार करता
पुढील काही महिन्यात बँके च्या प्रगती मधे मधील सातत्य राहील्यास
स्टेट बँके चे बाजारातील मुल्य नक्कीच वाढेल.
या सप्ताहात बोरोसिल, बँको प्रॉडक्ट्स, ईस्ट इंडिया हॉटेल्स,
फिनोलेक्स पाईप्स, इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स, पॉलिसी
बाजार, श्री सिमेंट, अमरा राजा, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, गॅब्रिअल,
सोमाणी सिरॅमिक्स, पॉलिप्लेक्स, अशोका बिल्डकॉन, हिंडाल्को,
4. Comment Like
इंडिया सिमेंट, सन फार्मा या काही महत्वाच्या कं पन्यांचे वार्षिक
निकाल जाहीर होतील.
You can also reply to this email to leave a comment.
Unsubscribe to no longer receive posts from Rapet
Bajarachi.
Change your email settings at manage subscriptions.
Trouble clicking? Copy and paste this URL into your
browser:
https://rapetbajarachi.wordpress.com/2023/05/22/%e0%
a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%95-
%e0%a4%a8%e0%a4%ab%e0%a4%
be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%82%
e0%a4%b2%e0%a5%80/
Get the Jetpack app to use Reader anywhere, anytime
Follow your favorite sites, save posts to read later, and get real-time
notifications for likes and comments.
5. Learn how to build your website with our video tutorials on
YouTube.
Automattic, Inc. - 60 29th St. #343, San Francisco, CA 94110