आयुर्वेदामधे देश म्हणजेभूमी याला विशेष महत्व दिलेले आहे. आचार्य चरकानी देशाची परिभाषा
पूढीलप्रमाणे सांगितलेली आहे.
देश पुनः स्थानं, स द्रव्याणामुत्पत्तिप्रचारी देशसात्म्य वाचष्टे । त्या त्या प्राण्याच्या निवासस्थानाला देश
म्हणतात. च.वि.१/२१-५
देशस्त भूमिरातुरश्च। च.वि. ८/९२
आचार्य चरकानी भूमि आणि आतुरशरोर यांना देश म्हटलेले आहे
“ ”
आचार्य वाग्भटानी सुद्धा आहार द्रव्याचे उत्पत्तिस्थान म्हणजे भूमि आणि उपयोग करणाऱ्याचे निवासस्थान
“ ”
म्हणजे देह अशाप्रकारे भूमी आणि देह ह्यांना देश मानलेले आहे.
देशो दद्रव्यस्योपयोक्तुश्चोत्पत्यवस्थाने अ.सं.सू. १०/१०
व्यवहारामधे असे पाहावयास मिळते की, एखादी व्यक्ति आनूप देशामधे व्याधिग्रस्त होत असेल तर तिला
“ ”
दुसरीकडे नेल्यास म्हणजेच देशत्याग केल्याने ती व्यक्ति आपोआप निरोगी होते.
3.
सुश्रुतांनी तीन प्रकारचादेश सांगितलेला आहे.
(सु.सू. ३६/४९)
१) आनूप देश २) जांगल देश ३) साधारण देश
१) आनूप देश ह्यात पाऊस अधिक असतो. जमीन खोदल्यास लगेच पाणी लागते. पृथ्वी ही निम्नोन्नत असते. नदी नाल्याची संख्या अधिक
असते. वायु ही मृदु आणि शीत असते. पर्वत, वृक्ष यांची
संख्या अधिक असते अधिकतर स्त्रीपुरुप है कोमल अंगाचे, सुकुमार आणि पृष्ट असतात. ह्या देशाप्त
‘कफ- ’
वात व्याधि अधिक प्रमाणात होतात
4.
د२) जांगल देशह्या देशामधे कमी मात्रेत, लहान आणि काटेदार वृक्ष असतात पावसाचे प्रमाण कमी
असते. विहिरी, नदी, नाले ह्यात पाणी अल्प मात्रेत असते वायु उष्ण आणि दारुण असते. येथे लहान-लहान
पर्वत असतात बहुतांश व्यक्ति दृढ परंतु कृश शरीर काठीच्या असतात. वात-पित्त व्याधिचे प्रमाण अधिक असते.
३) साधारण देश ह्या देशामधे उन्ह, पाऊस, थंडी आणि तारा हे सम प्रमाणात असतात वातादि दोष सुद्धा
साम्यावस्थेमधे असतात
वरील तिनही देशाचे लक्षणावरुन असे लक्ष्यात येते की साधारण देश हा आरोग्याचे दृष्टिकोनातून श्रेष्ठ आहे
5.
“
देशाला Habitat” “
हेपर्यायी नाव असून त्याचा अर्थ The Natural abod of an animal”
म्हणजे पशु-पक्षी यांचे स्वाभाविक निवास स्थान असा आहे. •
स्वाभाविक निवास स्थान माहीत असल्यास
चिकित्सा करतेवेळी त्याच देशातील उत्पन्न औषधी, आहार विहार त्या व्यक्तिकरिता हितकर असते.
“ ”
यस्य देशस्य यो जन्तुस्तज्जं तस्यौषध हितम्
6.
भू –
मि प्रकार
आयुर्वेदामधीलपांचभौतिक सिद्धातानुसार सृष्टीतील सर्व दव्याप्रमाणे भूमि सुद्धा पांयभौतिक असते परंतु एक-एक
महाभूताने आधिक्यानुसार भूमि ही सुश्रुतांनी पाच प्रकारची सांगितलेली आहे (सु.मु. ३६/५)
१)पार्थीव भूमि
३) वायविय भूमि
२) जलीय भूमि
४) आकाशीय भूमि
पार्थिव भूमि ही कठीण, स्थिर, गुरु, काळपट, दगड धोंडे मोठे असलेली असते. या भूमि मधे उगवणारे वृक्ष, गवत, धान्य हे
आकाराने मोठे असते जलीय भूमि ही स्निग्ध, लव जिच्या मधे उगवते तो जलीय भूमि होय. नाना वर्णाच्या छटा असलेली
रेती किंवा लहान खडे असलेली, खुरटलेली, निस्तेज, पांडु वर्गाचे वृक्ष किंवा गवत जिथे येते ती आग्नेय भूमि होय रुक्ष राख
वा भस्माचे वर्णाची अल्परसयुक्त, वृक्ष बहुलता असलेली, कोटरयुक्त ती वायवीय भूमि होय आणि मृदु, खाचखळगे
असलेली, बिळे असलेली, असारवृक्षयुक्त, बेचव पाणी आणि मोठे पर्वत असलेली जमीन आकाशीय होय
7.
