दि. ५ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे येथील मनोहर मंगल कार्यालय येथे भारतातील लाडशाखीय वाणी समाजातील १५० समाज प्रतीनीधींची बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यात सर्वानुमते आखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन पुणे येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळेस कार्याध्यक्षपदी श्री. कैलास बाबुलाल वाणी पुणे, स्वागताध्यक्ष पदी श्री. राजेंद्र लक्ष्मण वाणी मुंबई, सचिव पदी श्री. राजेश वसंतराव कोठावदे नासिक व खजिनदार पदी श्री. शामंकात जगन्नाथ शेंडे पुणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.