1. [New post] नव्या उच्चांकावर
1 message
Rapet Bajarachi <comment-reply@wordpress.com> Sun, Jun 18, 2023 at 15:34
Reply-to: Rapet Bajarachi <comment+rf55whg7t3s9cqqiatj1-
gu@comment.wordpress.com>
To: smv2004@gmail.com
Rapet Bajarachi
नव्या उच्चांकावर
Sudhir Joshi
Jun 18
बाजाराला नव चैतन्य देणाऱ्या अनेक घटना गेल्या सप्ताहात
घडल्या. भारतात सलग तिसऱ्या महिन्यांत महागाईचा दर ६
टक्क्यांहून खाली राहीला आहे. एप्रिलच्या ४.७ च्या तुलनेत मे
महिन्यात तो ४.२५ टक्के झाला आहे. त्याच बरोबर औद्योगिक
उत्पादनातील ४.२ टक्के वाढ व खनिज तेलाच्या उतरत्या किंमती
बाजाराला पोषक ठरत आहेत. अमेरिके तील महागाईची वाढ
देखील ४ टक्क्यावर आल्यामुळे अमेरिकन फे डरल बँके कडून
व्याज दर वाढीला विराम देण्याची आशा बळावली होती. ‘फे ड’ ने
प्रत्यक्षात दर वाढविले नाहीत पण दरवाढीचे हत्यार म्यानही के ले
2. नाही. महागाईची वाढ अपेक्षित २ टक्क्यांहून खाली येण्यासाठी
अमेरिके त या वर्षात अजून दोनदा व्याज दर वाढ के ली जाऊ
शकते. बाजारातील बँकिंग क्षेत्रावर याचा विशेष परिणाम गुरूवारी
दिसून आला. पण जगातील इतर बाजारांप्रमाणे नंतर त्याकडे दुर्लक्ष
के ले गेले. परदेशी गुंतवणूकदारांच्या साथीने निफ्टीचा नवा उच्चांक
गाठला गेला.
मारुती सुझुकी: भारतातील सर्वात मोठ्या वाहन कं पनीने
आतापर्यंत अडीच कोटी वाहन निर्मितीचा टप्पा पार के ला. २०२३
अखेरच्या आर्थिक वर्षात १९.२२ लाख वाहने कं पनीने उत्पादन
के ली होती. गेली चाळीस वर्षे भारतीयांच्या गरजा ओळखून या
कं पनीने बाजारात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. वेगवेगळ्या
गरजा ओळखून नवीन मॉडेल्सची जंत्री कं पनीने सादर के ली आहे.
सेमी कं डक्टर चीपचा पुरवठा सुरळीत होत आहे. धातूंच्या किंमती
कमी रहाण्याची अपेक्षा आहे. भारतातील प्रवासी वाहन विक्री मधे
कं पनीचा ४२ टक्के हिस्सा आहे. कं पनी मजबूत पायावर उभी आहे.
मार्च अखेरच्या वर्षात कं पनीने तिच्या लौकिकाला साजेसे निकाल
जाहीर के ले. कं पनीच्या उत्पन्नात ३३ टक्के तर नफ्यात दुप्पट वाढ
झाली. कं पनीकडे चार लाख वाहनांच्या मागण्या बाकी आहेत.
लवकरच कं पनीचे समभाग बाजारात पाच आकडी संख्येकडे कू च
करतील अशी अपेक्षा आहे. सध्याचा ९६०० च्या पातळीवर
समभाग खरेदीची संधी आहे.
अपार इंडस्ट्रीज: उच्च दाबाच्या विजेच्या के बल्स, गॅलव्हनाईज्ड
स्टील वायर, अॅल्युमिनियम अलॉयचे कं डक्टर, ट्रान्सफॉर्मरसाठी
लागणारे तेल व लुब्रिकं ट अशा उत्पादनांद्वारे उर्जा, दूरसंचार तसेच
3. वाहन, पेपर, सिमेंट, कागद, औषध निर्मिती अशा क्षेत्रास लागणारी
उत्पादने ही कं पनी बनविते. मध्य एशिया, युरोप, अफ्रिका,
ऑस्ट्रेलिया अशा देशांना तिची निर्यातही आहे. मार्च अखेरच्या
वर्षात कं पनीच्या उलाढालीत व नफ्यात अनुक्रमे ५३ व १५० टक्के
अशी घसघशीत वाढ झाली. कं पनी पुरवठा करीत असणार्या सर्वच
क्षेत्रात सध्या मोठी वाढ होत आहे. कं पनीला त्याचा व निर्यात
वाढीचा लाभ मिळेल. सध्या बाजारातील ३१०० ची पातळी
वर्षभराच्या गुंतवणकीसाठी आकर्षक आहे.
टाटा के मिकल्स: बाजारात प्रतिकू ल बातमी येते तेव्हा चांगल्या
कं पनीचे समभाग जमविण्याची संधी असते. टाटा के मिकल्सने
सोडा अॅश या कं पनीच्या प्रमुख उत्पादनाचे दर कमी के ले तसेच
कं पनीचे समभाग एक्स डिव्हिडंड झाले. या कारणांमुळे सध्या या
कं पनीच्या समभागात घसरण पहायला मिळते आहे. कं पनीने मार्च
अखेरच्या वर्षात महसुलामधे २६ टक्के वाढ होऊन तो ४४०७ कोटी
तर नफ्यात ६२ टक्के वाढ होऊन तो ७०९ कोटी झाला होता.
कं पनीने १७.५० रूपये प्रति समभाग डिव्हिडंड जाहीर के ले होते.
कं पनीचा डिव्हिडंड देण्याचा इतिहास चांगला आहे. गेल्या काही
वर्षात कं पनीच्या उत्पादनात व व्यवस्थापनात सुसूत्रता आली आहे.
दीर्घ मुदती साठी कं पनीचे समभाग टप्याटप्याने जमविता येतील.
निफ्टी जरी नव्या उच्चांकाला पोहोचला असला तरी डिसेंबर २०२२
च्या तुलनेत तो अजूनही वाजवी स्तराला म्हणावा लागेल. निफ्टीचे
पुढील १२ महिन्यांचे किंमत व मिळकतीचे गुणोत्तर (PE ratio)
सध्या १९.९ आहे जे डिसेंबर २०२२ मधे २१ होते. कं पन्यांची
मिळकत चांगली झाल्याचा हा परिणाम आहे. जून महिन्यांत
4. Comment Like
होणाऱ्या प्राप्ती कराच्या आगाऊ हप्त्यात ३६ टक्के वाढ झाली. हा
अजून एक मुद्दा सध्याच्या आर्थिक परिस्थिती बाबत व
बाजारासाठी आश्वस्त करणारा आहे.
You can also reply to this email to leave a comment.
Unsubscribe to no longer receive posts from Rapet
Bajarachi.
Change your email settings at manage subscriptions.
Trouble clicking? Copy and paste this URL into your
browser:
https://rapetbajarachi.wordpress.com/2023/06/18/%e0%
a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-
%e0%a4%89%e0%a4%
9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%be%
e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%be%e0%
a4%b5%e0%a4%b0/
Get the Jetpack app to use Reader anywhere, anytime
Follow your favorite sites, save posts to read later, and get real-time
notifications for likes and comments.
5. Learn how to build your website with our video tutorials on
YouTube.
Automattic, Inc. - 60 29th St. #343, San Francisco, CA 94110