निवास योग्य भूमि–
मनुष्याचे आरोग्याचे दृष्टीने निवासस्थानाला विशेष महत्व आहे. निवासस्थानावी भूमि हा आवश्यक भाग आहे कारण त्या
आधारावर निवासस्थानाची रचना होत असते. घराच्या आजुबाजुला मोकळी जागा सोडलेली असते. मैदान, पटांगणे सुद्धा
घराच्या जवळ असतात शेतकरी, मजुर यांचा सुद्धा भूमिशी सतत संपर्क येत असतो ह्या सर्व दृष्टीने भूमिला विशेष महत्व
आहे.
आधुनिक मतानुसार भूमि ही पाच प्रकारची असते.
१) खडकाळ (Rocky)
२) रेत्ताळ (Sandy)
३) भुसभुसीत (Loamy)
४) विक्कन माती युक्त (Black soil)
५) भरत आणलेली (filled soil)
ह्यापैकी खडकाळ आणि रेताळ प्रकारची भूमि ही वातावरण उष्ण ठेवते तर चिक्कन मातीची भूमी वातावरण दमट आणि
शित ठेवते. कमी अंतरावर जर पाण्याची पातळी असेल तर ती भूमि पण दमट असते. रेताळ भूमी ही शुष्क आणि
आरोग्याकरिता हितकर असते.
8.
–
भूमि प्रदूषण रासायनिककिटकनाशके, खते यांचा शेतीमधे उपयोग केला जातो त्यामुळे भूमी प्रदूषित होत असते
तसेच पाणी आणि भाजीपाला याचे माध्यमातून ते प्रदुषण मानवी शरीरामधे पोहचत असते उदा. डी.डी.टी.,
एल्ड्रीन.
प्रदूषित भूमी मुळे पूढील प्रमुख आरोग्य समस्या निर्माण होतात.
१) राऊं डवर्म इन्फे क्शन (Roundworm infection)
२) हृकवर्म इन्फे क्शन अंकुश कुमी (Hook worm infection)
३) धनुर्वात (Tetanus)
४) गॅस्ट्रो इन्टेस्टानयल इन्फे क्शन (Gastro intestinal infection)
हया समस्या विहीरीतील पाणी प्रदूषित झाल्याने ते पाणी पिल्यामुळे निर्माण होतात
9.
–
भूमिशोधन
भूशुद्धि मार्जनाद्याहात्कालाद् गोक्रमाणात्तथा।
सेकादुल्लेखानाल्लेपाद् गृहं मार्जनलेपनात् ।। याज्ञवल्क्यस्मृति
दुषित, अस्वच्छ, निवासाकरिता अयोग्य असलेल्या भूमिची शुद्धता करुन ती निवासा साठी उपयुक्त बनविणे
म्हणजे भूमि शोधन होय भूमिशोधन पुढील सात प्रकाराने करतात.
१) मार्जन२) दहन३) कालान्तर (अवधी)४) गोक्रमण५) सिंचन (धुणे)६) उल्लेखनघराची शुद्धी धुणे, पुसणे, लेपन
करणे, (शेणाने सारवणे) इत्यादी प्रकाराने करतात, आधुनिक ७) आलेपन (लिपन) पद्धतीनुसार शोचन
करण्यासाठी विविध रासायनिक द्रव्ये, किटकनाशके यांचा उपयोग करण्यात येतो.
उदा. उधईचा प्रतिबंध करण्याकरिता पेस्टीसाईडस् (Pesticides) चा वापर.
10.
निवाय योग्य भूमिमनुष्याचे आरोग्य रक्षणाचे दृष्टीकोनातून निवासस्थानाला विशेष महत्व आहे.
• निवास योग्य भूमि निवडते वेळी पूढील बाबी विचारात घ्याव्यात.
१) जी भूमि औषधी उत्पन्न करण्यास उपयुक्त आहे म्हणजे उपजाऊ आहे.
२) किचित छिद्रयुक्त किंवा रेताळ जमीन श्रेष्ठ मानलेली आहे कारण अशा जमिनीमधे जलसंचय होत
नाही, काळी चिक्कन (Black soil) भूमि निवासाकरिता उपयुक्त नसते कारण ती आर्द्र, शित आणि जलाचा अवरोध करणारी असते.
महणजे ओलावा घरुन ठेवणारी असते.
३) खडकाळ, कोरडी, टणक भूमि सुद्धा निवासासाठी चांगली असते. •
कारण येथील जमीनीवर पडणारे पाणी वाहून जाते. कचरा
टाकून बुजवलेल्या खड्डयातून निर्माण केलेली भूमि (filled soil) ही निवनिवासासाठ निवडू नये
४) जमीनीची उष्णता आणि भूस्तरीय जलाची पातळी योग्य असलेली भूमि असावी. •
म्हणजे भुपृष्टापासून जमीनीतील पाण्याची
पातळी १० फु टापेक्षा खाली असावी कारण कमी अंतरावर भूसभूव्हा पातळी असल्यास ती भूमी दमट असते.
जलाची
५) भूमि निवडताना पाणी, उजेड आणि वारा या बाबीचा विचार व्हावा
11.
–
अग्राहय व निवासअयोग्य भूमि
आचार्य चरकांनी जनपदोध्वंस कर देश किंवा भूमि ची लक्षणे सांगितलेली आहेत. ह्या लक्षणानी युक्त भूमि निवासाकरिता
अयोग्य समजावी. (च.वि. ३/३)
१) भूमिचे स्वाभाविक वर्ण, गंध, रस, स्पर्श विकृत झालेली भूमि यात पाणथळ आणि रेताड जमीनीचा
समावेश होतो.
२) ज्या भूमीमधे दलदल अधिक मात्रेत असते अशी व साप, व्याल, मच्छर, माश्या, उंदीर, आणि घुशी यांचा उपद्रव
असणारी भूमी अयोग्य असते.
३) नेहमीच्या उपयुक्त वनस्पतींची वाढ न होता रानटी वेली गवता (तृण) ची वाढ झालेली भूमि, पूर्वी उत्तम उपजाऊ
असलेली परंतु आता भूमि प्रदुषित झाल्याने तेथील पिके आपोआप नष्ट होणारी, हवेसोबत धूर असणारी, जिथे कुत्रे नेहमी
भुंकत असतात आणि गिधाड, घारी सारखे अशुभ पक्षी वास्तव्याला असलेली भूमी अयोग्य असते.
12.
४) जिथे वास्तव्यालाअसणाऱ्या लोकांमधे धर्मकार्ये, सत्यभाषण, लज्जा, चारीत्र्य, सदाचार इत्यादि सद्
गुणांचा अभाव
असतो. सदैव भांडण, कलह, मारामारी, चोरी विभिन्न व्यसने यामधे रममाण होणाऱ्या लोकांची जवळच बस्ति असणारी
भूमि, जेथील जलाशय (क्षुब्ध) खळबळ युक्त आहे अशी भूमि अयोग्य असते.
५) भूकंप, उल्कापात, वीज पडणे, इत्यादि नैसर्गिक प्रकोपाकरिता संभाव्य असलेली भूमि तसेच जिथे रुक्ष, ताम्रवर्णी,
अरुणवर्णी, श्वेत ढगानी वेढलेले सूर्य, चंद्र, तारे दिसतात अशी भूमि अयोग्य मानलेली आहे.
तसेच दुर्गंध युक्त सभा भवन, चैत्य वृक्ष राजप्रासाद आणि देवाचे मंदीरासमोरील, कांटेदार वृक्षानी युक्त, गोल, त्रिकोणी,
विषमाकार असलेली भूमि निवासाकरिता अयोग्य समजली जाते.
जमिनीमधे ओल राहत असल्यास त्या भूमि वर असलेल्या घरातील व्यक्तिना संधिवात, पडसे (प्रतिश्याय) कास इत्यादि
व्याधि होण्याची संभावना असते.
13.
तापक्रमः -
भूमितील तापक्रमहे सामान्यतः ५० फु ट खोलीवर १ फरेनहिट ने वाढत असते. हे तापक्रम भुपृष्टापासून ४ फु ट खोलीवर
मोजतात. प्रत्येक ठिकाणी तेथे असलेल्या भूमिच्या जातीनुसार (खडकाळ, रेताळ, भुसभूसित वगैरे) तेथील तापमानामधे
थोडाफार फरक पडत असतो. तापक्रमामधील बदल हा पूढील कारणामुळे होतो.
१) भूगर्भातील रासायनिक परिवर्तन
२) पर्यावरणातील अतिशितत्व, अतिउष्णत्व व आर्द्रता.
३) मातीच्या उष्णता संवहन व उष्णताशोषण करण्याच्या गुणधर्मात आढळणारा बदल, भूमीच्या जातीनुसार बदल
आढळतो. उदा. रेताड जमीनीवरील पाणी लवकर झिरपते तर काळी चिक्कन मातीची जमीन ओलावा धरुन ठेवत असते.
४) जमिनीवर असणारी वनराई, वृक्ष हे अधिक असतील तर ते जमिनीतील जलीय अंश जास्त शोपुन घेतील. त्यामुळे
तेथील तापक्रम हे वाढलेले राहील.
५) त्या ठिकाणी होणारी पर्जन्य वृष्टी.